भोसरीच्या शेलारांची तेली समाजाची सांस्कृतीक चळवळ

    ज्या समाजाला इतिहास नसतो त्या समाजाला वर्तमानात खाली माना घालुन आदेश मानावे लागतात. खाली माना घालुन वावरणार्‍या समाजाच्या वारसांना तेच करावे लागते आणि ते केले नाही तर वारसदार कोलमडुन पडतात. इतकी ताकद इतिहासात आसते. हा घडणारा इतिहास आगदी घडला तसा जपला जात नाही. तर घडलेला वेगळा व जपलेला वेगळा ही आसतो. हे जपत असताना दुसर्‍याचा इतिहास संपवणे किंवा पुसट करणे यातून वर्तमान व भविष्य आपल्या मुठीत ठेवण्या साठी काही कार्यरथ असतात. आशा कार्यरथ कडुन ही तेली समाजाचा इतिहास पुसट का होईना जीवंत आहे. या जीवंत पणातून आमच्या पुर्वजांच्या पराक्रमाची उत्तुंग शिखरे नजरे आड करता येत नाहीत ही समाजाची गरूड झेप. हा वारसा बार्शी, सासवड, चाकण देहु ते सुंदुबरे क्रांती करणारे संताजी याच जोडीला भोसरी येथील शेलार व भैरवनाथ मंदिर.

    पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक वडगाव रासाई. या गावची रासाई देवी या देवीच्या मानात शेलार कुटूंबीय आजही या गवातील शेलार वतनदार शेलार म्हणनु वावरत आहेत. याच गावातुन शेलार कुटूंब स्थलांतरीत झाले. त्यापैकी दि ग्रेट शेलार सर्कसवाले ही याच मातीतले त्यांनी शेलार हे ग्रेट नाव पुणे परिसरात नव्हे तर जगभर गाजवले. त्यांच्या मुळे जग जींकणारे सर्कस पटु दामू धोत्रे घडले. हा या देशाचा स्वाभीमान आहे. याच गावचे शेलार स्थलांतरीत होत पुर्वज भोसरी गावात स्थिर झाले. पुर्वी ज्या गावात बाराबलुतेदार, आलुतेदार वास्त्व्य करून असत त्या गावाला गाव म्हणत. नाहीतर फक्त एकाच समाजाची घरे ज्या ठिकाणी असत त्याला वाडी म्हणत. भोसरी गावात शेलार स्थीर झाल्यावर तेंव्हा गावाला गरज होती भैरवनाथ या ग्राम दैवतेची या मंदिरात असलेला नंदादिप चोविस तास तेवत ठेवला जात आसे धार्मीक विधीत जाणकार असावा हे जाणते पण शेलारांच्या पुर्वजांकडे होते. त्यामुळे चोविस तास दिप प्रज्वलित ठेवणे. नवरात्र उत्सवात तो नऊ दिवस साजरा करणे. भैरवनाथ या ग्राम दैवत्वाची यात्रा सपन्न करणे यातील बराच मान शेलारांना मिळाला. याच जोडीला भोसरी गावातील शेतपिक असलेली 29 एकर शेती ही दिली. या शेतीवर शेलार राबत होते. भैरवनाथाची सेवा करित होते. गावाच्या कारभारात त्यांचे मत महत्वाचे होते. गावगाड्यातील महत्वाचे निर्णय घेताना शेलारांचा कानोसा घेतला जात आसे. कै. शिवराम शेलार हे एक जाणते बांधव शेती, भैरवनाथाची सेवा व गावची जबाबदारी खंबीर पणे पेलत होते. कै. शिवराम शेलार यांनी भोसरीत पहिले किराणा दुकान सुरू केले. भोसरी हे आज एक मोठी व्यापारी पेठ म्हणुन ओळखली जते परंतु या व्यपारी पेठेचा पाया हाच कै. शिवराम शेलार व गुजराथा मधुन आलेल्या शहा यांनी घातला असे जाणकार भोसरीचे डी.डी. फुगे अमिानाने सांगतात याच दरम्यान कै. गेणभाऊ शेलार यांनी किराणा दुकाना बरोबर सायकल विक्री व दुरूस्तीचे दुकान सुरू करून भोसरीच्या बाजार पेठेला दर्जा व विश्‍वास याची जोड दिली.

    पारतंत्र्य ज्यांनी भोगले त्यांनाच स्वातंत्र्य समजले. मान खाली घालुन अज्ञा पाळणे म्हणजे गुलामगीरी ताठ मान ठेवुन वावरणे म्हणजे स्वविचार स्वातंत्र्याने दिले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, हुतात्मा होणारे, शिक्षा भोगणारे, संसार उध्वस्त करणारे इंग्रजांना हुलकावणी देणारे होते त्यात तेली बांधव ही आघाडीवर होते. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी डोळ्यात तेल घालुन वावरणारे सैनिक ही खरी स्वातंत्र्य आबाधीत ठेवणारे भारतीय बांधव. परंतु या बांधवा साठी पर्यायाने हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपल्या जगण्याचा आधार देणारे जे आहेत ते कधीच प्रकाशात नाहीत. त्यांनी त्याग केला तो त्यांच्या सह इतिहास जमा झाला. भोसरीच्या शेलारांना इनाम म्हणुन 29 एकर जमिन मिळाली होती. आज त्याचा बाजार भाव अब्जावधी रूपयांचा आहे. परंतु ही 29 एकर जमीन विना मोबदला त्यांनी शासनाला दिली. व आपला दिनक्रम आनंदाने सायकल दुकानावर सुरू ठेवला. कै. गेणूभाऊ शेलार यांना 1) बाळासाहेब, 2) लक्ष्मण, 3) भरत, 4) बंडोपत , 5) शंकर, 6) राजु ही मुले. मुले शिक्षित झाली पाहिजेत ती आपली परंपरा चालवणारी नव्हे तर वाढवणारी बनली पाहिजेत ही त्यांची धडपड या त्यांच्या धडपडी मुळेच सहा ही मुले आपल्या आयुष्यात नेतृत्व, कर्तुत्व व निष्ठा या बळावर यशस्वी वाटचाल करू शकले.

    श्री. बाळासाहेब शेलार पिंपरी चिंचवड शहराचे घटक. शालेय शिक्षण पुर्ण होताच ते पिंपरी चिंचवड म.न.पात लिपीक म्हणुन कामाला लागले. प्रथम काम समजुन घेतले. त्या कामातुन आपल्या विषयी विश्‍वास निर्माण केला. काम समजावुन घेणारे, बारकावे समजुन घेणारे पळवाट कोणत्या याची जाणीव असणारे. यावर मात करून अशिया खंडात प्रथम क्रमांकाची महानगरपालीका ठरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले यापैकी बाळासोा. एक होते. त्यामुळे त्यांना वरिष्ठ अधीकारी म्हणुन काम करता आले. कार्यक्षम तपासणी अधीकारी म्हणुन ते पिंपरी चिंचवड मनपात आपला ठसा उमटवू शकले. त्यामुळे मनपात होणारे संकलन अधीक होऊ लागले. अधीक संकलना मुळे मनपा अर्थिक बाबत, विकास बाबत अशीया खंडात अग्रेसर ठरली परंतु ते नियमानुसार सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्तीचा काळ काही आपल्या कुटूंबात खर्च करतात. परंतू सातत्य, धडपड, चिकाटी व नियोजन या बळावर ते आयुष्यात लढले हे सर्व गुण घरात शांत बसु देईनात. पिंपरी चिंचवड परिसरात महाराष्ट्रातील देशातील समाज बांधव नशिब तपासुन घेण्यास आलेले. ओळखी नाहीत पारख करावी तर कोन आपला बांधव याचा ठिकाणा नाही. दोन नातलगांच्या बरोबर काय असतील ते संबंध. या पुर्वीच्या बांधवांनी संघटने साठी प्रयत्न ही केले होते पण हे सर्व प्रयत्न रूळू पहाताच थांबले गेले. का थांबले उनिवा काय याचा शोध घेऊन जे भेटतील त्यांना बरोबर घेऊन संघटनामक बांधनी करून प्रथम भोसरी येथे भव्य वधुवर मेळावा घेतला गेला. या यशा नंतर लक्षात आले समाजाची रचनात्मक निरपेक्ष सेवा करावयाची असेल तर समविचारी सोबती बरोबर असणे हेच यश समाज सेवतील असते. वाद, भेद तट, मते यात न गुंतता पिंपरी चिंचवड शहर समाज या संस्थेची स्थापना केली. नुसता वधु-वर मेळावा नुसत्या देणग्या न मागत फिरता त्याच बरोबर विधायक काम ही करू ही वाटचाल सुरू केली. पिंपरी चिंचवड परिसरात पसरलेल्या समाज बांधवांचा सन्मान हे उपक्रम हाती घेतले. पिपरी चिंचवड परिसरात पसरलेल्या समाज बांधवांचा शोध सुरू केला हि एक समाजाची माहिती गोळा झाली. या माहितीचा नुसता संग्रह उपयोगी नव्हता तेली गल्ली मासिक, शनैश्‍वर फौंडेशन (मंबई पुणे) किंवा इतरत्र ही अशी पुस्तीका गोळा करून फक्त कुटूंब प्रमुखाच्या नावा सह पुस्तीका प्रसिद्ध पुर्वी केल्या होत्या. या पाऊल वाटेवर नुसते चालत जाण्यापेक्षा या माहिती महामार्ग बनविण्यासाठी सेतु नावाची एक दर्जेदार पुस्तीका संस्थे तर्फे प्रसिद्ध करून समाज कार्याचा नवादिप स्तंभ उभा केला. एकाच शहरात दोन दोन वुध-वर मेळावे भरवुन आपल्या दुहीचे प्रदर्शन भरवण्यात समाज कार्य नव्हे तर समाज अहित आहे. या साठी समन्वय साधुन एक विचार समोर आला. आपण एक वर्षाआड मेळावे भरवु इतर कार्यक्रम प्रत्येकाने प्रत्यकाचे घ्यावेत. यातुन सामंजस्य निर्माण झाले. पिंपरी चिंचवड शहर संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप चिंलेकर सर्वश्री बाळासोा शेलार, पोपटराव पिंगळे यांची समन्वयाची भुमीका यशस्वी ठरली.

    कै. भरत गेनुभाऊ शेलार यांनी भोसरीच्या सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्राला आज प्रतिष्ठा आली त्यात यांचा सहभाग एक उत्कृष्ट खेळाडू म्हणुन ते नावाजले. ही परंपरा जोपासली पाहिजे या साठी त्यांची धडपड यातुनच पुजा शंकर शेलार ही शेलार कुटुंबीयाची कन्या शालेय स्तरापासुन कबड्डी खेळात चमकु लागली पुणे जिल्हा पातळीवरन ती महाराष्ट्र राज्य स्तरावर कबड्डी खेळाडू निवड झाली महाराष्ट्र टिम खेळताना तीला देशपातळीवर ही जाता आले. या ही वर्षे तिची निवड राज्य स्तरावर झाली आहे. पुजा ही एक आजची राज्यस्तरावरील खेळाडु तर कै. भरत शेलार हे महाराष्ट्र कब्बडी संघाचे खेळाडु होते त्यांनी राज्य स्तरावर खेळाडू घडविणयाची जी धडपड केली हे आज अनेक यशस्वी खेळाडू नमुद करतात.

    तेली गल्ली (गावकूसचे) सुरवातीचे दिवस होते. कुठेच धागेदोने नव्हते ते गोळा करून गुंफायचे होेते समाज संघटनाला एक दिशा द्यावयाची होती. आशा वेळी श्री. बंडोपंत गेनबा शेलार यांची ओळख झाली आणी एक भक्कम धागा सापडला आगदी पुर्वीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी सहकार्य व विश्‍वास दिला जीवनाची सुरवात निमशासकीय नोकरी करीत सुरू केली परस्थीतीची जान होती समाज विचाराची प्रक्रिया होती. जमेल ते करण्याची तयारी होती. यातुनच ते धडपडत होते. श्री. संताजी पालखीला आपल्या वडीलांनी पहिला मदतीचा हात दिला. एका बैलाच्या छकड्यात पालखी ठेऊन श्री. संत संताजी महाराजांना पंढरपूरात घेऊन जात होते. आशा वेळी कै. गेणुभाऊ शेलार यांनी प्रथम त्या छकड्याला छत बसवुन दिला आलेल्या वारकर्‍याची सेवा केली होती. श्री. संताजी पालखी सोहळ्यातील  पहिल्या सहकार्या पैकी ते एक हा ठेवा श्री. बंडोपंत यांनी संभाळाला. कधी स्वत: किंवा इतर सक्षम नातलगांना त्यांनी मदतीचा हात देण्यास लावला व दिला सुद्धा, रक्तदान हा बंडोपंतांचा विचार भोसरीव इतरत्र आज ही तेरक्तदान शिबीरे आयोजित करतात व स्वत:  रक्तदान करतात, पिंपरी चिंचवड शहर संसथेचे ते एक मुळ घटक संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाचे ते नियोजनात नव्हे, स्वागतात नव्हे, माईकवर नव्हे तर भोजन व्यवस्था. ते जेथे कमी तेथे मी ही भुमीका वाटवणारे प्रमाणिक कार्यकर्ते. सौ. शारदा बंडोपंत शेलार, वाकड येथील चिलेकरांच्या कन्या. त्या शेलारांच्या घरी आल्यावर त्यांना घर संभाळणे मुले संस्कारीत करणे ही जबाबदारी होतीच. पण सौ. शारदा यांनी या बरोबरच घराला उभे करण्यास सुरवात केली. सुरवातीला शिलाई मशिन घेऊन हात पाय हालवू लागल्या. त्यानंतर जनरेटरची ओळखीतुन जनरेटर खरदी केला. कार्यक्रमासाठी किंवा व्यवसाया साठी भाडे तत्वावर देऊ लागल्या यातुन घर चालविण्यास चार पैसे अधीक येऊ लागले. याच मुळे दोन्ही मुले शिक्षित झाली. शिक्षित होऊन स्वत:च्या पायावर उभे राहिली. सौ. शारदा शेलार, यांची साथ सोबत व जिद्द ही फार मोठी आहे. हे बडोपंत शेलार स्पष्ट मांडतात. श्री. राकेश बंडोपंत शेलार हे अरनेस फॅक्टरी तर्फे 4 डिंसेबर रोजी झारखंड येथे देशपातळीवर कबड्डी साठी निवड झाली.

    वडगंव रासाईत आज ही शेालार आहेत. याच रासाई देवीचे दर्शन घेऊन जे आपल्या गावा पासन दुर गेले कदाचित शेकडो वर्ष ही झाले असतील. तरी ते गावाकडे नजर ठेऊन असतात. जग जिंकणारी दि ग्रेट शेलार सर्कस असेल. पुण्याच्या कसबा पेठेतील पक्षांचे शिक्षक चिंतमण शेलार असतील. भोसरीत शेकडो वर्षे पुर्वी स्थाईक झालेले शेलार असतील त्यांनी आपला ठसा काळाला बरोबर घेऊन उमटवला आहे.

दिनांक 28-11-2015 22:57:13
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in