मुळात अधीकार काय आहेत ही जाणीव असणे म्हणजेच तो मानव सुशिक्षित असणे हे असले सुशीक्षित पण डिग्री, पदवी, पैसा, प्रतिष्ठा यावर येत नसते स्वत:च्या विवेक बुद्धीवर हे अधीकार कोणी पळवले, कोणी लपवले, कोणी हरवले, ते मिळु शकणार नाहीत का ? याचा विचार ज्याच्या जवळ आसतो त्याला सज्ञान म्हंटले पाहिजे. गुलामगीरीलाच भाग्यवाण समजणे म्हणजे दास होण्याचा मार्ग आनंदाने स्विकारणे. गतजन्मीचेपाप म्हणजे आजचे जगणे. या ही पेक्षा सुखी जीवन मिळण्यासाठी हे भोग आनंदाने जगने म्हणजे उद्याचा मोक्ष त्या पाठी मागे पळणे म्हणजे मृगजळाचा ठाव ठिकाणा घेणे. अगदी सर्व बाबींचा विचार मला संत संताजी जवळ सापडला. आगदी हे भाष्य करिताना सबळ पुरावे जवळ ठेऊन हे लेखन करू शकलो. संत तुकारामा सह संत संताजींनी जी सामाजीक, धार्मिक क्रांती केली. त्या क्रांतीच्या इतिहासाच्या पाना पानावर संताजींचे नाव कोरले आहे. वेद, स्मृती, श्रुती, पुराणे, मिताक्षरी या हिंदु धार्मीक धर्म ग्रंथांना ही लाज वाटेल इतके प्रबळ अभंग तुकोबांचे आहेत. ही वास्तवता अनेक विद्वान मान्य करतात. आणी या वरिल धर्मग्रंथांना ही फटकारताना असेच तुकोबाचे अभंग आहेत. हे लेखन फक्त तुकोबाचे आहे. हे काही बाबतीत मान्य आहे. काही बाबतीत या साठी की पंडीतांनी मोडीचे रूपांतर देवणागीरीत करीताना काही बदल ही केलेत. काही अभंग तुक्या बंधु या नावाने समाविष्ठ झालेत. काही प्रेमा पोटी काही ही लढाई बोथट करावी म्हणुन त्यात आहेत. हे सर्वआपवाद त्यात आहेत. तरी सुद्धा हजारो अभंग आज सामाजीक क्रांतीची धगधगती मशाल म्हणुन तेवत आहेत. हे तेवत ठेवण्यात संत संताजींचा सहभाग महत्वाचा हे असे त्यांनी का तेवत ठेवले ? ते मुळात या महायुद्धात सामील का झाले याचा शोध व बोधकेला तरच हा मानव समजुन येऊ शकतो. अन्यथा फोटो पुजना पुरता टिळा व माळ घालण्या पुरता जय संताजी जय कार करण्यापुरता श्री. जय संत संताजी ही संत संताजींच्या जिवन कार्यातील फक्त एक दोन क्षण. परंतु उभे आयुष्य पणास लावणारा महामानव हे का करू शकला असेल. त्याचा शोध घेणे महत्वाचे. संत नामदेवांनी अनुभव कथनाला चांगली जोड देऊन किर्तन ही वाट निर्माण केली. यातुन जी समाजातील धार्मीक समतेची क्रांती झाली त्याचा प्रभाव शेकडो वर्ष होता. त्या काळातील सामाजीक राजकीय व्यवस्थेत याची खरी पाळे मुळे आहेत. जमीनदारी ही त्यावेळची गावपातळीवर दरारा ठेवुन होती. ही जमिनदारी त्या परिसरातील सरदाराचे अंकित होते. सरदार हे मुसलीम राजवटी बरोबर बांधिल होते. ही राजवट चालवणारे ब्राह्मण होते. संत एकनाथांचे गुरू जयराम स्वामी हे मुस्लीम सत्तेत बडे आधिकारी व हुकमत गाजवणारे होते. राज्य कारभारात हुकमत असल्याने धार्मीक कार्यात ही हुकमत होती. धर्म सत्ता राबवली जात होती. तेली समाजाने काय करावे व काय करू नये याचे नियम कडक होते. वेदांचा किंवा तशाच धर्म विचारांचे शब्द ही कानावर पडू नयेत. वाचन तर नकोच हे जर केले तर जबर शिक्षा जनमा पासुन मेला तरी मिताक्षरी मध्ये सांगितल्या प्रमाण वागावे. जसा आपल्या कमाईचा हिस्सा सरदार तर्फे राजाला द्यावा तसाच मठात, मंदिरात द्यावा. मग तुम्ही किती कष्ट केले. तुम्ही कस जगला याला किंमत शुन्य होती. विचार करावयाचे स्वातंत्र्य नव्हते पैसा साठवण्यासाठी स्वातंत्र्य नव्हते घाण्याचा येणारा कर आवाज तो कानावर यऊ नये यासाठी गावाच्या मावळत बाजुला रहावे. घाणा घेताना कपडे तेलकट होतात म्हणुन तुमची सावली ही पडु नये. तेली आडवा आला तर अशुभ मानावे एवढे कडक नियम संत संताजींनी संस्कारक्षम वयात अनुभवले होते. या मानवतेला काळीमा फासणार्या या विकृत बद्दल त्यांच्या मनात प्रचंड आशी चिड या ठिकाणी निर्माण झालेली होती. माझे मानवतेचे अधीकार नाकारता हा व्यवसाय हे माझ्या जगण्याचे साधन या साधनाला तुम्ही अशुभ समजता. म्हणजे माझे जिवनच अशुभ समजता. तुम्ही किती ढोंगी आहात. तुम्ही किती मतलबी अहात. तुम्ही किती लबाड आहात. सुर्याला झाकुन तुम्ही मीच तो सुर्य सांगतात. कारण आम्ही तेल निर्माण करतो म्हणुन तुम्ही जगु शकता. आम्ही तेल निर्माण करतो म्हणुन देवळातील नंदादिप तेवता रहातो. आम्ही तेल निर्माण करतो म्हणुन रात्रीचा अंधार नष्ट करण्यास दिवा जळतो. आम्ही आहोत म्हणुन तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणुन आम्ही नव्हे. हिच खरी ठिणगी संताजींच्या मनात पेटली. ती पेटली म्हणुन अधीकार नाकारणार्यांचे ते कर्दनकाळ ठरले.