ब्राह्मणी व्यवस्था ही देव संकल्पनेवर आधारीत आसते. आणी या संकल्पनेचा तो सुर्वण काळ होता. त्या व्यवस्थेलाच नुसते नाकारणे नव्हे तर तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत. हे सांगणे म्हणजे त्या व्यवस्थेला पुरते खिंडीत पकडणे होय. ज्या व्यवस्थेने अधीकार नाकरले त्या व्यवस्थेलाच शब्दशः लाथाडणे ही खरी पराक्रमी माणसाची वाटचाल आसते. या विषयी बरेच अभंग आज शिल्लक आहेत. प्रश्न इथे असा आहे. संत तुकारामांची योग्यता, त्यांच मोठे पण सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे. परंतु म्हणुन संत संताजींना चौदा टाळकर्या पैकी एक समजने व त्यांना संकुचित करणे हाच या महान मानवावर अन्याय करणारे आहे. संत तुकाराम श्रिमंत घरात जन्मले होते. दुष्काळ हा पैसे कमविणयाची महान संधी आसते. त्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्यांनी आपली धान्याची कोठारे दुष्काळ ग्रस्तांना दिली. याही पुढे जाऊन तुकोबांनी नक्की काय करावयाचे याचे चिंतन करून आपल्या वाट्याला येणार्या सावकारी कागदपत्रे नदीत फेकुन कर्जदारांना कर्ज मुक्त केले. या दोन गोष्टी तुकोबा व संताजी एक होण्यास कारणीभुत ठरल्या आहेत. एक साधी बाब इथे नेहमी बाजुला रहाते. दोन चांगले मित्र एकत्र येतात तेंव्हा ते मुळात समविचारी आसतात म्हणुन. ते एकमेकांना समजुन घेतलेले असतात. एकमेकांची पारख केलेली आसते म्हणुन ते मित्र होताना त्यांना नक्की आपण कोण व काय करणार याची पुर्ण जाणीव झालेली आसते. आपण हे का व कश्यासाठी करतोय याचा स्वत:ला त्यांनी बांधील केलले आसते. इथे संत तुकाराम अमानवी व्यवस्थेला मानवी व्यवस्था म्हणजे काय हे पटवुन देणसाठी उभे होते. संत संताजी हे सुज्ञ होते. संत संताजी हे माणुस ओळखु शकणार होते. ती जाणीव सोबत्या बरोबर जेवढी होते. तेवढेच अंगभुत ही असावी लागते. जसे आडात पाणीच नसेल तर पोहरा तरी काय करणार ? संत तुकाराम ज्या विचाराणे चालले होते. त्या विचाराची बैठक मुळात संताजी कडे होती. संत संताजींना या ठिकाणी अजुन दुर्लक्षित केले जाते ते म्हणजे ते विचाराचे जेवढे पक्के होते तेवढेच दिले सोबत तोडणारे नव्हते. विठ्ठल हा नुसता विश्वास नव्हता तर विठ्ठल हेच सर्वस्व होते. त्या वेळच्या व्यवस्थेमध्ये सोवळे ओवळे होते. सोवळ्या व ओवळ्यात देव बंधीस्त केला. तप व जप यामध्ये सर्व ज्ञान व मुक्ती होती हे सर्व खोटे आहे. वेद म्हणजे तुमचा धर्म. हेवेद जेंव्हा नव्हते तेंव्हा विठ्ठल होता. वेद नव्हतें तेंव्हा पंढरपुर होते. या पंढरपुर मध्ये मोठा माणुस लहाणाच्या पाया पडतो पुरूष स्त्रियाच्या पाया पडतो. जात पात विसरून जाती बाह्य ठेवलेल्यांच्या ही पाया पडले जाते. हि समता विठ्ठला जवळ दिसते. असली समता तुमच्या शाास्त्रात तुमच्या जवळ दिसत नाही. तर तेथे विषमता दिसते. संत तुकारामांनी या विषमते बाबत युद्ध पुकारले या युद्धाचा शेवट आपणच करणार कारण या अन्याया विरोधात आपण सुरवात केली. आणी संत संताजी व संत तुकाराम एकत्र आले व लढले त्याला ही मुळ बैठक आहे. ही बैठकच उध्वस्त करण्सयासाठी संत संताजींना तुकोबा पासुन दुर करण्यासाठी त्या वेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने कंबर कसली होती. त्याची काही उदाहरणे आहेत. संत तुकोबाना निंदा नालस्ती करणे. आगदी स्त्रिया वर हाल्ले करणे. या मध्ये संत संताजी यांची धर्म पत्नी ही सुटली नाही. तुकोबा व संताजी यांच्या मध्ये फुट पडत नाही या साठी नाके बंदी ही केली असेल संताजी एक तेली तेली आडवा जाणे त्यांचे तोंड पहाणे हे किती अशुभ आहे हे ही धर्मशास्त्राचा आधार घेऊन त्यांनी पटवून दिले असणार. परंतु साम, दाम दाखवून ही समतेची ठिणगी विझत नव्हती तर उलट संताजी तिला वाढवत होते. कारण या व्यवस्थे विरोधात लढताना संत तुकोबा बरोबर जे नैतिकबळ हवे होते ते संताजी कडे होते. ते बळ होते म्हणुन खोटी प्रतिष्ठा खोटे पांडित्य, खोटा मुखवटा, खरा व खोटा धर्म या बाबत ब्राह्मणी समाज व्यवस्थेतला एक शुद्र त्यांच्यावर जेंव्हा तुटून पडतो तेंव्हा संत संताजी हे कपाळाला टिळा, गळ्यात माळ व नुसते टाळ वाजवत फिरत नव्हते. ते पलायनवादी नव्हते, ते सर्वस्व पणाला लावणारे होते. घाण्याला बैल जंपून कष्ट करून जगणारे होते. या व्यवस्थेने अशुभ ठरवलेले. तुम्ही मला अशुभ ठरवणारे कोण, तुम्ही मला शुद्र ठरवणार कोण ? हे तुकोबांच्या अभंगातील विचार जन माणसात रूजवारे एक जाणते बांधव होते. तुम्ही मला अशुभ ठरवता हे अशुभ तुमचे धर्मशास्त्रा प्रमाणे ठरवता. देवाने जन्म दिला तेव्हा आमचे नशीब घडविले सांगता त्या देवाचे आम्ही बाप आहोत. हा आसला खोटा पण तुकारामांनी चव्हाट्यावर मांडला संताजी लाटा आपल्या अंगावर झेलत होते अमानवी व्यवस्थेच्या ठिकर्या करीत होते. हे संत संताजींचे मोठे पण झाकोळले आहे.