स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भ्ााग 1) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
शैक्षणीक स्वातंत्र्य, धनसंचय स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य सामाजीक स्वातंत्र्य, शेवटी राजकीय स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असेल तर माणुस माणुस म्हणुन जगु शकतो. देवाचा जो अभास करून भव्य दिव्य उभे केले जाते. त्यात माणसाचे मोठे पण दाखवले जाते. यापेक्षा अतीउच्च स्वातंत्र्य. संत जोगा परमानंद यांच्या कडे जाण्यापुर्वी यादव कालिन एक प्रसंगाची तोंड ओळख मांडतो. तेली समाजाच्या मतावर निवडूण गेलेल्या मा. फडवणीस यांनी बाबासाहेब पुरंदरे या नावाच्या ब्राह्मण्याला प्रतिष्ठा देऊन इतरांना तुच्छतेत ठेवणार्याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला. त्यांचे शिवचरित्र डोळस पणे पाहिले तर समजुन येईल त्यांनी शिवाजी राजांना स्वातंत्र्यासाठी मदत करणार्या मध्ये बारा बलुते आलुते व दलित आशा एकशे चव्वे चाळीस मंडळीं साठी एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाही एवढी पाने खर्च केली नाहीत. परंतू ब्राह्मण्याचे उदात्तीकरण कण्यासाठी शेकडो पाने खर्च केलीत. यादवांच्या काळात स्त्रीयांचे जीवन सुखी होते. घराला दारे नव्हती त्यामुळे कुलप नव्हते. बाराही महिणे लक्ष्मी महाराष्ट्रावर चांदण शिंपत होत्या. आशा प्रकारे त्यांनी वर्णन केले आहे. तर यादवांचा काळ म्हणजे बोपदेव हेमांड यांचा ब्राह्मण्याचा काळ. या ब्राह्मण्यांचे सुख हे गगनाला भीडले होते. पण दुसर्या बाजुस इतर समाज हे लुळे पांगळे होते. याची जाणीव शिवचरीत्रात पुरंदरेना ना ब्राह्मण्य व मराठा यांच्या शिवाय झाली नाही. विचारांचे पारतंत्र्य लादण्याचे हे महाराष्ट्र भुषण हे समजेल तेंव्हा समजेल तर आपण यासाठी जोगापरमानंद पहात आहोत. श्री. संत नामदेवांनी यादव राजे, बोपदेव हेमांड या ब्राह्मणांच्या टाचे खालील समाजाला जागे करावयास किर्तन ही पद्धत निवडली आशा वेळी ते पंजाबात गेले. बराच काळ ते वास्तव्यास होते. या वास्तव्यात त्यांना जोगापरमानंद भेटले त्या काळात त्यांनी ही व्यवस्था नष्ट करण्यास समाज मन घडवीले. सामाजीक, धार्मीक स्वातंत्र्यासाठी जागृती केली. त्यामुळेच संत नमदेव यांचे अभंग शिखधर्म ग्रंथात आहेत. हे जोगा परमानंद नामदेवा बरोबर महाराष्ट्रात आले. नामदेवांच्या सामाजीक व धार्मीक स्वांत्र्यात ते शेवट पर्यंत होते. बार्शी येेथे त्यांची आज भग्न अवस्थेत समाधी आहे. स्वातंत्र्याची सुरूवात ही संत नामदेवा पासुन सुरू झाली त्यात समाजाचा योद्धा सामील होता. हे विसरता येणार नाही.