स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 2 ) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्य हे एका एकी येत नसते. स्वातंत्र्य जावून गुलामी एका रात्रीत येत नसते. त्यासाठी दिर्घ काळ समाज मन घडत आसते. स्वातंत्र्याचे मन घडत असण्यात संत नामदेव संत जोगापरमानंद जसे मुळ आहे. हे संत तुकारामांनी आपल्या स्वप्नातील द्रिष्टां द्वारे नमुद केले आहे. व कवित्व सत्याचे केले, कवित्व स्वातंत्र्याचे केले, कवित्व सामाजीक हक्काचे केले. कवित्व राजकीय जाणीवांचे केले. पुरंदरंनी शिवचरित्र नावाच्या बखर सारख्या पुस्तकात जो देखावा उभा केला आहे. तो किती खरा किती खोटा हे तुकारामांच्या अभंगावरून सामाजीक जाणीव समोर येते. बहामनी राजाचे पाच तुकडे झाले. ही राज्यक्रांती झाली या राज्य का्रंतीत अहमदशाह व निजामशहा हे मुळचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते. रायबान नावाची विदर्भा मधील स्त्री ही शिवाजींच्या विरोधात लढणारी ब्राह्मण स्त्री होती गुलाम गीरीला प्रतिष्ठा देणारी होती. ब्राह्मणातील कोणती जात मोठी कोणती लहान मग जात कर्मे कुणी कुणाची कशी व कोणत्या भागाची करावीत या साठी ग्रामण्य भरत यात ब्राह्मणात मार्या मार्या होत. रक्त पात होत आसे स्पष्ट प्रबोधनकार ठाकरे यांनी नमुद केले आहे. मुरार जोगदेव हा ब्राह्मण होता यानेच पुण्याचा सत्यानाश करून गाढवाचा नांगर फिरवुन उलटी पहार लावली होती. मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर जे मुसलीम सरदार दिल्ली वरून आले. त्यांनी अनेक कर्मकांडे केली. दिल्ली ते पुणे दरम्यानच्या काळात शेकडो ठिकाणी ही कर्मकांडे झाली. पुण्यात आल्या नंतर कर्मकांडांचा कळस गाठला. भरमसाठ दक्षिणा घेऊन छत्रपती शिवराय यांचे स्वातंत्र्य संपून टाकूण गुलामगीरी तशीच रहावी या साठी ब्राह्मण्य गुलामीच्या बाजुचे होते. शिवकाळात गुलामी प्रतिष्ठीत ठेवण्यासाठी झटणार्या ब्राह्मण्याचा हा थोडासा भाग मराठे वतना साठी लढत होत. मराठे मुसलीम शासन व्यवस्थेतील भाग होते. या मराठापण व ब्राह्मण्य या मुळे तेली, माळी, कुणबी, सुतार नाभीक, परिट, कोळी, महार, या बहुसंख्य जाती भरडल्या जात होत्या. हे भरडणे नको म्हणून संत तुकारामांनी, संत संताजींनी मुळात सामाजीक धार्मीक राजकीय जागृती साठी इथे यज्ञ कुंड उभा केला. छ. शिवाजी महाराज यांचे संत तुकराम, संत संताजी यांचा घनिष्ट सबंध होता. दक्षिणेच्या भिकेवर उभे राहून मातलेली ब्राह्मण्य व वतनासाठी वावरणारे मराठापण यातील फारच कमी सोबती शिवराया बरोबर होते. जे होते तेच मुळात बलुते, आलुते व दलित म्हणुन महात्मा फुले यांनी रायगडची समाधी शोधुन जो शिवरायांचा पहिला पोवाडा रचला त्यात काही बाबी त्यानी स्पष्ट मांडल्यात. परंतु ब्राह्मण्य पणाने पिछाडेल्या मंडळींनी आपले वर्चस्व अबाधीत ठेवण्यासाठी त्यांच्या शिवरायांच्या चरित्रातुन बलुतेदार, आलुतेदार व दलित यांना दडपुन टाकले आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे संत जोगापरमानंद संत संताजी गुलामी भोगणार्या साठी त्यांनी सामाजीक, धार्मीक व राजकीय पातळीवर स्वातंत्र्य मिळविण्या साठी कंबर कसली.