ताई तेलीण हेचे खरे नाव रमा तेली आसे होते पण त्या ताई तेलीण ह्याच नावाने जास्त सुपरिचित आहेत. ताई तेलीण ह्या तेली समाज जन्मलेल्या शुर विर स्त्री योद्धा होत. त्या औंध संस्थानच्या थोटे प्रतीनिधीच्या मंत्री होत्या. या पंतप्रतिनीधी थोपटेपंत आसे ही म्हंटले जात आसे. उत्तर पेशवाईत दुसरा बाजीरावाचे क्रुर शासन चालु होते. दुसरा बाजीराव म्हणजे अनिकतेचा दुसरा पुतळाच होता. सर्व रयत व सर्व सरदार ह्यांस कंटाळलेले होते. सन 1800 च्या नंतर दुसर्या बाजीरावाने कहरच केला होता. सन 1806 दुसर्या बाजीरावाने आपला सेनापती बापू गोखल्याच्या मदतीने प्रतीनिधीस आटक केले. व प्रतिनीधीस मसूरच्या गढीत कैद केले गेले पण ताईतेलीणीने गढीवर हाल्ला करून प्रतिनिधीस मुक्त केले. पण बंधनमुक्त झाल्यानंतर प्रतिनधींने ताई तेलीनी च्या सल्यावरून दुसर्या बाजीरावा विरूद्ध बंड पुकारले. तेव्हा दुसर्या बाजीरावाने परंतु बापु गोखले यांस पाठविले. बापु गोखल्याने पुन्हा त्यांस कैद केले. प्रतीनिधीस पुन्हा कैद झाल्या मुळे त्यांच्या सैन्याचे बळ खचले. प्रतिनीधीचे किल्ले व मुलुख हा पेशव्यांच्या हाती जाऊ लागला. तेव्हा सैन्याची सर्व सुत्रे ताई तेलीने आपल्या हाता एकवटीली व स्वत: वासोट्यांच्या किल्यावर सैन्य संचलन करू लागल्या. हा किल्ला आतिशय दुर्गम किल्या पैकी एक व चढाईस आत्यंत कठीण आसा होता. किल्यावर जाणारी ही वाट दुर्गम घनदांड अरण्यातुन जाते. व या ठिकाणी दुसर्या बाजीरावाने 50 हजारांची फौज बापु गोखल्याच्या नेतृत्वा खाली पाठवली. ताई तेलीन ची छोटीशी फौज व स्त्री फलटणीने बापु गोखल्यावर आचनक हाल्ला केला. बापु गोखल्याचा स्त्री पलटणी कडून पराभव झाला. व पेशवाईचा दुबळे पणा जगजाहीर झाला.
तत्कालीन कविनी रचेलेलया ह्या ओळी ताई तेलीनीच्या शौर्या विषयी बरेचसे सांगुन जाते.
कासोटा सुटणं हा वाक्यप्रचार त्या वेळी भंबेरी उडाल्यावर कुचेष्टेने वापरण्याची पद्धत होती.
पण काही महिण्यातच बापु गोखल्याने पुन्हा हाल्ला चढवला. त्यांने ह्या वेळेस वासोट्या जवळच्या उंच टेकड्यावर तोफा चढवल्या व तेथुन तोफेचा मारा सुर केला. परंतु ताई तेलीनेन न डगमता हा लढा चालुच ठेवला. पण अखेर किल्यातील धान्य गोदामाला आग लागुन. संपुर्ण आन्न धान्य नष्ट झाले. ताईतेलीणीने सुमारे आठ ते नऊ महिणे हा किल्ला लढविला. या युद्धात पेशवाईची आतोनात हानी झाली. आणि मुख्य म्हणजे पेशवाईचे सैन्य हे दुबळे आहे हे ब्रिटींशाच्या धान्यात आले. ब्राह्मणवादी इतिहासकार मात्र ह्या महान स्त्री विरांगणेचा कायमच द्वेषच करताना आढळतात.
ताई तेलिणीस कैद करुन पुण्यात आणल गेले. पुढे 1818 ला पेशवाई नष्ट झाली. या थोर स्वतंत्रायोद्धेस नम.
जय ताई तेलिण्ा
copy right © www.Teliindia.com व तेली गल्ली