प्रबोधन, रचना व संघर्ष या तिन सुत्रांचा ज्यांनी योग्य नियोजन करून वापर केला आहे. तेच घडन करू शकतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री. आनंद बाळाासोा देशमाने होत. स्वातंत्र्याची मुहर्तमेढ मावळातच शिवरायांनी रोवली, रोहिडा, राजगड, सिंहगड ही मावळातील खरी ताकद. पाया भरण्यासाठी कान्होजी जेधे सोडले तर कोणच मातब्बर सरदार बरोबर नव्हते. शिवराया बरोबर होते अलुतेदार, बलुतेदार याच मंडळींच्या पिड्यान पिड्या ह्याच परिसरात होत्या व आहे. परंतु नंतर शिवरायांच्या या विश्वासू मंडळींचा खरा इतिहास पुसन टाकला. आणि इतिहासातली आडगळ गाव गाड्यात कारू व नारू म्हणून ओळखली जात होती. सर्वस्व ओरबडलेला हा समाज जगण्याची लढाई एकांगी लढत होता. सिंहगडाच्या पायथ्याला कल्याण गावात चव्हाण, किर्वे, देशमाने घरे पिड्यान पिड्या रहाणारी. याच गावातले देशमाने रोजच्या जगण्याच्या लढाई साठी डोंगर दर्या ओलंडत राजगड परिसरातील वेल्हा ठिकाणी कै. हरिभाऊ देशमाने आले. पाऊसाळ्यात उभा पाऊस अंगावर घेत उभे राहिले. बाजार पेठेतील जागा शोधुन छोटे दुकान त्यांचे चिरंजीव बाळासोा. देशमाने यांनी सुरू केले. जगण्याचे, जगविण्याचे वाढविण्याचे साधन फक्त किराणा दुकान तुटपुंजे भांडवल परंतु वेल्हा तालुका ठिकाण असल्याने खेडो पाड्यातील माणसांचा संपर्क मोठा यातून व्यवसायीक गणीते जमु लागली. हक्काची भाकरी हक्काने मिळण्या एवढी बाजारात पत निर्माण केली. बाळासाहेब यांना तिन मुले व एक मुलगी.
वेल्हा बाजार पेठेतील छोट्या घरात आनंद देशमाने लहानाचे मोठे झाले. घरातल्या किराणा दुकानावर लक्ष देत ते दहावी पास झाले. शिक्षण घेण्याची इच्छा होती. परंतु नसरापूर येथे जावून पुढील शिक्षण घ्यावे लागत होते. घरात दुकानचालवणे त्या शिक्षणा पेक्षा मोठे होते. श्री. आनंद यांनी दुकानाला पसंती दिली. आणी आपले सर्व लक्ष दुकानावर केंद्रीत केले. यामुळे घराला घरपण येऊ लागले. हा काळ 1993 चा होता. भांडवल कमी या कमी भांडवलावर उभे राहून गिर्हाईकाशी संबंधीत राहून विश्वास संपादन केला होता. याच दरम्यान आडगळीत ठेवलेल्या इतिहास पुसून भुगोल हिसकावून घेतलेल्या समाजाला मंडल आयोग मंजुर झाला. मंडल मंजुर झाल्या नंतर समजले आपल्याला आरक्षण मिळाले. आरक्षण म्हणजे तरी काय ? ज्या समाजाला शेकडो वर्ष कोपर्यात डांबून ठेवले त्या समाजाला सत्ेत, सामाजीक क्षेत्रात आर्थिक क्षेत्रात संधी देणे. पुढारलेल्या समाजा बरोबर येण्याचा हा मार्ग ओबीसी म्हणुन मिळणारी संधी ही कोणतया पक्षा मुळे नव्हे तर आपण मागास आहेत म्हणुन जन्मसिद्ध हाक्क आहे. तो कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. आरक्षण मिळवणे व त्याचा उपयोग स्वत: साठी करण्या पेक्षा प्रथम समाज पहिला पाहिजे ही जाणीव श्री. आनंद याना झाली. आता समाजकारण, राजकारण काय आसते हे कळण्या साठी ते गाव पातळीवर 2002 मध्ये वावरू लागले. समाज कारणातून बरेच शिक्षण घेऊ लागले. या शिक्षणातून एवढेच शिकले की सत्तेत जायचे तर पहिला आपल्या तेली, माळी, सुतार, कुंभार, नाभीक, परिट या आपल्या जाती पाहिजेत. त्याच बळावर अर्थीक बलवान असलेल्या मराठा समाजाची सोबत. ही सर्व जुळवा करून ते 2004 मध्ये ते वेल्हा ग्रामपंचायत सदस्य झाले. सर्वांना सोबत घेऊन पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडले गेले. तेंव्हा त्यांनी जि.प. चे नियम व निधी यांचा अभ्यास केला. मला मिळालेल्या या संधीचा लाभ माझ्या गटात गेला पाहिजे. डोंगरी विकासाचा निधी वाड्या वस्त्यावर घेऊन जाण्यात त्यांनी आघाडी घेतली. मुरलेल्या मराठा लॉबीला जे सहज शक्य नव्हते त्या विकासाच्या वाटा त्यांनी डोंगरी भागात वळवल्या या मुळे पुणे जि. प. मध्ये आपली नवी ओळख भक्कम बनवली.
मी तेली आहे, मी तेली आहे म्हणुन ओबीसी आहे. मी ओबीसी आहे म्हणुन सत्तेत आलो ही सात काळजातील साठवण म्हणजे श्री. आनंद देशमाने होत. भोर व वेल्हा व खंडाळा या परिसरातील बांधवांनी तेली समाजाचे संघटन चांगल्या पद्धतीने केलेले समाज विखुरलेला. समाज रोजची भाकरी कष्ट करून जगणारे कै. अण्णा धोत्रे यांनी संघटनेचे रोपटे लावले होते. श्री. कृष्णा शिणगारे हे सभापती असताना त्यांनी हे माझे पद माझे नाही तर एक तेली म्हणुन मिळाले आहे. माझ्या पदाचा, माझ्या सत्तेचा उपयोग समाजाला झाला पाहिजे त्यांनी संस्थेकडे लक्ष दिले होते. श्री. आनंद देशमाने जि. प. मध्ये असताना राजकीय पक्ष या पेक्षा समाज मोठा हे माणनारे,. भोरच्या या समाज संस्थेला जि. प. मार्फत निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. यातुनच सर्व समाज बांधवांचे सहकार्य घेऊन भोर येथील समाज वास्तुस खा. सुळे यांच्या खासदार फंडातून निधी मिळु शकला ही बाब ते नम्र पण नमुद करतात. भोसरी येथील श्री. विजय रत्नपारखी यांची मुलगी वैजयंती सौ. देशमाने झाल्या. शेलार, पोपटराव पिंगळे, सुभाष शिंदे, रविंद्र शिंदे या मंडळींचा नात्याचा विचाराचा संबंध आला यामुळे तेली समाजाच्या आचाराची एक दिशा समोर आली. नुसते वधु-वर मेळावे या एकाच साच्यात कार्यरथ रहाणे या विचारावर न थांबता ते संताजी उत्सव व इतर समाजीक कार्यात सहभागी होऊ लागले यामुळे सुदूंबरे संस्थेचे अध्यक्षश्री जनार्दन जगनाडे यांनी त्यांची निवड संस्थेच्या आमसभेत त्यांची सन 2015 च्या उत्सव अध्यक्ष पदी निवड झाली. हे अध्यक्ष पद मिळाल्या नंतर त्यांनी विकासाचा प्रथम अभ्यास केला. साडे आकरा कोट रूपये शासनाने नुसते मंजूर केलेत. सर्वच आले नाहीत. काहीनी मधेच दुसरीकडे वळवले आहेत. प्रशासकीय अडचनी यावर समजून घेऊन त्यांनी स्थानिक आमदार, पंचायत समीती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व सुदूंबरे येथिल सरपंच यांना विश्वासात घेऊन अडचनी दुर करावयास सुरवात केली. सुदूंबरे संस्था अध्यक्ष व पदाधीकार्यांना सोबत घेऊन निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे साडे आकरा कोट रुपये जे पुर्वी मंजुर झाले होते त्यातीलच 50 लाख रूपये प्रशासकीय प्रक्रियेतुन संस्था विकासाला मिळवण्याचा खडतर प्रवास पुर्ण केला. काही दिवसात हे पन्नास लाख रूपये शासना तर्फे सुदूंबरे येथे खर्च होत आहे. त्यांनी हे स्पष्ट केले शासनाच्या व समाजाच्या सोबतीतुन या ठिकाणचा रखडलेला विकास पुर्ण करू. कारण ही संकल्पना आम्ही भोर येथे राबवून सिद्ध केली आहे.
राजकारण व समाज कारण हे एकत्र बसुन विश्वासातून साकारले तर मिळालेला मंडल आयोग मिळालेले आरक्षण आपण समाजहिता साठी राबवू. एक सयंमी परंतु विचाराने पक्के असलले नेतृत्व समाजाचे सौ. वेजयंती देशमाने ग्रा. पं. सदस्य असुन त्या ही त्यांच्या बरोबरीने समाज कार्यात सक्रिय आहेत. श्री. आनंद बाळासाहेब देशमाने यांच्या समाज विकास वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.