स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 4) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नगर जवळील भिंगार भींगारची वेस त्या वेशीजवळ भाऊसाहेब पतकी यांचे घर या घराजवळ क्षिरसागर यांचे घर घर कसले तर मातीने सारवलेल्या भिंती त्याावर गंजलेले पत्रे. दोन तीन पातीली एक तेलाचा डबा त्या जवळ बसलेले वयोवृद्ध क्षिरसागर. मी त्यांना जेंव्हा पाहिले तेंव्हा या स्वातंत्र्याची किव करावी वाटली. या स्वातंत्र्य वीराने इंग्रज अधीकारी गोळीबार करतोय म्हणून ती गाडीच उलथी पालथी केली. या पैलवान बांधवाचे पायच कायमचे निकामी केले. शिक्षा भोगावी लागली स्वातंत्र्यात मिळाले काय तर हे बुड टेकत चालणे. मी समाजातील स्वातंत्र सैनिकांचा इतिहास गोळा केला. त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध केले. पण यातील बर्याच जनांच्या घरात आपल्यात स्वातंत्र्य सैनक होते याची जाणीव पुसट होत चालली आहे. त्या घरात ही अवस्था तर समाजाला किती जाणीव असावी. राहिला उच्च समाज त्यांनी तर यांना कधीच वजा करून टाकले आहे. इतिहास आपल्या सारखा लिहीला तर भुगोल उभा आसतो ही वास्तवता त्यांच्या रक्तात असल्याने त्यांनी आपली सोय पाहिली. आपली भविष्यातील गैरसोय करून ठेवली. क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री ससरकार मधील अरग जि. सांगली येथील रामचंद्र विभुते एक होते. स्वातंत्र्यात त्यांना काय मिळाले. अशी शेकडो उदाहरणे मी जवळ ठेऊन आहे. आगदी स्वातंत्र्यपुर्व काळात आपण भारत मुक्त करीत आहोत. स्वातंत्र्य मिळवत आहोत. जात, पात, धर्म व भेद विसरून स्वातंत्र्य मिळवायचे आहे. ही प्रणाली होती. स्वातंत्र्यात झाले काय ? ओबीसींचे हाक्क म्हणताच नेहरू, पटेल यांनी नकार दिला. पटेल म्हणाले ओबीसी जात समुह म्हणजे काय ? आणी उच्च जातींनी इथे पहिले आपली फसवणुक केली. अभिजन वर्गाच्या विरोधात बहुजन ही शब्द प्रणाली राबवली. आपन बहुजन आहोत. आणी या बहुजात आम्ही मराठे श्रेष्ठ आहोत. ही भुमीका आपले स्वातंत्र्य गिळु लागली. गावात रहावयाचे असेल तर आम्ही सांगेल तसे रहा. आम्ही सांगु त्यालाच मत . चिरबंदी वाड्यातील करडी नजर ही ब्राम्हण्याच्या नजरे इतकीच मतलबी होती. स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य दिन व प्रजास्ताक दिना दिवशी झेंड्याला सलाम करण्याचा फक्त अधीकार, क्षत्रिय जातींची बनलेली काँग्रेस 1977 मध्ये प्रथम कोसळली बहुसंख्येने निवडून आलेल्या मंडळींनी या देशाच्या संवीधानाला अनुसरून मंडल आयोग नेमला. हा नेमताच अभिजन वर्गाची पहिली सावध भुमीका हीच गुलाम गीरी आपल्या पुन्हा लादण्याची खरी सुरूवात आहे. ती सत्ता उध्वस्त करून भाजपा नावाच एक गारूडी उभा केला. आपला विकासाचा मंडल आयोग कोपर्यात ठेऊन राम मंदि हा विचार प्रभावी केला. आपण विकासाचा मंडल आयोग कोपर्यात ठेऊन राम मंदिर हा विचार प्रभावी केला आपण सर्व हिंदूच. रामावर प्रेम करणारे होतो पण या ब्राह्मण्याने आपले स्वातंत्र्याचे हाक्का पासुन दूर जाणयासाठी राम मंदिर प्रभवी केले. जो मंडलने विकास दिला होता तो कोर्टात गोठवणारे हेच ब्राह्मण प्रभावी होते. आपले स्वातंत्र हिरावुन घेणारे ते जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आमची तयार झालेली विचारांची गुलामगीरी ही जबाबदार आहेत. बलुते समाज हा शेतकर्याला मदत करतो म्हणुन तो त्याला सुगीत धान्य देत होता. अलुत्यांचे तसे नाही. यातील बरेच पारंपारिक व्यवसायीक किंवा कष्टावर जगणारी मंडळी. या मंडळींचा व्यवसाय चाललातर ते तग धरू शकतात हा समज निर्माण केलला आगदी यातील बर्याच जातींना बाजार बुनगी समजले जात होते. आणी स्वातंत्र्यात आशा या समाजाला चिरबंदी वाड्यातून आदेश सुटत बाजार बुनग्यांनी राजकारण करू नये. ह्या आदेशाला पाया खाली चुरगाळणारे बीड जवळील नवगण राजूरीचे स्वातंत्र सेनानी सोनाजीराव क्षिरसागर व कै. केशरकाकु क्षिरसागर जरूर अपवाद आहेत.