ओतुर ता. जुन्नर या बाजार पेठेच्या गावात. रविशेठ या नावाला जशी किंमत तशी समाज पातळीवर ही आहे. कै. बाबुराव कर्डीले यांनी कष्टावर दोन मुले डॉक्टर केली. याच वेळी शिक्षणाची उमेद घेऊन रवींद्र शेठ शाळेत जात होते. शाळेची पुस्तके ही प्रगती पथावर घेऊन जात होते. परंतु भावांचे शिक्षण पुर्ण झाले पाहिजे ही वडीलांची इच्छा. या इच्छे मुळे वडिला बरोबर व्यवसायात रमु लागले. जवळ फक्त शिक्षण दहावी पास. या बळावर ते व्यवसायात शिरले. पुस्तकी ज्ञाना पेक्षा शिक्षणाची मोठी शाळा आसते भाकरीची शाळा. या शाळेत ते हळु हळु उभे राहु लागले यातूनच पहाता पहाता जीवनाच्या शाळेत ते पिएचडी पर्यंत शिक्षण घेऊ शकले.
ओतुरच्या बाजारपेठेत साखरेचे ठोक व्यापारी बनले. किराणा दुकानात ठोक व किरकोळ विक्रीत ते नावाजलेले. लग्न सराई किंवा इतर सिझन मध्ये त्यांचे तोंड सहज दिसू शकत नसे. इतके गिर्हाईक समोर आसे. विश्वास व पत म्हणजे रवीशेठ ही त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे. आपला व्याप संभाळुन ते सहकारी पत पेढीत सल्लागार होते. ओतुर शाखेतील बॅकेचे ते सल्लागार ही होते. ओतुर व्यापारी संघटनेत ते काही काळ अध्यक्ष ही होते. या मुळे अनेक व्यक्ती बरोबर त्यांचा संबंध आला. व्यवसाय उभा करण्यास ते मार्गदर्शन व सहकार्य केले. याची जाणीव आज ही ओतुर बाजार पेठेत फिरताना होत आसते. समाज अक्षरशा झोपला होता तो जागा करावा म्हणुन पुणे किंवा इतर ठिकाणी धडपड करणारी मंडळी ओतुरला येत तेंव्हा या धडपडीला साथ व सोबत रवी शेठ यांची आसे. आशा सर्व उपक्रमात ते क्रियाशील रहात आसत. आगदी तेली गल्ली मासिकाला ओळख पाळख नसतानाही त्यांनी सहकार्य केले. आपल्या ओतुर गावचा समाज संघटीत असावा म्हणुन ते पर्यत्नशील आसत. ओतूरच्या समाज संस्थेचे ते काही काळ पंच म्हणुन ही काम करू शकले. त्यांना 1) शेखर, 2) रत्नाकर, 1) सौ. वैशाली 2) सौ. दिपाली, 3) सौ. रूपाली या मुली आहेत. आयुष्याची धडपड यशस्वी करीतानाच त्यांना अंर्धांगवायुचा त्रास झाला. आज अशाा अवस्थेत 8 वर्षे झगडत आहेत. त्यांची दोन्ही मुले श्री. रवी शेठच्या विचाराच्या वाटेने चालताना समाज कार्य, व्यापार व शेती पहात आहेत. श्री. रवीशेठ या जाणत्या समाज बांधवास आरोग्य लाभो ही सर्वा तर्फे प्रार्थना.