पारनेर तालुक्यात कान्हुर पठार हे गाव. गावाला व्यापाराची एैतिहासिक बैठक. आजूबाजूच्या गावांचे हे केंद्र स्थान. गाव तसे मोठ्या हमरस्त्या पासुन दुर गाव तसे पाऊसाने झीडकारलेले. परंतु व्यापारी पेठ असल्याने अनेक व्यवसायीक व पारंपारीक उत्पादन कर्ते समाज आपली मुुळे रोवुन पिड्यान पिड्या उद्योग धंदे करणारे. पुर्वी गावाला करडी, शेंंग पिकाने वरदान होते. दारात एक दोन बैल घाणे. जोडीला शेती या उद्योगावर विसंबुन राहून शेकडे वर्ष तेली समाज वावरत होता. बदलत्या काळात करडी गेली, शेंग पीक ही गेले जोडीला यंत्र युग आले. तेल घाने बंद पडले. बागायती शेती नाही जीराईत शेतीवर जगण्याची धडपड यशस्वी होत नव्हती. आणी या साठी या गावातली काही घोडके मंडळी निंबळक, चास नगर, पुणे व इतरत्र स्थीर झाले. ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ते रमले परंतु हे सर्व घोडके बांधव आपल्या कान्हूर पठार या मातीला विसरले नाहीत. यात्रा जत्रा व इतर धार्मीक कामात एकत्र येतव आपन सर्व घोडके आहोत ही माया देत व घेत आसतात.
मागच्या जमान्यातील अनंत बापुजी, दत्तात्रय बाळाजी, दुर्गाजी पांडुरंग, बबन बापुजी, जिजाबा पांडूरंग या मडळंनी समाजातील मतांचा भेद न करता एक मत ठेऊन गावात व परिसरात समाजाची चांगली पत ठेवली होती. या पतीवर वाट चाल सुरू होती. पारंपारीक तेल घाना बंद पडला. आशा वेळी मग किराणा भुसार, रॉकेल विक्री, पिठाची चक्की कोणी ट्रान्सपोर्ट व्यवसायात उभे राहु लागले. व्यवसाय भिन्न झाले. पण धडपड तिच राहिली. यामुळे गावाच्या प्रत्येक बाबतीत समाजाचे मत विचारात घेतले जाते. समाज मताची जाणीव ठेवली जाते 1) श्री. मुरलीधर अनंत, 2) बाळकृष्ण अनंत 3) मंदाकिनी पांडूरंग 4) भारत घोडके हे ग्रामपंचायत सदस्य म्हणुन काम करु शकले. गावाच्या विकासात सहभागी झाले व होतात. उमेश घोडके व भारत घोडके हे पत संस्था संचालक म्हणुन गरजू सभासदांना पत पुरवठा करून आर्थीक विकासाला हातभार लावतात. यादवांची भवानी माता ही महाराष्ट्राची माता. परंतु देवगीरीवर हाल्ला झाल्या नंतर ती धोक्यात आली म्हणून तीला नगर जवळ बुर्हानगर येथे तेली बांधवांनी सुरक्षित ठेवले. धामधुमीच्या काळात ती सुखरूप ठेवण्यासाठी तुळजापूरला राहिली. इथे ही हाल्ला सुरू झाला. आशा वेळी सुद्धा तेली बांधवांनी शिरतळ हातावर घेतले होते. याच मुळे तुळजापूरची भवानी माता नवरात्रीत ज्या पलंगावर झोपते तो पलंग व ज्या पालखीत बसुन छबीना खेळते ती पालखीचा मान तेली बांधवांचा आहे. ही एैतिहासीक बाब व एैतिहासीक परंपरा. घोडेगांव, ता. अंबेगाव येथे पलंग बनवला जाातो. हा पलंग मान सन्मानाने जुन्नर, आळे, राजुरी मार्गे जात असताना कान्हुर पठार येथे येते या साठी पुर्वंपार पलंगाला गावात वाजत गाजत आणने. पलंगाची व भक्तांची व्यवस्था करणे ही कामे पुर्वी समाज बांधव करीत आसत. परंतु जागृत झालेल्या आजच्या सुज्ञ घोडके बांधवांनी या सन्मानाला विधायक रूप दिले आहे. फक्त गावातील समाज बांधवांची स्वेच्छा निधी गोळा करून महाप्रसाद व इतर खर्च भागवणे. नुसता जय जयकार न करता समाज प्रबोधन पर व्याख्यान सुरू केले. समाजाच्या अडीअडचनी सुख व दु:ख हे सर्व वाटून घेतात. या मुळे घोडके परिवार एक रूप आसते. यासाठी घोडके परिवारातील सर्व श्री. मुरलीधर अनंत, दिनकर अमृत, शशीकांत मुरलीधर, बाळकृष्ण काशीनाथ, सिताराम दुर्गाजी, लक्ष्मण गंगाधर, गजानन सदाशिव, बाळासोा सदाशीव, संतोष सखाराम, संदिप बाळकृष्ण, सचिन बाळकृष्ण, गोकुळ श्रीधर, भारत मुरलीधर, उमेश पांडुरंग या सर्वांनी एक विचार वाट चाल सुरू केली पुणे ग्रामिण तेली समाजाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेठ व्हावळ यांनी मेळाव्या साठी अन्नदानाची विनंती केली. या वेळी व्यक्तीने मदत करण्यापेक्षा कान्हुर पठार, नगर, निमगांव येथील या परिवाराने सह विचार करून ही जबाबदरी पूर्ण केली.या बद्दल घोडके परिवाराचे सर्वा तुर्फे अभिनंदन.