नगरच्या पारणेर तालुक्यातील आळ कुट्टी हे गाव हाम रस्त्यावरून आत आज ही प्रवासासाठी स्वत:चे वहान असेल तर ठिक नाहीतर वाट पहात जावे लागते. पण गावाला आज चांगले बाळसे आलेले. हे बाळसे खाच खळग्याचा रस्ता पार केल्या शिवाय समजत नाही ही. आजची अवस्था परंतु त्या काळी कै. शामराव धोत्रे यांनी आपली तुटपुंजी शेती पाहिली. पाऊस नाही म्हंंटले तर त्यावर फार मोठा अन्याय होत नव्हता. त्या कोरडवाहु शेतीवर धोत्रे राबत होते. मिळालेल्या धान्यावर घर चालवत होते. घराची ओढाताण संपविण्यासाठी मिळेल ते काम किंवा जमेल तो व्यवसाय करून घर उजाळू पहात होते. त्यांना दोन मुले 1) श्री. बाळासाहेब 2) श्री. सुनिल ही हाताशी आले. गावात पिठाची गिरण सुरू होती. पिठाच्या गिरणी मुळे इलेक्ट्रीक मोटार व इलेक्ट्रीकयाचा संपर्क आला. स्वत:च्य व्यवसाया पुरते तंत्रज्ञान समजुन घेतले. गावाला व गावच्या शेतीला पाण्याची तहान भागविण्या साठी बदलत्या काळात सोय होवुु लागली लिफ्ट इरिकेशन मुळे इलेक्ट्रीक मोटार ही अमृत वाहीनी आली. लिफ्ट सुरू करणे, दुरूस्ती, रिवायडींग या कामाला अनुभवी माणुस गरजेचा झाला. या बदलत्या काळाची जाणीव श्री. धोत्रे कुटूंबीयांना झाली. आणी पिठाची चक्की चालवता चालवता दुरूस्ती व रिवायडींचा टप्पा आत्मसाथ. कलेचा उपयोग त्यांनी या क्षेत्रात करावयास सुरवात केली. शिक्षण गरजे पुरतेच परंतू अत्मसात करण्याची वृत्ती व विश्वास हा चोख कामातून कमवता येतो हे संस्कार त्यांना इथे उपयोगी आले. या मुळे आळेकुटी या गावात नव्हे तर 25/30 किलोमिटरच्या परिसरात नदीच्या पाण्याचा लिफ्ट मुळे विकास होत होता. त्या सर्व परिसाला धोत्रे हे आपले वाटू लागले. नगर शिरूर या लांबच्या ठिकाणी जावून जो वाजवी दर मिळू शकत नाही. जो विश्वास मिळू शकत नाही. ती सर्व जबाबदारी धोत्रे बंधु घेत होते. त्या मुळे पिठाची चक्की जाऊन इलेक्ट्रनिक मध्ये चांगलाच जम बसला छोट्या दुकानाचे रूपांतर मोठ्या दुकानात करावे लागले. साध्या दुकानाचे रूपांतर शोरूम मध्ये झाले. चोख व्यवहार मुळे टेस्को मोटर्स या प्रख्यात कंपनीने पुर्ण पारनेर तालुक्याची डिलर शीप देऊ केली. आणी विविध कंपन्यांनी या दुर्गम गावात आपली पाऊले उचलली. आणी आज पारनेर व जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे केंद्र म्हणजे धोत्रे बंधु तयार झाले. या मुळे आळेकुटी या गावाची ओळख सर्वा समोर आली आहे.
कै. शामराव धोत्रे यांनी काबाड कष्ट केले तरी काही विचार रूजवले होते हेच विचार व आचाराची शिदोरी धोत्रे बंधुनी घेतली. आपली आर्थीक परस्थीती सुधारून शेतीला आधुनिक रूप देऊन भरघोस उत्पन्नाचे साधन बनवले आपला व्यवसाय वाढवला. कै. शामराव हे धार्मीक वृत्तीचे होते तीच परंपरा धोत्रे बंधुनी संभाळली आहे. महाराष्ट्राची दौलत भवानी माता तेली समाजाच्या पुर्वजांनी महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहीला परंतू तो मतलबी लोकांनी पुसट केला. त्या पुसट प्रक्रीयेत उरला फक्त पलंग व पालखीचा इतिहास. घोडेगांव जुन्नर आळेफाटा मार्गे आळेकुटी येथून पलंग जातो. या पलंगाचे स्वागत करणे. भक्तांची सोय करणे. महाप्रसाद देणे ही सर्व जबाबदारी धोत्रे बंधु अत्मीयतेने करतात सामाजीक प्रक्रियेत त्यागी वृत्ती दाखवतात. गतवर्षी पुणे जिल्हा पश्चिम विभागाची कुटूंब परिचय पुस्तीका प्रसिद्ध झाली. या एैतिहासिक कार्यक्रमात त्यांनी मोठे योगदान दिलेले होते. पुणे, नगर, नाशीक, ठाणे या परिसरातील ग्रामिण बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री. चंद्रकांत शेठ वाव्हळ याच्या नेतृत्वा खाली वधु वर मेळाव्याचे नियोजन केले जाऊ लागले. संयोजक आळेकुटे येथे आले. सहकार्याचा हात मागीतला. जी जबाबदारी टाकाल ती पुर्ण करू आणी जबाबदारी विचारली प्रशस्त कार्यालय व व्यवस्था करण्यास त्यांनी योगदान दिले.
आळे कुटे गाव आडवळणाचे पण लोक संख्या जाणवावी एवढी या गावात धोत्रे व पिंगळे ही समाजाची फक्त दोन घरे. गावाला आपली प्रतिष्ठेची ओळख देऊन वावरणारे. धोत्रे बंधुंच्या मातोश्री श्रिमती सुमनताई शामराव धोत्रे आज दमल्या आहेत. त्या वर्षातून एक वेळ आपले सर्व नातलग एकत्र बोलवतात प्रेमाची देवाण घेवाण करतात स्नेह भोजन करतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊन, नविन इतिहास घडविण्याची प्रेरणा देतात. आशा सुजान धोत्रे बंधूंच्या वाटचालीस शुभेच्छा.