श्री. अविनाश कहाणे व्यवसायाला द्रुतगती दिली.

       ही गोष्ट असेल 25 वर्षापुर्वीची त्या वेळी सुदूंबरे येथे जाण्यास वहातुक साधने विरळ होती. संचालक मंडळ मुक्कामास आसे. मी ही मुक्कामास जाऊ लागलो. पांढरा स्वच्छ लेंगा शर्ट व डोक्यावर टोपी असणारे कै. तुकारामशेठ शिवराम कहाणे पहिल्या मुक्कामात भेटले. भजन किर्तनात सहभाग घेऊन ते पुन्हा शाळेला दिलेल्या खोलीत येत असत. आगदी मध्यरात्री पर्यंत पुण्यतिथीची तयारी सुरू आसे. सकाळी सकाळी लवकर उठून कामाला लागत. दिवसभर ते व डेस्क व डेस्क वरील पावती पुस्तक आसे. हिशोब वेळेत व चोख ठेवत. संस्थेचे खजिनदार म्हणुन त्यांनी किमान दशकभर कामकाज केले होते. सामाजीक जाणीव असलेले ते सुजान बांधव होते. ओबीसी प्रर्वगाला आरक्षण प्रणाली लागू नव्हती आशा काळात त्यांनी सलग 15 वर्षे राजगुरूनगर ग्रामपंचायत सदस्य पदी काम केले. खेड तालुक्याची आर्थीक वाहिनी असलेल्या राजगुरू सहकारी बँकेचे ते संचालक होते. काही काळ उपाध्यक्ष पदी ही काम करता आले. राजगुरूनगर ग्रामपंचायतीला पाण्याचा प्रश्‍न भेडसावू लागला तेंव्हा पाण्याच्या टाकी साठी जागेचा प्रश्‍न उभा राहिला. योग्य ठिकाणी मोबदला देऊन ही जागा मिळत नव्हती तेंव्हा तुकाराम शेठ यांनी स्वत: साठी खरेदी केलेली जागा त्यांनी ग्रामपंचायतीला पाण्याच्या टाकी साठी दिली. त्यांना  तिन मुले 1) दिलीप, 2) सुनिल, 3) अविनाश 

    कै.   तुकारामशेठ यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. पुर्वी खेडो पाड्यातील समाज बांधव मुंबईवर अवलंबून होते. कधी कधी एस.टीच्या गाड्या खेडला येत तेंव्हा खेडोपाड्यावर एस.टी. गेलेली आसे. परंतु या वेळी शेठ समाज बांधवांना विश्रांतीला जागा देत. प्रसंगी त्यांच्या जेवणाची सोय ही करीत असत या समाज सेवेचा वारसा घेऊन श्री. अविनाश तुकारामशेठ यांनी जीवनाची वाट सुरू केली. संस्कारक्षम वयातच ते व्यवसायाकडे वळले. इयत्ता 10 वीत असतानाच ते वडिला बरोबर ट्रान्सपोर्ट मध्ये लक्ष देऊ लागले. पुढील शिक्षणाच्या वेळी व्यवसायात जास्त शिक्षणासाठी कमी वेळ त्यामुळे पदवी मिळाली नाही. परंतू त्यांनी जीवनाच्या शिक्षणात अनुभवातून भरपूर शिक्षण मिळवले. स्पर्धेला कुठे तरी सुरूवात झाली होती. 1985 मध्ये खेड जवळ ब्रिटानीया बिस्कीटचा डेपो सुरू झाला. होता. त्या डेपोत माल आणने इतरत्र पोहच करणे याचे काम मिळाले. वेळ व विश्‍वास या बळावर ते या दर्जेदार कंपनीच्या विश्‍वासास पात्र ठरले. या मुळे किस्कोप आर. के. या कंपीनीची एजन्सी मिळाली. त्याच बरोबर बिल केअर या कंपनीची सुद्धा एजन्सी बरोबर होती. यामुळे महामार्गावर किंवा खेडो पाड्यात माल पोहच करू लागले. खेड व चाकण या परिसरात कारखानदारी येऊ लागली. तयार होणारी यंत्रे त्या साठी लागणारा कच्चा माल यासाठी खात्रीशिर म्हणुन अविनाश कहाणे यांचे कहाणे ट्रान्सपोर्ट हे कारखान्याना दिसू लागले. आणी शेड वजा पत्र्याच्या खोलीत सुरू झालेली कहाणे ट्रन्सपोर्ट डौलदार पणे प्रशस्त जागेत उभे राहिले. आणी व्यवसायाला एक दर्जा आला. व्यवसाय संस्कृती जोपासली पाहिजे ही कै. तुकारामशेठ यांची शिकवण व्यवसाय कोणता कसा या पेक्षा तो आपण किती आपला माणुन करतो यावर त्याचे व आपले भवितव्य अवलंबुन आसते. पुर्वी घरात फटाका, गणपती, राखी स्टॉल होते. जवळ भांडवल येताच त्याला उलाढालीचे स्वरूप आले. किरकोळ वाटणारा व्यवसायांत 28 ते 30 लाख रूपयांची उलाढाल होत आसते. ब्रिटायानीयाची महाराष्ट्रभर वाटचाल ते करू लागले आर. के. कंपनीची घरपोच सेवा करीताना त्यांना मानसिक आनंद मिळतो.

    संस्कार क्षम वयात ते व्यवसायात उभे राहिले. फक्त व्यवसाय न पहाता सामाजीक जाणीव त्या ही पेक्षा ते मोठी मानतात. रोटरी क्लब ही देशभर सेवा व त्याग करणारी संस्था आहे. या सेवाभावी संस्थेत ते सहभागी झाले. गरजूना मोफत औषध उपचार करणे गरजू विद्यार्थांना मदत करणे, नैसर्गीक अपत्तीच्या वेळी मोठी भुुमीका बजावणे. आशा या संस्थेत श्री. अविनाश यांनी प्रवेश केला. सेवा व त्याग या बळावर ते कार्यरथ राहिले त्यामुळे ते रोटरी क्लब या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. हे पद सहज किंवा वशीला लावून मिळत नाही तर ते व्यक्तीच्या सामाजीक बांधीलकीतून मिळते म्हणून ते आज येथे कार्यरत आहेत. परंतु राजकारण हे क्षेत्र जाणीव पूर्वकदूर ठेवले. त्यातील वाटचाल मनाला बरी वाटत नाही. कष्ट करून पैसे कमवावेत त्यातील किमान चार पैसे विधायक कामा साठी खर्च करावेत ही संस्कृती ते जपत असतात पहिला राजगुरू नगर येथे महाराष्ट्रात ग्रामिण वधुवर मेळावा आयोजीत केला तेंव्हा ही त्यांनी एक समाज बांधव म्हणुन आपला सहभाग दिला. पुर्वजांनी सामाजीक जाणीव ठेऊन समाज वास्तु जतन केलेली या वास्तुच्या उभारणीत आपला सहभाग देऊन इमारत पुर्णत्वाकडे जाण्यास प्रयत्न केले. सर्वत्र द्रुत गतीने समाज संघटीत होत आहे. त्याला आपले एैतिहासीक शहर ही मागे नाही. याचा अनुभव गत वर्षी आला, शहरातील बांधवांनी एकत्र येऊन. महाराष्ट्र पातळीवर वधु-वर मेळावा घेण्याचे ठरविले. या स्तुत्य उपक्रमात श्री. अविनाश कहाणे सामील झाले. आपला व्यवसाय बाजुला ठेऊन ते क्रियाशील राहिले आणी शहरी भागा एवढेच ग्रामिण सामज ही एकीच्या बळावर वाटचाल करू शकतो हे सिद्ध केले. सुदूंबरे संस्था, समाजाच्या विविध संस्था जवळ येतात कै. तुकारामशेठ कहाणे यांनी सुरू केलेल्या व्यवसाय व समाज सेवा हा रस्ता साधा होता परंतू आज त्यांनी सिमेंट कांक्रीटचा बनवला आहे. या ध्येय निष्ठ समाज बांधवाच्या वाटचालीस सर्वातर्फे शुभेच्छा.

दिनांक 11-02-2016 15:29:43
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in