तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग5)
प्रथम रामदास संत होते हे मी मान्य करतो. रामदास संत होते पण त्यांना काळजी हेती फक्त ब्राह्मण समाजा विषयी. त्यांच्या आयुष्याच्या धडपडीत तेच समोर येत आणी त्यांनी त्यांच्या जाती साठी काही करू नये नव्हे तर जरुर करावे. आणी आसे जरूर केले म्हणुन संत तुकाराम व संत रामदास यांची तुलनाच केली तर एक गोष्ट समोर येते. किती ही रामदासांना बहुजन समाजाला आपले करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जन माणसाच्या मनावर जे संत तुकारात कोरलेत ते भाग्य संत रामदासांना कदापी मिळाले नाही. जाता जाता एक गोष्ट नमुद करतो शहरी व ग्रामीण भागात बैठक नावाचा प्रकार रूजवला जातो. या साठी पत्रक बाजी नसते, जहिरात नसतो कुठे अव्हान नसते. फक्त फोनचा वापर करून ठरावीक दिवशी ठरावीक ठिकाणी बैठका आसतात. या मध्ये रामदासांचे महत्व व कार्य समोर ठेवले जाते. आपले अज्ञान व त्यांची चलाखी या ठिकाणी प्रथम पाहु मानव मुक्तीचा एल्गार करणारे तुकाराम व एल्गार बुलंद करणारे संत संताजी यांनी ब्राह्मणी पणला नुसते झिडकारले नाही तर धर्म शास्त्रे मातीत लोळवले. या विचाराचा मागोवा घेण्या पेक्षा ज्यांनी ब्राह्मणशाही रूजवण्याचा प्रयत्न केला त्याच रस्त्यावर जाऊन फकत् जय संताजी म्हणण्याची माणसीकता साध्य करता येते. हे का मांडायचे तर संत तुकाराम, संत संताजी, संत नमाजी, संत कडुसकर, संत गावरशेठ यांच्या धडपडीचा उपयोग शिवरायांना जरूर झाला म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांचा त्याग सुरू असताना संत रामदास कुठे होते ? हा इतिहास बारकाईने पाहाणे गरजेचे आहे. कारण पेशवाईत रामदासी पणाला प्रतिष्ठा आली. आणी त्याच वेळी संत संताजीनी जपलेले तुकोबांचे अभंग किर्तनात किंवा इतर ठिकाणी बंदी आली. सत्याचा आवाज दडवून टाकला गेला. याच दरम्यान एक गोष्ट नक्की घडली याला आधार आसा की तुकारामांना धर्मशास्त्रा प्रमाणे शिक्षा दिल्या नंतर ही शिक्षा पायदळी तुडवीणारे एका अर्थीने धर्म शास्त्र कुचकामी करणारे संत संताजीं होते. म्हणुन त्यांचे नाव ही पुसण्याचा प्रयत्न झला. तेली आडवा गेला चार पाऊले मागे जावे. तेल्याचे तोंंड पाहु नये.तेल्यांची वस्ती मावळत बाजुला असावी नियम कडक केले.