तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली. अगदी मी 1921 पासुन संघटनेची वाटचाल आभ्यासली आहे. 1921 मध्ये कै. विश्वनाथ चिंचकर यांनी केलेला पत्रव्यवहार ही पाहिला. तट व मत होते. समाजाची चार घरे गावात असतील चार बाजुला चार तोंडे असतात. हे वास्तव आहे. या पुढचा मुद्दा हे वास्तव पुसन आपन तेली एक होण्यास निघालोत तेंव्हा दु:खाच्या जागा ओळखुन त्या जखमेवर औषध पाहिजे. पण हे आसे झाले का ? झालेले असेल तर ते न झाल्या पेक्षा कमी आहे. काही सेवा निवृत्त मंडळी व इतर समाज बांधव हे पदाधीकार्यांच्या सेवेला हजर आहेत. पद मिळाले तरी वहावा नाही मिळाले तरी वहवा. पण एक प्रमाणिक पणा या मंडळींनी ठेवला तोच वादळाच्या केंद्राकडे घेऊन निघला. यातील बर्याच मंडळींनी हुजरेगीरे करणे. कुठे काय घडत आहे त्याला ते चविष्ट बनवुन जेष्ठा कडे पोहच करणे. एक दोन जणांचा तर हा दिनकर्मच झाला आहे. एक ठिक ही हुजरेगिरी एक वेळ मान्य करू. परंतु आपला संबंध नाही तेथे डेाकावून यांनी बर्याच ठिकाणी वादाची उपकेंद्रे निर्माण केलीत. निदान आज तरी पुणे पश्चिम जिल्हास्तरावर महाराष्ट्रात बर्या पैकी संघटन आहे व काम आहे. परंतु याच अध्यक्षा बाबात हुजरे मंडळींनी वातावरण र्निर्मीती करून अध्यक्षांना डोळ्यात पाणी आनावयास लावले . या ही पुढची बाब आशी या हुजरेगीरी मुळे त्यांच्या हाकेला समाजाची साथ कमीच. फक्त मी यांच्या जवळचा किंवा प्रांतिकचा एवढा मोठा पदाधीकारी ही यांची मस्तावलगीरी वादळात भरच टाकणारी ठरणार आहे.