तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)
आर. एस.एस. या संघटनेच्या मांडीवर मा. पंतप्रधान नरेंद मोदी बसले म्हणुन ते पंतप्रधान झाले. देशाला पोखरत आहेत की घडवत आहेत. हा विचार बाजुला ठेवु. ही आर. एस.एस. संघटना शंभरी गाठत आली तरी रजिस्टर नाही. पण अनेक वादळे अंगावर घेत रिमोट द्वारे देश चालवत आहे. आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले नसतील त्यामुळे प्रश्न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ? जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल. हक्क व कर्तव्य मी पदाधिकारी आहे. परंतु संघटनेची घटनाच पदाधिकार्याला माहित नसेल तर तो गोंधळाच कारण. मे 2016 मध्ये रणरणत्या उन्हात जेष्ठ महाराष्ट्रात फिरत होतेे. दुष्काळाचे उन्ह अंगावर घेऊन या फिरणार्या मंडळींचे कौतुकच केले पाहिजे. परंतु आपण नवीन नोंदणी केलेल्या संघटनेची लिखीत घटनेची एक प्रत किमान जिल्हा स्तरावर दिली असती तर वादळ आले नसते. खुलासे करावे लागले नसते. आगदी संघटनेची बांधणी करणारे कै. माधवराव पाटील, कै. खा. शांताराव पोटदुखे, कै. सौ. केशरकाकु क्षिरसागर यांच्या वंशंजाना सामाजीक जाणीव ठेऊन विश्वासात घेतल असते तर वादळ वारे सुटलेच नसते. वादळ आसे की जेष्ठ होताच मालक झाले का ही भुमीका काहीनीं मांडली.