25 वर्षा पुर्वीची गोष्ट गावकुस (तेली गल्ली ) मासिका साठी पायाला पाने लावुन फिरताना. कोल्हार भगवतीला पोहचलो. बाजार पेठेत सर्वांकडे गेलो परंतु सर्वांचा प्रश्न आपली ओळख नाही. अंधार पडु लागला होता. फिरता फिरता खिसा ही संपला होता. तेवढ्यात डोक्यावर टोपी अंगात नेहरू शर्ट व लेंगा घातलेले क्षिरसागर बांधव समोर आले आणी हे मासिक आपले आहे हे पटवुन देऊ लागलो. महा धडपडीतुन एकाने फक्त 30 रूपये दिले. मी एसटी कडे निघालो क्षिरसागरांचा अग्रह घरी चला जेवण करू आणी सकाळी जा नदीवरचा पुल ओलांडून दुसरे कोल्हारात गेलो. चार ही बाजुला उसाची पाचट वरती कसे बसे पत्रे. घरात त्यांच्या आई होत्या. दिव्याच्या उजेडात भाकरी बनवत होती. तीला वाईट वाटत होते मिच सांगितले मी अशाच घरात लहानाचा मोठा झालो आहे. आणी बाजरीची भाकर व हिरव्या मिर्चीचा खर्डा ताटात आला.
श्री. दत्तोबा क्षिरसागांराची ही आई. आज ही मी जातो तेंव्हा हा प्रसंग आठवल्या शिवाय रहात नाही. आणी मला ही आरे तुरे म्हंटल्या शिवाय करमत नाही. कारण आशाच अडचनीच्या घरांनी तेली गल्ली (गावकुस) मासिकाला मुुळात आपले म्हंटले आहे. श्री. दत्ताबांचे वडिल ते लहान असताना वारले. गावात फक्त एकच समाजाचे घर आईने कष्टाने घर चालवणे सुरू केले. दत्तोबा शाळा सोडुन घराला भाकर मिळावी म्हणुन कोल्हार भगवती गावात आले. एका समाज बांधवांकडे महिण्याच्या पगारावर शेतीचे काम करू लागले. पण हे ही काही दिवस एक दिवस एक बाजरीचे पोते घेऊन कोल्हारच्या आठवेडे बाजारात बसलेचार पैसे जवळ राहिले. सोनगांव, कोल्हार आशा बाजारातुन ते बाजरी विकु लागेले. जवळ भांडवल नसत्याने तेवढेच पोत घ्यायचे तेवढेच विकायचे हा क्रम सुरू केला. बाजार नसेल त्यादिवशी प्रसंगी गारी गार ही विकत असत. परिसरातील यात्रा जत्रा चुकवत नसत आणी यातुन घर सावरले. चि. चंद्रशेखर व उमेश यांना शिक्षीत केले. घराला पक्का आकार दिला. घरा शेजारच्या शाळे जवळ एक जनरल स्टोअर्स ही सुरू केले. आई व ते पाहु लागले. मुलांना बँकेचे सहकार्य घेऊन टेम्पों घेऊन दिले. आज ट्रान्सपोर्ट यशस्वी मुले चालवत आहेत. वडिलांच्या कष्टाचे दिवस संपवुन टाकले आज श्री दत्तोबा हे कोल्हार व आजुबाजुच्या जत्रा, उत्सव व यात्रा या काळात खेळण्याचे दुकान लावतात, राखी, गणपती, फटाकडे स्टॉल मध्ये चांगली कमाई करतात.
घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल.