- श्री. किशार दिगंबर काळे, श्रीगोंदा, जि. नगर
बौद्ध धर्माची पाया भरणी तेली समाजाने केली हा इतिहास आहे. त्याच्या र्हासा नंतर शंकराचायार्र्ंनी समन्वय साधला यातुन ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिक धर्माची सुरुवात झाली. यालाच काही वर्षीनी हिंदु ही बैठक मिळाली. याच काळात काही मुसलीम व्यापारी देशात आले. ते स्थीर स्थावर होत असताना काही सुफी संत ही आले. या संतांचा प्रभाव या देशाच्या संस्कृतीत पडू लागला. मुसलीम राजवटीत जेंव्हा आत्याचार बोकाळला सत्ता संपत्ती व हेकेखोर राजवटीत जेंव्हा अत्याचार बोकाळला. या वेळी संतांनी माणुसकीची शिकवण दिली. त्यापैकी संत शेख महंमद महाराज व संत मदोजी महाराज होत.
संत मदोजी महाराज हे जन्माने तेली होते. आपला पारंपारीक व्यसाय करीत होते. तेल, पेंड निर्मीती करून इतर भागाात जावुन विकणे येताना इतर माल घेऊन येणे तो आपल्या परिसरात विकणे. मुळ व्यापारी वत्ती कुशाग्र बुद्धीमत्ता या बळावर त्यांनी व्यापार क्षेत्रात विश्वास, नाव व पैसा कमविला होता त्यामुळे त्यांना सावकार ही पदवी जनसामान्याने दिली होती. अशीच वर्ष चालली होती. बैलाच्या पाठीवर तेल पेंड घेऊन बैलांचा तांडा घेऊन ते आपल्या परिसरातुन पर देशी गेले. व्यापार करून आपल्या घरी निघाले. सोबतीचे बैल सोबतकरी पुढे निघाले. वाटेत वसुली करून मुक्कामाच्या गावाला एकटेच घोड्यावरून निघाले. तेच मुक्कामाच्या गावा जवळच्या घनदांट जंगलातील वाटेतुन जाताना दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी आडवले व जवळची धनदौलत सहजा सहजी देत नाहीत म्हणुन त्यांना मार झोड केली ती इतकी अंगातुन रक्त वाहु लागले. ते तसेच बेशुद्ध पडले. दिवस मावळला आणी रात्र झाली ते तसेच पडले होते. योगा योग असा त्या गावात त्या दिवशी संत शेख महंमंद महाराज मुक्कामाला होते. सकाळी सुर्यदया पुर्वी गावच्या बाहेर या जंगलात ते प्रातंतविधीला आले. पहातात तर काय रक्तात पडलेले मदोजी चेहरा ओळखीचा वाटत होता. विव्हळण्याचा आवाज त्यांना शांत बसु देत नव्हता. हात व पाय लुळे पडले होते. जनु काही शरीराचा संबधच तुटला होता. संत शेख महंमद महाराजांनी क्षणभर विचार केला जवळ काय तर प्रांतविधी साठी आणलेले पाणी. ते पाणी त्यांनी घेतले जखमा धुतल्या. आणी त्यांच्याकडे असलेल्या अलौकीक शक्ती मुळे मादोजींच्या शरीरात चेतना आली. ते हालचाल करू लागले. काही काळात ते शुद्धीवर आले. समोर पहातात तर एक अलैकिक पुरूष.
त्या दिवसा पासुन ते संत शेख महंमद महाराजांच्या बरोबर राहु लागले. महाराज यांची श्रद्धा ही मानवतेची होती. रंजल्या, गांजल्या मानवाला उभे करणे ही यांची प्रणाली होती. जन्माने मुसलीम असुनही त्यांना पंढरीचा ध्यास होता. याच मुळे संत तुकारामांनी ब्राह्मण्या विरोधात जो संघर्ष उभा केला होता. त्यामुळे त्यांची संत तुकारामांची भेट होत होती. शिवरांयच्या स्वातंत्र्य युद्धात ते संत मदोजी महाराजा सह सामिल ही असतील कारण संत तुकारामांनी स्वराज्यासाठी छ. शिवरायांना सहकार्य केले होते. जनमानसात अजुन एक गोष्ट रूजली आहे. ती या ठिकाणीची आहेे. संत तुकाराम हे किर्तन करीत होते. किर्तन म्हणजे तरी काय ? किर्तन म्हणजे अनुभव कथन करणे. संत तुकाराम लोहगांव येथे ब्राह्मण्य पणा बद्दल जनजागृतीकरीत होते. या वेळी संत महंमद महाराज व संत मदोजी महाराज चिंतन करीत बसले होते. तोच संत महंमद महाराजांना जाणीव झाली. लोहगांवात संत तुकाराम यांच्या किर्तनात आग लावण्यात आली आहे. महाराज मोठ्याने ओरडले। यातुन एक गोष्ट स्पष्ट होते. सामाजिक परिवर्तनात संत महंमद यांचे योगदान असावे. त्यांसाठी संत मदोजी महाराज ही सोबतीला होते. संत मदोजीनी शेख महंमद यांची सेवा अखेर पर्यंत केली या चा अर्थ आसा होतो की. ही हिंदू मुस्लीम एैक्याची समाजसेवा करण्यात संत मदोजी महाराज यांचा ही त्याग मोठा होता. परंतु इतिहासाची साधने संपवली किंवा उपलब्ध फार कमी आहेत.
संत मदोजी महाराजांचे व संत शेख महंमद महाराज यांची गुरू शिष्याची जोडी होती. समाजीक, धार्मीक अध्यात्मीक कार्यात वावरत असताना संत शेख महंमद महाराजांना जाण्याची जाणिव होऊ लागली. त्यांनी ती मदोजींना जाणीव करून दिली. त्यावेळी शेख महाराजांनी सांगितले माझ्या समाधीचे दर्शन घेण्यापुर्वी पुर्वी मदोजींचे पहले दर्शन घ्यावे लागेल. आणी तसेच झाले आहे. महाराष्ट्रातील किंवा देशातील संत विश्वात असे एकच ठिकाण आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे सतम महमद महाराजांची समाधी आहे. समाधी साठी चांगले मंदिर ही आहे. या मंदिराच्या पायर्या चढुन गेल्यावर प्रवेश करण्या पुर्वी संत मदोजी महाराजांच्या समाधीची पायरी आहे. हिंदू व मुसलीम समतेची ही पायरी एका तेली बांधवाने आपल्या निष्ठेने त्यागाने मिळवलेली आहे. याचा आम्हा श्रीगोंदा वासियांना अभिमान आहे.
- श्री. किशार दिगंबर काळे, श्रीगोंदा, जि. नगर