शाब्दांकन : सौ. रूपाली राजेश काळे
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्यांचे हात ही घ्यावे
खरोखरचं ह्या कवितेतील ओळी नुसार तेली समाजाचे शिरोमणी अहमदनगर येथील मोठे व्यक्तिमत्व कै. मा. श्री. त्रंबक रघुनाथ दारूणकर उर्फ (तात्या).
तात्यांचा जन्म 5/6/1925 रोजी रघुनाथ व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. शालेय शिक्षण 11 वी पर्यंत पुर्ण करून त्यांनी टी.आर. दारूणकर सायकलमार्ट फर्म ची सुरूवात केली. 1945 मध्ये पंढरीनाथ करपे यांची कन्या सौ. द्वारका यांच्याशी ते विवहबद्ध झाले.
तात्यांना सुरूवातीपासुन समाजकार्य व राजकारण यांची आवड असल्यामुळे ते सतत समाजकार्यात सहभागी होत. पुढे टी.आर. दारूणकर अहमदनगरचे नगरसेवक झाले. तसेच त्यांनी 1 डिसेंबर 1962 ते 16 डिसंबर 1963 व 21 डिसेंबर 1964 ते 30 जुलै 1965 असे दोन वेळा महाराष्ट्रातुन प्रथमच पहिले तेली समाजाचे नगराध्यक्ष म्हणुन काम पाहीले. त्याचबरोबर जिल्हा क्राँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी ग्राहक भांडारचे चेअरमन व एस.टी.बोर्ड मेंबर वगैरे अनेक पद भुषविले त्याचप्रमाणे अखिल भारतीय शाहू तेली समाज दिल्ली या संस्थेत सदस्य म्हणुन ही त्यांनी काम केले. खरंच जीवनात प्रत्येकजन समाजाचे म्हणुन काही देणे लागतो. म्हणुन काही कार्य करतो. पण तात्यांना समाजाविषयी जाणिवच नाही तर तळमळ होती म्हणुन त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवुन दिले. जमेल त्याप्रकारे ते सर्व समाजबांधवांची तसेच समाजील गरजुंची मदत करायचे तिळवण तेली समाजाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी सतत 25 वर्षे कार्य केले.
आधी कराव आणि मग सांगावे
या उक्तीप्रमाणे तात्यांनी त्यांच्या काळातील जुने पत्र्याचे शेड व भिंतीवर विठ्ठल रुक्मीणीचे चित्र असलेले समाजमंदिर बिल्डींग नं. 1288 दोन मजली इमारत देणगी रूपात बांधली व त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मीणी, तुळजाभवानी, गुरूदेवत्त, संतोषी माता, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत जगनाडे महाराज अशा मुर्त्यांची स्थापना केली. यातुनही त्यांनी श्रद्धा, सेवा, त्याग भक्ती चा संदेश दिला.
समाजास टी. आर. दारूणकर हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. वैयक्तिक आयुष्यात देखील ते अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते. 5 मुली व 1 मुलगा असा मोठा प्रपंच असुनही ही त्यांनी समाजसेवा करताना त्याचा अडसर येऊ दिला नाही. त्यांनी सतत स्वत:ला समाजकार्यात झोकुन दिले. आणि हीच संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला म्हणजेच अरविंदला दिली. आणि दि. 26 जुलै 2001 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तो केवळ देहाने, तात्या आजही त्यांच्या शिकवणीने. संस्काराने आमच्यात आहे. आणि मला विश्वास आहे. मा. श्री. अरविंद त्रिंबक दारूणकर आपल्या वडीलांप्रमाणेच हा समाजसेवेचा वारसा चालु ठेवलीत शेवटी एवढंच म्हणेल
शिंपल्यात घालुन समुद्र
कधी दाखवता येत नाही
हातांनी काढलेल्या फुलांना
सुगंध कधी येत नाही
आणि खर्या भावनांचा उल्लेख
शब्दात कधी घेत नाही
अशा या संत शिरोमणीस माझा त्रिवार प्रणाम !