जामखेड तालुक्यातील पानाळी गाव या गावातून कै. खंडू देशमाने जामखेडला आले. येथे राऊत मेहुणे होते. देशमाने यांनी प्रथम निवार्याची सोय पाहिली व कुटूंबासाठी झटु लागले. त्यांना 1) बाबासाहेब, 2) दत्तात्रय 3) नवनाथ, 4) जालिंदर, 5) भाऊसाहेब 6) विश्वास ही मुले व 3 मुली असे मोठे कुटूंब ते संस्कारीत करित होते. श्री. बाळासाहेब देशमाने वडिलांच्या बरोबर बैलाचा व्यापार काही काळ केला परिसरात ऊस तोड मजुर होते. त्या साठी त्यांचे बैलगाडी हे साधन होते. त्यामुळे व्यपार बरा होता. परंतु बाबासाहेबांनी जास्त लक्ष संकरीत गाई खरेदी विक्री सुरू केली. यात ही जम बसविला. याच तपनेश्वर मंदिर रस्त्यावर रहात्या घरा मध्ये किराणा मालाचे दुकान सुरू केले. व्यापाराची संस्कृती जोपासत त्यांनी जामखेड मार्केट यार्ड मध्ये आडत दुकान सुरू केले. त्यामुळे शेतकरी बांधवांचा संपर्क वाढला. व्यवसायाच्या नव्या दिशा समोर आल्या. तालुक्यातील रस्ते, तलाव व सरकारी कामांचे ठेके घेऊ लागले. स्वत:चे जे.सी.बी. घेऊन त्यांनी कामाला सुरवात केली. वडिलांनी जामखेडला येऊन दहा एकर जमीन घेतली होती. त्यात अधिक 35 एकरची भर टाकली विश्वासाने देणे घेणे ही सोबतीला ठेवले. सरळ मार्गाने व्यवसायात भरभराटी केली. समाज कार्याची आवड असल्याने त्यांनी सलग 15 वर्ष जामखेड ग्रामपंचायतीचे सदस्य पद भुषवुण काही काळ सरपंच पद ही मिळवले. आज 3 मुले व एक मुलगी उच्च शिक्षित बनविले.
श्री. बाबा साहेब सर्वात मोठे घरातील भावंडांना त्यांनी व्यवसायात उभे करण्यास सहकार्य केले. आज सर्व कुटूंबातील मुले व मुली डॉक्टर, इंजिनियर म्हणुन उभे आहेत. सहा भाऊ असुनही एक विचार ठेवणे ही दुर्मीळ बाब समोर येते.