आठवडे बाजाराचे रूपांतर केले दिवटेंनी मॉल संस्कृतीत
पिड्यान पिड्या जोपासलेला तेल घाना घानवडीतुन उपसुन बाहेर ठेवण्याची वेळ आली तेव्हां समाजबांधवांनी पर्याय शोधले. यातील एक पर्याय म्हणजे भुसार मालाची ठोक खरेदी विक्री, गावात शहरात किराणा दुकान, अल्प भांडवलावर परिसरातील आठवडे बाजारात पाल ठोकुण किराणा माल विक्री. या आठवडे बाजारातुन अनेकांनी नंतर झेप जरूर घेतली आहे. परंतु आठवडे बाजार करता करता मॉल संस्कृतीला आपले करून त्या व्यवसायात मांड ठेवून वावरणारे कोणच मला भेटले नाही. हि सत्य बाब जवळ असताना या माझ्या सत्याला मान्य करता येणार नाही अशी वाटचाल संगमनेर येथील दिवटे परिवाराने करून दिली. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा.
संगमनेर जवळचे निभोणा गाव या गावात दिवटे कुटूंब तेल बिया गाळप करून वावरत होते. बदलत्या काळात हा व्यवसाय संपला. आशा वेळी कै. हरिभाऊ दिवटे यांनी आठवडे बाजार सुरू केला. निभोण आजुबाजुच्या परिसरात ते पाल ठोकुण किराणा माल विक्री करू लागले. कष्ट धडपड व प्रयत्न या बळावर ते उभे राहिले. संगमनेरच्या बाजारात ते पाल ठोकुण बाजार ही करित होते. त्यांच्या पत्नी लक्ष्मीताई या नावा प्रमाणे लक्ष्मी होत्या. 1) चंद्रभान, 2) सुर्यभान, 3) भानुदास, 4) बाळासाहेब या मुलांना संस्कारक्षम वयत घडविताना त्या दिवटे यांच्या व्यवसायात साथ सोबत देत होत्या. कै. हरिभाऊ यांनी विचार पक्का केला तुटपुंज्या शेतीला सोबत हा आठवडे बाजार किती पुरणार. हा दूरगामी विचार करून त्यांनी आपले रहाते घर व उशाला आधार म्हणुन ठेवलली शेती विकली. हे चार पैसे व अंगावरचे कपडे सोबतीला घेऊन ते संगमनेर मध्ये आले. या शहराला बाजारपेठ होती. या शहराला समाजाचा वावर जाणीव ठेवावा असा होता. पण ते समाज बांधवाच्या अश्रयास न जाता. ओळखी पाळखीवर सैय्यद बाबा चौकातील मोकळ्या जागेकडे वळले. शेत व घराचे पैसे देऊन ती जागा खरेदी केली. संगमनेरच्या बजारात ज्वारी, गहू व इतर कडधान्य विकु लागले. पुस्तकाच्या अभ्यासालुन विद्यापीठात पदवी मिळते. या पदवीवर त्या काळी शासकीय नोकरी ही मिळत होती. परंतु हक्काच्या भाकरीची पदवी आठवडे बाजारातुन मिळते. या पदवी साठी थोडे फार शिक्षण जवळ असावे लागते. एवढे झाले की माणुस वाचता आला पाहिजे. गर्दीच्या महापुरात खोटा पैसा कोणता खरा पैसा कोणता. समोरच्या गिर्हाइकाला पटवुन देऊन माल खपवायचा कसा हे गणीत सोडवता आले पाहिजे. बाजार पेठेतील तेजी मंदिचा विचार करूण खरेदी विक्री केली पाहिजे. कै. हरिभाऊ यांनी एक वेळ अंदाज घेऊन धाडस केले रताळी खरेदी केली. उपवासाचे दिवस होते. पुर्ण बाजार पेठेत फक्त यांचकडेच रताळी होती. इतरत्र मालच नव्हता. या मुळे उपवासाच्या त्या काळात गिर्हाईकाची झुंबड उसळली. दिवटे सांगतील त्या भावात रताळी गिर्हाईक खरदी करीत होते. आणी ते या व्यवहारात अपेक्षे पेक्षा यशस्वी ठरले. सय्यद बाबा चौकात साधे किराणा दुकान सुरू केले. जोडीला काही दिवस आठवडे बाजार होताच. या साठी कै. लक्ष्मीताईंनी जिद्दीने सोबत दिली त्यामुळे दुकानदारी व आठवडे बाजार यांचा मेळ होऊ शकलाा. चार ही मुलांना त्यांनी शिक्षणा बरोबर व्यवहाराचे धडे दिले. खरेदी करून विक्री कशी करावी व्यवहार साधता साधता माणुस कसे जोडावे हे ही शिकवले. वाढत्या कुटूंबाचा विचार करून नाशीक रोडला जागा खरेदी करून दुकनादारी सुरू करणे नगर रोडला व्यवसायीक जागा व बंगला खरेदी केला. निभोण येथुन आलेले कै. हरिभाऊ यांनी प्रगत व्यवसाय उभा करून संगमनेर शहराला व तालुक्याला आपली नवी ओळख करून दिली. व ते 1987 मध्ये वारले. यानंतर आगदी 1998 पर्यंत जीवाच्या अखेर पर्यंत कै. लक्ष्मीताई यांनी मुलांच्या व्यवसायात लक्ष दिले त्यांमुळे व्यवसायाला गती आली.
कै. हरिभााऊ, कै. लक्ष्मीबाई यांनी निभोणी येथून आपली मिळकत विकुण संगमणेर गाठले आठवडे बाजार पाल ठोकुन केला. हे वास्तव अनेक तेली बांधवा कडे आहे. आगदी आठवडे बाजारातील जाणती मंडळी म्हंटली की तेली समाजाकडे बोट दाखविले जाते. काळ बदलला बाजार पेठ गुजराथी किंवा मारवाडी मंडळींनी काबीज केल्या. हाक्काची ठेवणबजार झाला आणी बाजार करी हेलेबलु लागले. पण दिवटे परिवार हा काळाला शरण जाणारे नव्हेत तर काळावर मांत करून वाटचाल करणारे आहेत हे कृतीतुन सिद्ध करणारे ठरले. आज मॉल संस्कृती आली. संगणक युग आले. वेष्टनातील कंपनीचा दर्जेदार माल आला. स्वस्त, दर्जा यांची प्रणाली आली. अशी ही मॉल संस्कृती पुण्या, मुंबई सारख्या मोठ्या शहरात रूळली आणी ही संस्कृती तालुक्यांच्या शहरांकडे पाहू लागली. आणी किराणा दुकानात परंपारिक पद्धतीने विकला जाणारा माल हा भविष्यात गिर्हाईका विना विकला जाणार नाही ही वास्तवता समोर आले. म्हणजे काळ थांबविण्यासाठी आलेला. याच काळाला समजावुन घेऊन आपण पाऊले टाकली तर काळाच्या घौडदौडीवर मांड टाकू शकतो हे प्रथम दिवटे परिवाराने समजुन घेतले. याच मुळे आज संगमनेर शहरात एक दोन नव्हे तर एकुण चार शॉपी आहेत की ज्या ठिकाणी मॉल सारखी सेवा माल व विश्वास मिळतो. यातुन स्वत:ची प्रगती व अनेकांना ते रोजगार ही पुरवु शकतात. या परिवाराची वार्षीक उलाढाल ही 50 ते 55 कोटी पर्यंत अंदाजे गेली अहे. ही दुरदृष्टी कै. हरिभाऊ व कै. लक्ष्मीताई यांनी दिली हे अभीमानाने सांगतात.
व्यवसाया बरोबर सामाजीकबैठक ही ठेवतात श्री. रमेश दिवटे हे संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे सह सचिव आहेत. संगमनेर शहर समाजाच्या विकासात सहभाग घेतात. संगमनेर येथुन गेली 4/5 वर्ष समाजाची दिनदर्शीका सोबत्यांना घेऊन पुर्ण करतात श्री सोमेश्वर हे सामाजीक व राजकीय कार्यात सहभागी असल्या मुळे ते संगमनेर शहराचे नगर सेवक म्हणुन कार्यरथ आहेत. दिवटे परिवाराच्या वाटचालीस सर्वा तर्फे शुभेच्छा.