डॉ. अमोल वसंत भांडकर :- पाथर्डीच्या वसंत भांऊचे हे डॉ. अमोल चिरंजीव हे मुळात एम.डी. पदवी मिळवलेले आहेत. विमान नगर परिसरातील दर्जेदार हॉस्पीटल मध्ये ते एक तज्ञ डॉक्टर म्हणुन ओळखले जातात. वडगांव शेरी येथिल पाण्याच्या टाकी जवळील सुंदराबाई हायस्कुल समोर स्वत:चा सुसज्य दवाखाना आहे. स्वत: स्किन स्पेशालीस्ट आहेत. नैसर्गीक केसा सारखे ते केस रोपन ही करतात कै. बबनराव भांडकर व श्री. वसंत भांडकर यांची समाजसेवेची एैतिहासिक परपंरा ही चालवत आहेत. पुण्या सारख्या शहरात स्क्रीन स्पेशालीस्ट कमी आहेत यात यांचा पहिल्या पाच मध्ये नंबर लागतो.
श्री. ज्ञानेश्वर दहितुले :- अकोल्यात उभा पाऊस अंगावर घेऊन वावरणार्या घरात जन्म घेतला वडिलांच्या जगण्याच्या धडपडीला साथ सोबत देत शिक्षण पुर्ण कलेले. त्यांना नव्या वाटा शोधण्याची गरज निर्माण झाली. ते पुण्याच्या वाटेवर आले. यानवख्या पुण्यात त्यांना किर्लोस्कर सरख्या कंपनीत नोकरी मिळाली एक कामगार म्हणुन ते उभे राहु लागले. परंतु नवे क्षितीज निर्माण करणे. निर्माण केलेले वाढविणे या साठी प्रथम माणुस पुर्ण वाचता यावा. त्यांच्या अंगातील कार्यक्षमतेचा उपयोग करावा. ही संस्काराची शिदोरी त्यांनी स्वत:च्या बळावर निर्माण केली. याच बळावर त्या वेळच्या ओसाड भागावर म्हणजे आजच्या सुख सागर परिसरात त्यांनी वर्कशॉप सुरू केले. हाताला काम देणे कामाचे मोल देणे. म्हणजे कामगार संभाळणे यासाठी व्यवसायीक गणीते ते स्वत: शिकले या शिक्षणातुन त्यांनी घराची प्रगतीचे पाऊले उमटवली. अकोल्यातुन पुण्याचे क्षितीज दिसले. पुण्यात आल्यावर किलोस्कर कंपनीचे क्षितीज दिसले. या कंपनीत स्वत्:चे क्षितीज निर्माण करता येणारे क्षितीज दिसले. हे ही क्षितीज त्यांना शांत बसु देईना. त्यांना देश व्यापणारे क्षितीज हाक मारत होते. याच वेळी देशी उत्पन्न असलेली शेती साठी पुरक औषधे, निरोगी जगण्यासाठी असलेली काही देशी परंपरेत तयार झालेली उत्पादने करणारी नेट सर्फ नुकतीच कुठे सुरू झाली होती. श्री. दहितुले यांनी या नव्या क्षितीजाकडे झेप घेण्याची इच्छा निर्माण केली. आणी त्यामध्ये सुरूवात केली. आज या सुरूवातीला 16 वर्षे झालीत या सोळा वर्षीत किमान 7 लाख कुटुंबांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिला या सात लाखात तेली समाजाची किमान 4/5 हजार कुटूंबे आहेत. या सात लाख कुटूंबा द्वारे ते 4/5 कोटी बांधवांचे आरोग्य संभाळून ते शेती उत्दपादन निरोगी वाढवत आहेत. या साठी नुसते पुणे नव्हे तर पुर्ण देशभर ते फिरत आसतात. आज त्यांची जिद्द, धडपड आपले क्षितीज रूंदवण्यासाठी करावे लागणारे कष्ट जेंव्हा मी स्वत: पाहिले तेंव्हा क्षणभर आवाक ही झालो. अकोले, पुणे व पुर्ण देश कवेत घेणारा हा समाज बांधव ही समाजाची साठवण.
श्री. शिवाजीराव क्षिरसागर :- पुण्यात आले ते पोलिस खात्यातील अधीकारी म्हणुन पुणे शहर व महाराष्ट्रात ते पोलिस उच्च अधीकारी म्हणुन कार्यरथ होते. या काळात त्यांनी अनेक गुन्हेगारांचा शोध घेतला. निवृत्त होण्या पुर्वी ते कोकणात चिपळुण येथे कार्यरथ होते. येथेच सेवा निवृत्त झाले. निवृत्तीच्या शेवटच्या काळत कोकणात होते. कोकण व घाट या मध्ये असलेला उभा सह्याद्री पर्वत ही संबंधात अडचन होती. पुर्वी नाती गोती सहसा त्याच भागात असत. ओळख पाळख ही तेवढीच महाराष्ट्र तेली महासभा ही तेथे नावाला ही नव्हती. परंतु क्षिरसागर यांनी रत्नागीरी, सिंधुदुर्ग व गोवा या परिसरात संघटना या परिसरात खर्या अर्थाने उभी केली. या यशाचे श्रेय हे त्यांचे एकट्याचे आहे. तेली महासभेच्या सेवा आघाडीचे ते अध्यक्ष ही आहेत. खा. रामदास तडस यांचे एक निष्ठ विश्वासु आहेत. पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील वधु -वर मेळाव्यासाठी त्यांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक कष्ट ही घेतले आहेत.
श्रीधर काळे :- पुण्याची गुलटेकडी व त्या टेकडी जवळच्या डायस प्लॉट हे जेंव्हा पाहिले तेंव्हा जगण्याची धडपड समजली. झापेडपट्टी म्हणजे काय हे समजुन आले. या ठिकाणी सायकलचा ढिग व एक पत्र्याच्या शेडला लटकवलेली श्रीधर सायकल मार्ट ही पाटी. आगदी सुरवातीच्या धडपडीला सोबत मिळाली. म्हणुन श्रीधर काळे स्मरणात राहिले. श्रीगोंद्यातुन नशीबाची सत्व परिक्षा पाहावयास ते पुण्यात आले. नात्या गोत्याचा सहवास सोबत ठेवुन ते उभे राहिले. जनता दल, जनता पक्षाचे ते कार्यकर्ते बनले. चळवळीच्या संघर्षात वाटचाल करू लागले. आपल्या व इतर झोपड पट्टीचे आरोग्य, स्वच्छता, रेशनींग कार्ड या सारखे सामाजीक प्रश्न घेऊन ते उभे राहिले. तेली समाज कार्यात ही ते हजेरी लावत असत. धनकवडी येथे काही एकरात त्यांनी हौसिंग सोसायटी उभी केली. त्या सोसायटीला मुर्त स्वरूप येण्या साठी झटले म्हणुन ती सोसायटी श्रीधर सोसायटी म्हणुन ओळखली जाते इथे त्यांनी शंकराच्या मंदिरा जवळ टुमदार बंगला. ही उभारला परंतु आज ही ते आपल्या श्रीधर सायकल मार्ट या दुकानाशी सबंधीत आहेत.