भिंगार हा नगरचा भाग मोगल काळातही मोगलांचे केंद्र व ब्रिटीश काळातही भिांगर कॅम्प ही इंग्रजांची शक्ती. गावाच्या वेशीजवळ तेलाचे घाणे. घाण्यातले तेल विक्रीसाठी लगेच बाहेर दुकाने. दुकान तरी कसले ढिगा सारखी ठेवलेली पेंड. पातेल्यात तेल संपले इंग्रज अधिकारी येणार पैसे न देता माल नेणार उलट बंदुकीचा धाक. काशिनाथ नामदेव देवकर हा नामदेव देवकरांचा मुलगा. त्या तरूण रक्ताला हे खटकल. गावातील तालमीत येजा त्यात ब्रिटीश विरोधी सुर दिसुन आला. हा जाच आपलाच नाही तर हा जाच या देशाला आहे. आणी तो दुर करण्यास धडपड चालु आहे. ते यात सामिल झाले.
ब्रिटीश राजवट उलथुन लावण्यासाठी जनजागृती महत्वाची त्यावेळी बुलेटीन वाटप कणरणे ह महत्वाचे काम होते. ते ही गुप्तपणे. ते वाटताना पाहिले तर ब्रिटिीश ससेमिरा मागे लागे. ते काम देवकर यांनी केले. चळवळ वाल्यांना पकडणे तयांचा ठावठिकाणा हुडकणेहे काम बहुत करून तार व फोनवर चाले. देवकर यांनी ते होऊ नये, स्वातंत्र्यासैनिक सापडु नयेत यासाठी ब्रिटीश आपला कारभार जेथे-जेथे चालवत तेथे- तथे आकस्मित छुपा प्रवेश करून व्यत्यय आणू लागले. याचा परिणाम त्यांना अटक व शिक्षा ही झाली.
तुरुंगातून आल्यावर ही ते तेच करीत. छकडा चालवून जगू लागले. या स्वातंत्र्याच्या यज्ञात आपला त्याग दिला.