संगमनेर मध्ये 1926 मध्ये यांचा जन्म झाला. 1938 पासुन राष्ट्रसेवा दलाचा संपर्क आला. यातुन खर्या अर्थाने प्रबोधन झाले. राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. देशासाठी त्याग करण्याचा निर्धार तयार झाला. 1941 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. त्यात ते सहभागी होऊ लागले परंतु लहान वय म्हणुन सहभागास नकार दिला
.
घरात गरिबी सुख-शांतीने नांदत होती. गरिबी जावी आणि समृध्दी यावी यासाठी काही करावे हे विचार त्यांच्यात रूजत नव्हते. तर देश स्वतंत्र्य करू ही वृत्ती जोपासली गेली. 9 ऑगष्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधींनी शेवटची हाक दिली. ही दिली म्हणुन इंग्रजांनी त्यांच्यासह अनेकांना अटक केले. संदेशहोता करा किंवा मरा. स्वातंत्र्य या विचारावर बंदी होती. ते विचार मांडणारे पेपर बंद होते. बुलेटिन तयार करणे ते वाटणे इंग्रज राजवटीवर व्यंगचित्रे काढुन ती जागोजागी लावणे. इंग्रज यंत्रणेच्या तारा तोडल्या. यावर समाधन कसे होणार यांचा ग्रुप नाशिकला भूमिगत होऊन गेला. रेल्वेची लाईनच बंद करावयाची 1/2 कि.मी. रेल्वे रूळांना ग्रीस लावले. आणि ही इंग्रजांची यंत्रणा ही बंद पाडली. इंग्रजी संस्कार देणारी व स्वातंत्र्याला धोका देणारे संस्कार दणारे पी.टी. हायस्कुल तेव्हा होते. एकमध्यरात्री त्या हायस्कुललाच आग लावली. व इंग्रजांची फोडा नीती भस्मसात केली. 1818 साली शनीवारवाड्यात इंग्रजांनी फोडा व झोडा नितीचा वापर करुन युनियन जॅक फडकवला. त्या इंग्रजांच्या कारभाराच्या जागा शासकीय इमारती त्यावर युनियन जॅक फडकत असे. श्री. कर्पे यांनी सोबत्यांना घेऊन युनियन जॅक उतरवुन तिरंगा फडकवीला. याबद्दल अंगावर वळ उमटले तरी मारहाण इंग्रजांनी केली. पण तरी त्यांनी कबुली दिली नाही. आणि बाहेरच्या सोबत्यांची नांवे सागितली नाही. आनंदाने एक वर्ष शिक्षा भोगली.
1947 नंतर ते नोकरी व सामाजीक काम करत होते.