सासवडच्या कावडे घराने एक इतिहास जपला. पण तो आज पुसट केला गेला आहे. कारण छ. शिवरायांच्या स्वातंत्र संग्रामात जी मोजकी दलीत, ओबीसी मावळे होते. तेच मुळात दिडशे. या मंडळींचा साईस्कर विसर पडला गेला आणी उरला फक्त मान सन्मान. शिखर सिंगणापूरचा जीर्णीद्धार शिवरायांच्या घराण्याने केला. या ठिकाणाला त्यांनी दैवत मानुन त्याची सेवा ही केली. छ. शिवरायांनी याच योगदानाला प्रतिष्ठा दिली. स्वराज्यरतील पुरंदर गडाच्या पायथ्याला हाजारो वर्ष राहिलेले कावडे हे तेली समाजाचे या समाजाला त्या काळा पासून शिखर शिंगणापूरच्या मंदिरात कावडीतुन पाणी आणुन पिंडीला स्वच्छ मान ही एैतिहासीक परंपरा आजही सुरू आहे. या एैतिहासीक घराण्यात श्री. अशोक दिगांबर कावडे यांचा जन्म झाला.
श्री. कावडे जेंव्हा लहान होते तेंव्हा घरच्या आर्थीक परस्थीतीला तोंड देत होते. शिक्षण सोडून ते बाजारात बसले तेल बिया खरेदी करू लागले. जवळ भांडवल नव्हते. खरेदी केलेला माल ते कोरेगाव, पुणे या ठिकाणच्या मार्केट मध्ये विकु लागले या व्यवसायात जम बसविला. परंतू दिवसे दिवस कडधान्य पीक कमी झाले. त्याच बाजारपेठेत शेंगदाणे, चने फुटाणे वीकु लागले. बाजार पेठेतील आपल्या रहात्या घरी ते इतर वेळी विकत होते. चने फुटाण्या बरोबर फरसाण ही ठेवु लागले. विकत आणुन विकणया पेक्षा माल स्वत: बनवु लागले. मालाचा दर्जा टिकवुन किमान वाजवी दर ठेवल्या कारणाने. तुषार फरसणाला सासवड शहर व ग्रामीण भागात मागणी वाढली. हॉटेल व्यवसाय किंवा इतर कार्यक्रमासाठी फरसाण व स्विट साठी तुषार फरसाण हे ठिकाण ठोक खरेदीचे केंद्र बनले. श्री. अशेक दिगंबर कावडे यांनी जीवनभर केलेल्या धडपडीला, प्रामाणीक पणाला जिद्दीला चांगले यश आले. आज माल बनविण्यासाठी परराज्यातील कामगार काम करतात. अल्पशिक्षीत असुनही मुले व मुली उच्चशिक्षीत बनल्या ही गरूड झेप कौतुकास पात्र आहे.