- डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )
संत जगनाडे महाराजांच्या जन्मभुमीत उभा ठाकलेला वारकरी व संत तुकारामांची अभंग गाथा बुडविलेला माथेफिरु यात विभागला असला तरी आजच्या आधुनिक काळातली ही विषन्न अवस्था संपलेली नाही. भारत भुमीतील पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे देशातील संत साहित्याचे उगमस्थान होय. त्यामुळे गाथेच्या द्दष्टीने घडलेला इतिहास म्हणजे पुणे तिथे काय उणे होय. या परिसराची फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. जेष्ठ पाश्चात मार्क्सवादी विचारवंत टेन म्हणतात वंश, युग, व्यक्तिमत्वावरच त्या - त्या भागाच्या परिसराची संस्कृती अवलंबुन असते. पुणे परीसर हा टेनच्या विधानानुसार दोन भागात विभागलेला आहे. एक पुरोगामी तर दुसरा सनातनी, एक छत्रपतींचा तर दुसरा पेशव्यांचा.
आम्ही जर स्वत:ला विद्धान पंडित समजुन वर्ण-जातींच्या भिंती पाडुन लोकनैतिकतेचे दर्शन आम्ही घडविणार की समाज संस्कृतीच्या नावाने जातीतील लोकांनाच दिन, तुच्छ लेखाणार, धृतराष्ट्राने ज्याप्रमाणे भिष्माचार्याचा दुरूपयोग करून महाभारत घडविले असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या तेली समाजात घडत आहे. आणि हे भयाव चित्र समाजाला काळोखाच्या अंधारात घेऊन जाण्याची नांदी आहे.
आमची आगळी वेगळी ओळख, लोकसंस्कृती आणि वाडमय संचित नितीमत्ता, चारित्र्य, कष्ट, उदारमतवादी भुमिका, संवेदनशिलता, व्यापकता, प्रयोगशिलता त्याचा गौरवशाली इतिहास लोकासमोर मांडावा आणि शोषणमुक्त तेली समाज निर्माण व्हावा तो विज्ञाननिष्ठ, अज्ञान दरिद्र, विषमता, अंधश्रद्धा , रोग, व्यक्तीपुजा व विभुतीपूजा यातुन मुक्त करावा लागेल. परंतु आज जे महाराष्ट्रात घडत आहे. यापासुन तरूण युवकांनी व आंधळ्या तेली भक्तानी सावध होण्याची गरज आहे. पक्षीय राजकारण विसरून समाज केंद्रीत राजकारण करण्याची गरज आहे.
जे - जे आपणास ठावे ते इतरास सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन.
हे तुकोबानी म्हंटले तर
ठेविले अनंत तैसेची रहावे, चित्ती असु द्यावे समाधान हे मनुस्मृतीने सांगीतले.
आम्ही मित्रांचे न एैकता शत्रुचे एैकले त्यांचे आता करणार काय ?
आमचा यापुर्वीचा वंशज बळिराजा मालक हेता. भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय, संस्कृतीक सत्ता. बळीराजाकडे होती पण आजच्या युगात हीच सत्ता अन्याय, अत्याचार, शोषण करणार्या वामनाकडे आहे. संताजी कडे असलेलाा हाच वारसा तेली - कुणबी रुपाने अभंग गाथेने चिरकाल अविरत ठेवा ठेवला आहे. परंतु द्दर्योधन रुपी समाज कटंक जातीमध्येच उभी फुट पाडीत असतील तर त्यांच्याविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सैविधानीक आयुधाचा वापर करून हुकूमशाहांना त्यांची जागा दाखवुन द्यावी लागेल.
महाराष्ट्र आजपर्यंत तेली समाजात निर्भीड, निपक्ष लिखान लिहिणारे दोनच व्यक्ती मी बघितलेले आहेत ते म्हणजे प्रत्रकार श्री. भगवान बागुल व श्री. मोहन देशमाने, प्राचीन भारतातील तेली समाजाचा संशोधक महणुन एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातील तेली समाजाची वाटचाल नमुद करतांना अत्यंत दु:ख होते की ज्यांना समाजाचे पोशिंदे म्हंटले जाते तेच सामाजाला खुल्या बाजारात विकावयास निघाले असतील तर त्यांपेक्षा वाईट काय ?
संताजींचा वापर करून सुदुंबर्यांचा विकास घडवु न आणनारे व राजकीय लाभ घेणारे कोण ? समाजाला दावणीलाबांधुन स्वयंघोषीत नेते कोण ? जातीत भांडण लावणार कोण ? संताजींचे जीवन चरीत्र शासन स्तरावर प्रकाशीत करण्यासाठी धडपडणारे कोण ? राजकीय पक्षांना समाजाचा पाठिंबा देणारे कोण ? समाजाचे शोध ग्रंथालये सुरू करणारे कोण ? विद्यार्थांसाठी समाजाचे वसतिगृह चालविणारे कोण ? या सर्व प्रश्नांचे उत्तरे समाजातील होतकरू समाजसेवक, युवकांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. व उत्तर न मिळाल्यास समाजाच्या जाहीर सभा, मेळावे यातुन पदाधिकार्यांना विचारावे त्यांनी सत्य दडविल्यास समाजानें त्यंांचे पितळ उघडे पाडुन आशा समाज नेत्यांना वटणीवर आणण्यांचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जो समाज हिताचे कार्य करतो. म्हणुन समाज बांधवाना विनंती करतो संताजीला देवार्हात बसविणार्या पासुन फार मोठा धोका निर्माण झाला आसुन संताजी हे स्वराज्याच्या क्रांतीचे प्रथम शिलेदार होत हे विसरता येणार नाही. म्हणुनच थोतांड दुर्योधनरूपी पासुन समाज विघटनांच्या मार्गावर असेल तर हातात लेखनीची धारदार शस्त्र घेऊन. कौरवांचा पराभव करून पांडवरूपी समाजाची नितीमुल्यावर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पण घेऊ या.
जय संताजी
डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )