अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता. मग त्यांना शिक्षण दूरच मुले अशीच गावात खेळत बागडत मोठी होतील मग पहातील हा विचार परंतू घरा शेजारच्या टकले यांनी विरोध सहन करून गावातल्या शाळेत नाव दाखल केले. शाळा दुपारी कधी तर कधी सकाळी भरत असे. मग सकाळी किंवा दुपारी शाळा सुटताच दुसर्याच्या शेतावर मजुरी करावी. ही मजुरी करून शाळा शिकताना त्यांनी आपला शाळेचा पहिला नंबर सोउला नाही. गावातील शाळा संपली आता शेत मजुरी जीवनभर पाठीवर घेणे. हाच एक रस्ता होता. चांदूर रेल्वेला रहाणे अवघड शेत मजुरी जीवनभर पाठीवर घेणे. हाच एक रस्ता होता. गावात रहाणे अवघड होते. शाळेत समजले अमरावतीत एक शाळा आहे. या शाळेत जेवण, रहाणे मोफत उलट काही पैसे ही मिळतात. विठ्ठलराव आमरावतीत गेले. इथे प्रवेश मिळेल पण प्रवेश परिक्षा पास होताच. विदर्भातील चार जिलह्यातील मुले परिक्षेस बसली यात ते पहिला नंबर मिळवू शकले तो इलेक्ट्रीक ट्रेड त्यांनी पुर्ण केला. नवी उमेद म्हणतात ती मिळाली आणी जगण्याला उभारी आली. ही सुद्धा शाळा संपली. आता आपले भुईखेड गावात रहावयाचे पुढे शिक्षण बंद. वडिल मजुरी करीत होते. फक्त गावातील एक ट्रक्टर वर यांनी नोकरी मिळवली पण हे मी बदलणार ही चौकस नजर शांत बसू देत नव्हती. जवळ चांगल्या मार्काने पास झाल्याची सोबत. यावर नशीब पणास लावुन ते नजर ठेऊन होते. 1964 मध्ये पशु धन पर्यवेक्षक प्रवेशाची जहिरातवाचली अर्ज केला पोहरा हा तसा जंगली भाग याच भागात प्रशिक्षण होणार होते. येथे जेेवन, रहाणे व शिष्यवृत्ती होती. प्रशिक्षण होताच नोकरीची हमी होती. ते पुर्ण होताच शासकीय नोकरीचे ापत्र आले. त्या वेळी जयराम गुल्हाणे यांच्या घरात सुर्यप्रकाश प्रथम गेला. श्री. विठ्ठलराव कामावर रूजु झाले. चांदूर रेल्वे तालुक्यातील खेडे गावात. फक्त 5 रूपये पगार होता. पण तो हाक्काचा होता. घरी सर्व अडचनी तेंव्हा बहिण व भावाला शिक्षणा साठी आणले त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू केले. याच वेळी कु. पुष्पा बिजवे ह्या सौ. पुष्पा गुल्हाणे म्हणुन उंबरा ओलंडून आल्या हुंडा नाही मान पान नाही. आगदी साधे लग्न झाले 1969 मध्ये 1971 पर्यंत सर्व व्यवस्थीत सुरू होते.
तोच सकाळी सकाळी कामावर जाताच हातात बदलीचे पत्र. बदली झाली ती सुद्धे पुणे जिल्ह्यत सासवड मधील दिव्यात. अक्षरशा पाण्याने डोळे भरले. आता काय करावे हे प्रश्न घेऊन मुख्य कार्यलयात गेले ते एकटेच नव्हते तर जवळ जवळ एकवीसजन एकाच दिवशी पुण्याच्या गाडीत बसले. तसा प्रत्येक जन आपले डोळे पुसून इतराला सावरू पहात होता. पुणे नवीन होते रेल्वे स्टेशनवर उतरले. सर्वजन मुककामाला गाडगे बाबा मठात गेले. गोखले नगर शोधुन ऑफीस हुडकले एक चांगली बाब प्रशिक्षणाचे शिक्षकच अधिकारी होते. त्यांनी धीर दिला. इथे मी सर्व सहकार्य करतो. सोईच्या जागा देतो पण गलित गात्र होऊ नका. या वेळी दिवे गाव त्यांना मिळाले. मोठा मुलगा लहान, छोटीशी मुलगी गाव तसे रस्त्यावरचे पण पाण्यानेे वंचीत ठेवलेले. त्यात तो 1972 चा दुष्काळ या दुषकाळात ते तेथेच राहिले. हांडाभर पाण्यासाठी वनवन करू लागले. ही नोकरी सोडावी गावाकडे जावे. त्या गावात तरी काय करणार हा आसला दुष्काळ या परिसरात येण्या पुर्वीच पाय घट्ट करून उभा आहे. मजूरी करावी तर ती सुद्धा नाही त्या पेक्षा हेच बरे वाटले तोच बदली नगर रोडला वाघोलीत झाली. त्याला अजून एक कारण या रस्त्यावरून विदर्भाकडे जाणार्या एस.टी. गाड्या दिसत होत्या या गावाच्या प्रवेशाने पुन्हा एक नवी दिशा सापडली मुक्काम काही काळ ग्रामपंचायतीने दिलेल्या ठिकाणी केला त्यांनतर भाडळी वस्तीवर. हा परिसर जसा सुपीक तसाच बराच भाग माळरानचा शेतकर्यांचा जोडधंदा दुध उत्पादनाचा जवळच पुणे शहर असल्याने दुधाला मागणी होती. त्यामुळे बर्याच जणांचा मुख्य व्यवसाय दुध उत्पादनच होते. श्री. विठ्ठलरावंना डॉक्टर हे नाव इथेच मिळाले. गाई म्हशीचे ते डॉक्टरच होते. त्यांच्या मुळे या व्यवसायात गुरांची काळजी व आजार याला एक हमखास माणूस मिळाला वाडे बोल्हाई लोणींकंद, पेरणे, कोरेगाव, वढू, भावडी, फुलगाव, लोहगाव या परिसरातील शेतकरी त्यांना शोधत येत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत ते वाघोलीत थांबत. पहाटे उठून रूम समोरची सायकल ते घेत मग पायंडल मारत कधी त्या गावात कधी त्या गावच्या वस्तीवर पोहचत कधी कधी रात्री आकरा ही घरी येण्यास होत असत. शेतकर्यांचा जबरदस्त विश्वास होता. आणी त्या विश्वासाला तडा ही जात नव्हता. ते मोबदला मागत नव्हते%. पण शेतकरी आनंदाने देत तेवढेच ते घेऊन घरी येत 5/6 वर्ष हे रोज असेच चालू होते एक दिवस वडील वारले गावात भाऊ एकटाच म्हणून त्यांनी पुन्हा अमरावतीला बदली करून घेतली. इथे बदलून आल्यानंतर चूक लक्षात आली. इथे प्रगतीला मर्यादा आहेत इथे गावातले घर ही भाऊ व्यवस्थीत सांभाळत आहे. तेंव्हा पुन्हा बदली पुणे येथे करून घेतली. पुण्या जवळच्या लोणी काळभोर येथे पण मुक्काम चंदननगर येथे. प्रवासा साठी दुचाकी घेतली यावरून नदी पार करून जाणे किंवा बसणे जाणे.
गावी गेल्यावर गाई घेतल्या. यातील गाई विकल्या त्या विकून त्या पैशावर चंदन नगर मध्ये सोबत्या सह मेडीकल दुकान सुरू केले. गाई, म्हैसी, बैल या प्राण्यांच्या आजारावर हमखास उपाय करणारे डॉक्टर गुल्हाणे व त्यांचेच मेडीकल दुकान म्हणून 10 ते 15 मैलाच्या परिसरातील शेतकरी येत. आशा वेळी एक प्रकारे दिशा मिळाली नोकरीला 20 वर्ष पुर्ण झाली होती. आता नोकरी सोडायची परंतू शासन ती सोडू देत नव्हते. विनंती करून ते सेवेतून दूर होताच औषध विक्री व गुरांना औषध उपचार करू लागले. सुरेंद्र, सारिका व प्रफुल्ल या मुलांना मुलींस शिक्षण व दुकानदारी पहावी लागे. मुलगा डी. फॉर्म होताच येरवडा परिसरात नवीन दुकान सुरू केले. या ठिकाणी महत्वाची घटक सौ. पुष्पा गुल्हाणे होते. मांजरखेड या ते माहेरा वरून भुईखेडा तेथुन दिवा, वाघोली करीत असताना अनेक हाल सहन करावे लागले. चंदन नगर मध्ये मेउीकल सुरू केल्या नंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली घर संभाळून हे शक्य नव्हते त्यांनी आपल्या आईना आणले. दिशा मिळावी म्हणून भावाची मुले, बहिणीची मुले ही आणली आईनी या सर्वांचे साठी घर संभळावे त्यांनी दूकान संभळावे. मदतीला हे सर्वजन होतेच चंदन कलेक्शन हे नवे क्षेत्र लहान मुलाला निर्माण करून दिले. या साठी त्या उभ्या राहिल्या. एकमेकाला सहकार्य करून सर्वांना दिशा देऊ शकला.
कळत होते त्या वयात श्री. विठ्ठलराव यांनी प्राथमीक शाळे बरोबर मजुरी ही केली. परस्थीतीला सामारे जात त्यावर हुकमत मिळवली रोज नवी आव्हाने स्विाकारली. नोकरी सोउली मेडीकल सूरू केले. एकाची दोन केली कापड दुकान सुरू केले हे सुरळीत होताच श्रद्धा क्लास सुरू केले. तो उभा करण्यासाठी ते भरपूर फिरले. याला बरे दिवस आणले. तोच डिपर संस्थेचे मुख्यघटक तयार झाले या साठी महाराष्ट्रभर फिरतात उच्च शिक्षणासाठी मुले घडवीत हुशार व गरीब मुलासाठी त्यांनी गत 6 वर्ष एक योजना राबवली आहे. मुलासाठी ते स्कॉलरशीप देतात. आज पर्यंत पाच लाख रूपयाचे वाटप केले आहे. मुलांचे वसतीगृह सुरू केले होते. आज कात्रज येथे मुलींवे वसतीगृह कार्यरथ आहे. भुईखेडे ते आळंदी अशी दिंडी निघते या ही दिंडी क्र. 17 आहे. यातील वारकरी मंउळींच्या भोजनाची निवासाची व्यवस्था ते चंदननगर येथे करतात. या त्यांच्या वाटचाली मुळे नाशीक शहर समाज बांधवा तर्फे मानाचा प्रेरणा पुरस्कार मिळाला श्री. शनैश्वर फौंडेशन तर्फे उत्कृष्ट कार्य म्हणुन ही पुरस्कार मिळाला त्यांच्या भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.