कोणताही समाज हा उभा असतो त्यााग निष्ठा व सहकार्यवर पुणे कॉम्प परिसरातील कै. पुरूषोत्तम व्हावळ हे एक मागील पिडीतील बांधव. मान व आपमान याचा त्याग करून ते समाज कार्यात रमत. कोणाचीही मयत होताच पहिले हजर असत. सर्व विधी उरकत असत. लग्न कार्यात स्वत: सर्वांना जेऊ घालत मग शेवटी ते बसत. संताजी उत्सवात ही हीच भूमीका वठवत १९६१ च्या प्रलयाकारी पुरात ८२ भवानी पेठ हे मदत केंद्र सुरू ठेवण्यात ते सहकार्या बरोबर आघाडीवर होते. आगदी सुरूवातीला पुणे कॅम्प मधुन घरगुती वापराचे जुने फर्नीचर घेत ते घेऊन सुरूवातीला मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात जात ते विकुन उभे राहिले. रास्ता पेठेत रमेश फर्निचर मार्ट ही पुण्याला ठेवण निर्माण त्यांनी केली आपल्या मुलांना व्यवसायाचे व समाज सेवेचे धडे ही त्यांनी दिले म्हणनु श्री. गणेश व्हावळ सुदुंबरे संस्थेचे उपाध्यक्ष होते. पुणे समाजाचे खजिनदार व विश्वस्त होते यांच्याच काळात वधुवर मेळावा ही संकल्पना रूजली श्री. ज्ञानेर्वर उर्फ माऊली व्हावळ हे विद्यमान विश्वस्त व माजी अध्यक्ष म्हणून कार्यरथ आहेत.
याच व्हावळ घराण्यातील कै. मुरलीधर व्हावळ पुणे कॉम्प परिसरातील देश स्वातंत्र्यासाठी उभा पेटला असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला. कॉम्प मध्ये परदेशी माल ट्रकने येत आसे तो माल दुकानात विक्रीस जात आसे कै. व्हावळ यांनी तो माल भोपळे चौकात जमा केला आणि परदेशी मालाची जाहीर होळी केली. १९४२ च्या शेवटच्या पर्वात ते भुमीगत राहून इंग्रजांना पिटाळून लावण्या साठी प्रयत्नशिल होते. साधी रहाणी देशप्रेम निष्ठा ही गांधी प्रणालींने ते आयुष्यभर लढले. रावसाहेब केदारी रोडवर संताजी वाचनालय होते. या वाचनालयात ते सकाळ संध्याकाळ बसुन वाचनालय उघडत वृत्तपत्रा बरोबर दर्जेदार पुस्तके वाचकांना देत असत.
कै. जगन्नाथ व्हावळ, कै. अनंतराव वाव्हळ, कै. राधाकिसन वाव्हळ या व इतर मंडळींनी हिरारीने सहभाग घेऊन कार्य केले एक नियोजन बद्ध कार्य करणारे श्री. दिलीप व्हावळ एक तज्ञ समाज बांधव विश्वस्त म्हणुन काम करतात