कै. आप्पासाहेब भगत यांच्या इच्छेखातर आपल्या दोन वास्तु समाजाला अर्पण करणारे कै. केशवराव भगत यांच्या पासुन म्हणजे शंभर वर्षा पासुन समाजाला एक बैठक निर्माण झाली. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे, कै. पांडूरंग धोमकर, कै. ऍड. गोविंदराव पवार, कै. रत्नाकर (दादा) भगत, रत्नपारखी, कै. नंदकुमार क्षिरसागर या सारखे माजी अध्यक्ष मार्गदर्शक लाभले. गत ५० वर्षात कै. पुरूषोत्तम व्हावळ, कै. लक्ष्मण अंबिके, कै. बा. ना. केदारी, कै. अमृतराव कर्डीले, कै. जगन्नाथ व्हावळ, कै. आनंदराव व्हावळ, कै. धोंडीराम चोथे, कै. भटजीशेठ शिंदे, कै. ल. वि. शिंदे, कै. विश्वनाथ भगत, कै. बाबुराव रोकडे, कै. बाळासाहेब वाळंजकर आशा मंडळींनी आपला वेळ व शक्ती समाजासाठी खर्च केली.
कै. रावसाहेब केदारी यांनी महाराष्ट्रभर समाजाची अस्मिता म्हणुन श्री. संत संताजींना बिंबवले ते याच पुण्यातून. त्यांच्या हाकेला साथ देणारे शेकडो बांधव या ठिकाणी होते. श्रमदान करून संताजी मंदिर उभारले. या मंडळींनी धान्य गोळा करणे साहित्य गोळा करणे उत्सव साजरा करणे या साठी कठिण परस्थितीत यशस्वी सामना दिला हा जर दिला नसता तर समाजाची अस्मिता तयार झाली नसती. हे वास्तव सत्य आहे. सुदुंबरे संस्था रचनात्मक कार्य करण्यासाठी तीला रजिस्टर करण्यात पुणेकर आघाडीवर होते. त्या दिवसापासुन श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे कायदेशीर ऑफिस हे ८२ भवानी पेठ पुणेच आहे. या ठिकाणच्या जडण घडणीत पुणेकरांचा सहभाग मोठा होता. सुदुंबरे येथे महामेळावा घेण्यासाठी सर्व पुणेकर प्रथम एक झाले. अंतर्गत मतभेद बाजूला सारले. हेव्या दाव्यांना मुठमाती दिली. कुणाच्या आदेशाची वाट न पहाता येणार्या लाखो बांधवांच्या स्वागताला उभे राहिले. यात उल्लेख करावा आसे कै. नंदुशेठ क्षिरसागर, श्री. प्रकाश पवार, कै. वालझाडे, श्री. सुुभाष पन्हाळे, श्री. गंगाधर हाडके, श्री. प्रकाश कर्डीले, घनश्याम वाळंजकर, हणमंत फल्ले, श्री. विजय शिंदे आशा शेकडो बांधवांचा सहभाग होता. म्हणुन देशाला तेली ताकदीची ओळख झाली. पुणेकर मतात अडकतात पण तेवढेच नव्हे तर त्या पेक्षा अधीक गतीने एैक्य साधुन भविष्य घडवितात हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केले आहे.
रावसाहेबांचे योगदान
१९२० च्या दरम्यान रावसाहेब केदारी यांनी आपले सर्वस्व अर्पण करून सुदूंबरे संस्था उभी केली. ही घडण जशी पुण्याची तद्वत कै. रत्नाकर उर्फ दादा भगत यांनी कै. धोंडीराम राऊत, शरद देशमाने यांना बरोबर घेऊन पालखी सुरू केली सोहळ्यात आज हाजारो बांधव आहेत परंतू सुरूवातीस देहूकरांचा विरोध मोठा होता. या वेळी कै. अर्जुनशेठ बरडकर यांच्या मुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्या बरोबर चालण्यास तसा होकार आला. बरडकरांनी मदतीचा हात दिला तो दादा भगत यांच्या मुळे. दादांच्या सहभागा मुळे अनेकजन पालखी हा प्रयत्न यशस्वी करू लागले. दादांचे रक्ताचे संबंध हे पन्हाळे, केदारीी, बरडकर कुटूंबात होते. त्याचा उपयोग सुरूवातीला झाला. कै. लक्ष्मण अंबिके हे पहिले संताजी पालखीस सामोरे गेले. पाच वारकर्या बरोबर पंढरीला जाणार्या या बांधवांना भेटले जेथे की कमी तेथे लक्ष्मण अंबिके ही भुमीका वठवली या नंतर ऍड. गजानन मेरूकर, श्री. ताराचंद देवराय या मंडळींनी त्यांना जे शक्य होते ती धडपडकरून पंढरपूर येथे समाजाची वास्तु उभी केली.
तेली महासभा
आज महाराष्ट्रात तेली महासभा गत १० ते १५ वर्षात उभी राहिली आहे. परंतू १९५६ मध्ये रावसाहेब पन्हाळे, दादा भगत यांचे नाते संबंधा मुळे त्यावेळचे आमदार माधव पाटील यांनी सभा घेण्याचे ठरविले. तेंव्हा ही समाज कारण करणारी संघटना होती. तेंव्हा ही एक समाजासाठी सुर्य किरण घेऊन येणारी संघटना होती. तेंव्हा ही समाज एैक्याचे प्रतिक होते. तेंव्हा ही सर्व सामान्य माणसाच्या विकासाचा केंद्र बिंदू शोधत होती. आणि म्हणुन श्री. अंबादास शिंदे, कै. रत्नाकर भगत, कै. भटजीशेठ शिंदे, कै. अनंतराव व्हावळ, कै. बाबूराव रोकडे या सारखे तेंव्हाचे युवक पुणे शहरात पायी व इतर सायकल वर फिरले आणी ८२ भवानी पेठ समाज बांधवांनी ओसंडून गेली. महाराष्ट्रातील तेली महासभेची (तैलीक) पहिली महासभा संपन्न झाली. या सभेला दिनबंधू साहू यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते. या नंतर हिचे अस्तीत्व थोडेफार होते. परंतू श्री. रामदास धोत्रे हे या महासभेत जाताच त्यांनी आपल्या संघटन कौशल्यावर या संघटनेला बाळसे आणनारे श्री. धोत्रे हे एक पुणेकरच आहेत. सर्व समाज म्हणजे महासभा तो माझा नाही संघटन करता करता मी पणात विघटन ही विकृती अस्तीत्वात नसल्याने पुणेकरांनी सुदूंबरे येथेमहामेळावा यशस्वी केला.
वधु - वर मेळाव्याचे जनक पुणेकरच
वधु-वर मेळाव्या विषयी महाराष्ट्र पातळीवरील एक नेत्याने आपल्या संघटनेला मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. खिशातले पहिले पैसे बाहेर काढा. मग मेळाव्या साठी पैसा गोळा करा. नंतर पैसे आपल्या खिशात ठेवा समाज सेवेला आज ही गोंडस फळे आलीत असे ढोल बडवून सांगितले जाते भव्य पणाची सिमा रेषा रूदवण्याची जर स्पर्धा सुरू असेल तर हा आदर्श जरूर घेतला पाहिजे कारण ही विकृती आहे. भाषण बाजी व प्रसिद्धी माध्यमे या पासून दूर राहून काम करणारे पुणेकर म्हणजे श्री. शामराव भगत यांच्याकडे विचारणा केली आसता त्यांनी स्पष्ट सांगीतले पुण्याच्या समाज वास्तुत कै. दादा भगत, श्री. अंबादास शिंदे या पदाधीकारी मंडळीच्या सहकार्याने प्रथम वधुवर सुचक मंडळ सुरू केले १९८६ च्या संताजी पुण्यतिथी दिवशी सुदूंबरे येथे पहिला जाहीर वधु-वर मेळावा घेतला. याचे सर्व नियोजन कै. बबनराव खळदे यांनी केले होते. ही नवीन क्रांती सर्वांना आवडली. याला मोठे स्वरूप येण्यासाठी पुणे कार्यालयात मिटींग घेतली या मिटींगला कल्याण, नाशीक येथील बांधव होते. मेळावे महाराष्ट्रात दर वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचे निश्चीत झाले प्रथम कल्याण येथे व नंतर नाशीक येथे मेळावे झाले. या नंतर पुण्याचा नंबर होता. हा नंबर पुणेकरांना मिळाला नाही तेंव्हा कै. नंदुशेठ क्षिरसागर यांनी पुणेकरांची तेली ताकद उभी केली. व दरवर्षी वधु वर मेळावा सुरू केला. नंतरच्या कमीटीने त्याला भव्य दिव्य स्वरूप दिले. आगदी अपवाद वगळता दरवर्षी मेळावे होतात. पुणेकरांचा मेळावा म्हणताच जत्रे सारखी मंडळी गोळा होतात ही यशस्वी संकल्पना पुणेकरांचीच.
गत दहा वर्षातील वाटचाल
मी प्रथम मांडले आहे. लोकशाही हा पुणेकरांचा आत्मा आहे. यात सर्व सामान्य बांधव ही विश्वस्त होऊ शकतो परंपरेचे जतन करून त्यातभर ही टाकु शकतो. या लोकशाहीत गतीमानता साधताना समाजाचे हित जसे जरूर होते. तसे काही तोटे ही आहेत लोकशाही व्यवस्थेत आपण हे मान्य ही करतो. सर्व समाज बांधवांना परिवर्तन हवे होते. परिवर्तनाची आस समाजाला शांत बसु देत नव्हती. यातूनच सर्वश्री रामदास धोत्रे, श्री. अंबादास शिंदे, दिलीप व्हावळ, संजय भगत, घनश्याम वाळंजकर, श्री. सुभाष देशमाने या व इतर मंडळीच्या नेतृत्वाखाली आघाडी घेतली प्रथम या सर्वांनी मोडकळीस आलेली. वापरात न येणारी संस्था लोकवर्गणीतून दुरूस्त केली. संस्थेला हाक्काचे उत्पन्न येत नव्हते ते सुरू केले. या नंतरच्या निवडणुकीत यांच्या बरोबर श्री. प्रकाश कर्डीले, श्री. विजय शिंदे, श्री. माऊली व्हावळ हे लेाक नियुक्त म्हणुन आले. याच काळात या वास्तुचा अंदाजे ३०० स्केवअर फुटचा परिसर सुशोभित केला. राष्ट्रीय सनांचे नियोजन तर केलेच उलट विद्यार्थी गुणगौरव ही केला जातो. महिला सयाठी विविध उपक्रम राबवताना महिला बचत गटाला कार्यालय उपलब्ध केले. पुण्याच्या परंपरेला साजेल असया मेळावे ही घेतले जातत. सर्वश्री रामदास धोत्रे, विठ्ठलराव किर्वे, संजय भगत, घनश्याम वाळंजकर, प्रकाश कर्डीले, माऊली व्हावळ, विजय शिंदे या सर्व माजी अध्यक्षांनी एक पुणेकर म्हणुन आपला ठसा उमटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले. काही बाबत उणीवा आहेत हे ते मान्य करतात. या उनीवा या तांत्रिक अडचनीच्या मुळे राहिल्या त्या जनरल सभेत सर्वा समोर येतील हे ही ते स्पष्ट करतील.
राजकीय प्रवास हा पुणेकरांचा आत्मा.
मराठा व ब्राह्मण वाद अस्तीत्वात असताना या पुण्यात कै. केशवराव भगत, कै. शंकरनाना करपे यांनी नगराध्यक्षपद भुषवले. करपे यांच्या विषयी म्हणत सायकवरन उत्तरा करपे यांना खाली बसवा. आशा काळात हा बांधवांनी आपला ठसा उटविला रावसाहेब केदारी नगरसेवक होते. त्यांनी आपल्या धडपडीतून पुणे कॅम्पला आकार दिला. त्यांचे नातू श्री. प्रकाशशेठ केदारी कॉन्टोमन बोर्डचे सदस्य होते. ते उपाध्यक्ष ही होते. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला गेला. रावसाहेबांचे पणतु श्री. प्रसाद केदारी सुद्धा लोकनियुक्त सदस्य व उपाध्यक्ष होते. एका सर्व सामान्य कुटूंबात जन्म घेतलेल्या श्री. उल्हास उर्फ आबा बाबगुल यांनी पुण्याला नव्हे तर महाराष्ट्राला नवी ओळख दिली ते सलग २० वर्ष नगरसेवक आहेत. यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी उत्सव पुणे करांच्या अभिमानाची बाब तयार झाली ते स्थायी कमिटीचे अध्यक्ष होते. आज पुणे महानगराचे उपाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत. सौ. मिनाक्षी मखामले श्री. बाळासोा. किरवे हे काही काळ नगरसेवक होते.
पुणेकरांच्या स्वाभीमानी इतिहासाची ही तोंड ओळख संधी मिळताच तो अधिक स्पष्ट मांडला जाईल.