महाराष्ट्रातील तेली समाजाच्या इतिहासात अनेक बांधव आपल्या वाटचालीने एक आढळ स्थान निर्माण करून आहेत त्या पैकी श्री. रामदास बाबुराव धोत्रे हे एक आहेत याची प्राजंळ नोंद भविष्यात ठेवावी लागेल. शिवरांयांची मावळ्यांची भुमी भोर. भोर या नगरीतुन धोत्रे कुटूंबीय पुण्यात आले. या पुण्यनगरीचे ते एक घटक बनले. वडिल कै. बाबूराव मेहनितीने घर चालवत होते. आई त्यांना साथ सोबत देत होत्या पुण्यात स्थीर झाल्यावर शिक्षण ही एक जादूची कांडी आहे याची जाणीव झाली. श्री. रामदासजी मोठे ते शिक्षण घेत होते तोच वडिल वारले. कुटूंबाला एक मोठा धक्का बसला. शिक्षण का नोकरी हा प्रश्न समोर आला. आशा वेळी शिक्षणाला महत्व पहिले दिले. आईने धिर सोडला नाही उलट स्वत: खंबीर राहून मुले शिकली पाहिजेत ही जिद्द ठेवली त्यासाठी काबाउ कष्ट करू लागल्या. यामुळेच बांधकाम क्षेत्रातील उच्चपदवी संपादन करून रामदासजी उभे राहिले दुसरे चिरंजीव श्री. अनिल हे उच्च पदावर रूजू झाले. ही यांच्या कष्टाची किमया हे वास्तव सत्य दोघे ही उरात जपुन वाटचाल करू लागले.
ज्याला स्वत: उभे रहाता येत नाही. ज्याला स्वत:चे घर नीट चालवता येत नाही. ज्या घराला घर पण नाही त्या घराला गावपण मिळत नाही. हे हवे असेल तर स्वत:ला ठाक ठिक असावे लागते हे ठरवून रामदासजी बांधकाम क्षेत्रात उभे राहिले. स्वत: उच्च शिक्षीत असल्याने विचार, आचार व कृती यांची दिशा होती. सुक्ष्म निरीक्षण योग्य असल्याने विचार, आचार व कृती यांची दिशा होती सुक्ष्म निरीक्षण योग्य वाटचाल याची बैठक असल्याने ते मोकळा वेळ मिळताच समाज मनात ते वावरत होते. तो काळ म्हणजे एक प्रकारे समाजाला आलेली मरगळ होती. उंबर्या आड बसुन चर्चा करण्यापेक्षा या असंतोषाला संघटीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यासाठी सर्वांना सोबत घेतले. विचाराची देवाण घेवाण केली. या विचारातून अनेक कार्यकर्ते निर्माण केले. पुण्यात प्रथमच शिवदर्शन वसाहती जवळ हाजारो बांधवांचा आनंद मेळावा घेतला. या मेळाव्याने दबकत दबकत चालणारे बांधव संघटीत झाले. मरगळ झटकून सर्वजन उभे राहिले. झोपलेले जागे झाले. झोपेचे सोंग घेतलेले खडबडून जागे झाले आणि परिवर्तनाचे वारसदार झाले. या परिवर्तनातुन नव्या चेहर्याच्या मंडळींनी इतिहास बनवला व पुणे समाजाचे अध्यक्ष पद मिळविले. समाज वास्तु वापराविणा तशीच होती. संस्थेकडे पैसा ही नव्हता आशा वेळी सर्व विश्वस्तांना बरेाबर घेऊन जवळ झोळी घेऊन सर्वांनी देणगीदारांना विश्वास दिला. याच विश्वासातुन बंद पडलेली वास्तु वापराण्या योग्य झाली. पुर्वीचे चांगले आहे. त्याचे जतन करणे या मध्ये अधीक गतीशीलता कशी येईल ही भुमीका ठेवली. या मुळे वधुवर मेळावा ही संकल्पना गतीमान करीताना तिला भव्य दिव्य आकार दिला महाराष्ट्रभर पुण्याचा वधु वर मेळावा ही प्रतिष्ठा निर्माण केली. मेळावा विचारपीठावर एक दिवस आसतो परंतु त्यापुर्वी सलग २/३ महिणे ती मेहनत आसते त्यासाठी शेकडो कार्यकर्ते राबत असतात आणि तो त्यांनी निर्माण करून महाराष्ट्राला पुणेकरांची नवी ओळख निर्माण करून दिली.
सुदूंबरे येथील श्री संत संताजी पुण्यतिथी रोजी ते सहभागी होत होते. पहिले विचार सभेत आपली मत मांडली जात पण या मतांना वादाचे स्वरूप देऊन काही ही मोठे कारण नसताना संस्थेला व समाजाला बदनाम व्हावे लागत होते. सुदुंबरे येथील पुण्यतिथी दिनी ते उत्सव उद्घाटक पदी निवडले गेले. आपल्या शिक्षित विचारसरणी प्रमाणे शक्य ते बदल झाले पाहिजेत ही धडपड केली. याच काळात श्री. अंबादास शिंदे या जेष्ठ बांधवांची निवड संस्था अध्यक्ष पदी झाली. समाज माता केशरकाकु क्षिरसागर श्री. आ. जयदत्त क्षिरसागर श्री. आ. रामदास तडस यांचा संबंध आला. सुदूंबरे येथे पर्यटन क्षेत्र व विकास या गोषटी समोर आल्या. याही बरोबर आपल्या असंघटीत समाजाचा महामेळावा ही विचार प्रणाली समोर आली. महाराष्ट्रात दहा टक्के आपण आहात परंतू किमान एक लाख बांधव ही एकत्र येत नाहीत आपल्या परिसरा बाहेर ओळख ही नाही. समाजीक प्रश्नासाठी आपण एकत्र येऊ शकतो एवढी माणसीकता ही नव्हती अशा वेळी महामेळावा सुदुुंबरे येथे घेण्याचे निशिचत झाले. महाराष्ट्रातील काना कोपर्यातुन समाज येणार सर्व मत, सर्व भेद, राजकीय पक्षाचे संबंध विसरून एक तेली म्हणुन एकत्र येणार आशा वेळी स्थानिक व्यवस्था ही सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष श्री. अंबादास शिंदे व श्री. रामदास धोत्रे यांच्या कडे आली. किमान ४/५ लाख बांधवांची भोजन व्यवस्था बैठक व्यवस्था. अशी सर्व जबाबदारी समाज संघटीत करून पार पाडली. पुणे जिल्हा व शहर बांधवांची एक टिम बनवुन त्यांनी यशस्वी नियोजन केले. पुर्णत्वाकडेजाताना काही उणीवा असणार कारण इतका प्रचंड समुदाय प्रथमच एकत्र आला होता.
रावसाहेब शंकरराव पन्हाळे, रत्नाकर उर्फ दादा भगत, श्री. अंबादास शिंदे हे कार्यरथ असताना १९५६ दमध्ये दिनबंधू साहू हे पुण्यात येणार होते. त्या वेळचे आमदार माधवराव पाटील (महिंद्रे) हे आघाडीवर होते. स्वातंत्र्य उत्तर काळात समाजाचे सामाजीक प्रश्न सोडवणे, सांस्कृतीक ठेवण जोपासणे ही आखील भारतीय तैलीक महासभेचे कामकाज होतं. आज जी तैलिक महासभा म्हणजे राजकीय सत्तेसाठी साधन बनले आहे तशी स्थीती तेंव्हा नव्हती समाजकल्याण ही वाटचाल होती कै. आ. माधवराव पाटील यांच्या मुळे दिनबंधुदास यांनी ८२ भवानी पेठेत तैलिक महासभेची जाहीर परिषद लावली होती. प्रचंड जनसमुदाय स्थानिक मंडळींनी गोळा केला होता. समाजमाता केशरकाकु अध्यख असताना केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे सदस्य अक्षय कुमार साहू हे तैलीक महासभेचे सदस्य होते ते पुण्यात येणार होते त्यांची जाहीर सभा मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात तैलीक महासभेची सभा स्थानिक बांधवांनी लावली होती. या पेक्षा तैलिकचा पुणे व पश्चिम महाराष्ट्रात संबंध काहीच नव्हता. प्रथम रामदासजी धोत्रे हे तैलिक महासभेचे सदस्य झाले. श्री. रामदासजी तडस यांनी त्यांना प. महाराष्ट्राचे अध्यक्ष पद धोत्रे यांना दिले. पुणे शहर व जिल्हा त्यांनी पिंजून काढला. हे रोपटे लावण्यासाठी खरी मशागत त्यांनी घेतली पुणे सातारा, सांगली कोल्हापूर व सोलापूर जिल्हा परिसरात स्वत: गेले या साठी तेली गल्ली मासिकाची पाऊल वाट त्यांना उपयोगी पडली. हे ही ते मान्य करतात. या सर्व परिसरात तिळवण लिंगायत, लाड, आसे पोट प्रकार रोटी व्यवहार व बेटी व्यवहार नाही आशावेळी आपण सर्व तेली एक आहोत हे तेली महासभेची प्रणाली त्यांनी रूजवली ही काळ्या दगडावरची रेष आहे. या धडपडीचा उपयोग सुदुंबरे महामेळाव्यास सहकार्य व उपस्थीती साठी झाला. कारण ते व त्यांच्या सहकार्यानी त्या वेळी घरच्या भाकरी बांधून घेऊन जाऊन संघटन केले होते. ते कदापी विसरता येणार नाही. कालांतराने त्यांना महाराष्ट्र राज्याचे तेली महासभा उपाध्यक्ष पद मिळाले परंतू मतात अंतर पडू लागले. मतभेद वाढवुन समाज विस्कळीत न करता ते काही काळ अलिप्त राहिले. परंतु पुणे समाजात ते कार्यरत राहिले.
ओबीसीत दम नाही ही काही तेली नेत्यांची माणसिकता कारण कोणत्याही एका जातीचे काम करताना जो दाम लागतो तो लगेच मिळतो व भाषण व जेवणावळी ठावदार होतात. समाजाच्या पदरात काय पडले या विषयी तसे कोण बोलत नाही. परंतु उसना उत्साह जरूर अनेक जण आप आपल्या जातीत निर्माण करतात. परंतू ओबीसींचे तसे नसते. इतर मागास वर्गीय जाती यात सामिल असतात. आसा संयुक्त लढा उभारण्याची ही स्वातंत्र्या नंतरची पहिली प्रक्रिया ही सुरूवात असल्याने कार्यासाठी, कार्यक्रमासाठी कोण ही दाम देत नसतो तर स्वत:चा खिसा रिकामा करावा लागतो. ही जाणीव ठेऊन ते वावरत होते. ओबीसी प्रक्रियेतील मोहन देशमाने यांनी वाघोली, हडपसर, पुणे या ठिकाणी आयोजीत केलेल्या ओबीसी परिषदात श्री. धोत्रे फक्त हारतुरे घेण्यासाठी न येता एक बांधव म्हणुन ओबीसी प्रक्रिया समजावून घेत होते. यातूनच महाराष्ट्र ओबीसी महासभा या संघटनेचे ते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष झाले. ओबीसी प्रश्ना साठी परिसंवादात सहभागी होणे याच प्रश्ना साठी रस्त्यावर उतरून न्याय मागणे ही सुरूवात करून ते आज कार्यरथ आहेत.
शिवरायांच्या मावळ्यांच्या भुमीतून पुण्यात स्थीर झालेले श्री. रामदास धोत्रे हे एक वादळ आहे. ते कधी तुफान वादळ असेल तर कधी वादळा पुर्वीची शांतता ही असेल परंतु हे वादळ जर सुरू झाले तर कार्याची उत्तुंग झेप घेऊ शकते ही त्यांची ठेवण आहे. म्हणुन जागतिक सर्कसपटू दामू धोत्रे यांच्या नंतर सर्व धोत्रे परिवारात त्यांचे नाव घ्यावे लागेल.