मराठा व ब्राह्मण प्रणालीचे एक उदाहरण देतो. माझे एक परिचीत बांधव तसे हुशार त्यांना कॉंग्रेस संस्कृतीने आपले मानले इतके की ते खिशात पैसे नसताना ही जि. प. सदस्य झाले. सत्तेत जावुन केले काय तर मराठा मनाची पाठराखण केली पण आमचा जि. प. सदस्य झाला म्हणून आम्ही त्याच्या साठी ताशा वाजवले. त्याचे आपल्या वस्तीत डिजे लावून कौतुक स्वत:चे स्वत: केले दुसरा एक ब्राह्मणी संघटनेत लहान पणा पासुन वाढला आगदी नियमीत शाखेत जावून बौद्धीके घेऊ लागला. काही काळ प्रचारक ही म्हणून फिरू लागला. एक तेली म्हणून त्याला प्रोजेक्ट ही केले. तेल्यांची मते घेऊन सत्तेत ही गेला. सत्ता मिळाल्यावर करू लागला काय तर ब्राह्मणी संस्कृतीचे बिजरोपण. त्या बरोबर जय संताजीचा गजर करू लागला. आम्ही ही त्या सुरात सुर मिसळु लागलो समाजाला मिळाले काय तर मोठे शुन्य पक्षीय राजकारणात किंवा इतर ठिकाणी पद मिळणे सहज शक्य नसते. आणि दिले तरी दुसर्याच्या घरी पाणी भरावे लागते. म्हणुन समाज संस्थेचे किंवा समाज संघटनेचे पद सदस्य मिळणे शक्य झाले आहे. हे पद मिळवण्यासाठी चार पैसे खर्चावे लागतात मग आसे पद मिळाले की हार तुरे आसतात. लग्न व इतर समारंभात नाराळ मिळतों. समाजाच्या मासिकातुन फोटो येतात. आगदी वॉटसऑपवर वेगवेगळ्या बातम्या माहिती दे्न प्रसिद्धीचे वलय निर्माण करता येते. आणि हे मिळवलेले पद या विचाराच्या पुढे जात नाही. आणि जर गेलेचे तर संघटनेच्या कार्यक्रमात हाजेरी लावण्या पुरते. व्हीजीटींग कार्ड पुरवणे. संघटनेच्या वरिष्ठांच्या फोटो सहीत आपला फोटो पदर मोड करून जहिराती पुरता पदाचा वापर केला जातो. या पेक्षा या पदाचा व संघटनेचा फायदा त्याला संधटनेला, समाजाला शुन्य आसतो. कारण नुसतेच ढोल बडवुन कार्याचा आडुन दबव आणला जातो. नुसत्याच ढोल व ताश्यांचे वाजवणे सोडण्यासाठी त्याचे ही केळवण करून बोळवण करा.
काही संघटनेचे व संस्थेचे पदाधीकारी सहज जरी बोलले तरी त्यांचा सुर हा दम बाजीचा आसतो. मुळात हे चालक आसतात. यांचा मालक हा लांबच आसतो. परंतु यांनाच मालक आसल्याचा भास हा क्षणोक्षणाी होत आसतो. यातून आपली हुकमत ते ठेवत आसतात. वाटलेली पदे व नेमलेले पदाधिकारी ही एवढीच त्यांची सोबत आसते या पेक्षा सामान्य माणूस चार हात लांब आसते परवा एका शहराचे पदाधिकारी दुसर्याच्या जागरणाला हाजेरी लावण्यास गेले. त्या ठिकाणी काय करावे तर समाज अंतर्गत वादावर या मंडळींनी एकमेकास पोटभरल्यानंतर शिव्यांचा जागर केला. त्या जागरणाला गोंधळला शिव्यांचे रूप देऊन समाजाची अब्रु आपण वेशीवर टांगली परवा महाराष्ट्र बाहेर एका संस्थेची मिटींग होती. महाराष्ट्रातून बरेचजण मिटींग व पर्यटन या दोन्ही गोष्टी साठी काही जन निघाले. सोबतीला इतरही ही काहीजन घेतले. हाजेरी लावून समुद्र किरणारा पाहीला आणि समुद्र किनारी उधळणार्या लाटा पाहुन त्या परराज्यात शिव्यांचा मारा करीत मार झोड करण्याची भाषा जेंव्हा सुरू झाली तेंव्हा समाज कार्याला आलेली ही संस्कृती की विकृती जेंव्हा पर समाजाच्या राजकीय नेत्याचा पदर धरून आम्ही जेंव्हा तोच पणा करतो तेंव्हा समाजकारण व राजकारण यात फरक काय ? संत संताजींचे आपण नाव घेतो आगदी फोटो लावतो, हार घालतो, फुले ही ठेवतो पण संताजी समजुन घेतले का ? कारण या असल्या शिवराळ पणा, गुंड, पुंड, दहशत व अतिरेकीपणा यांच्या विरोधात ते उभे राहिले. त्यांनी सर्व सामान्य साठी अंधारल्या वाटा उजळल्या पण आपण कोणती संस्कृती निर्माण करीत आहोत आपण कोणते समाजकार्य करीत आहोत हा प्रश्न विचारणे हा सुद्घा गुन्हा होऊ पहात आहे. आम्ही कोणा नेत्यांच्या विरोधात ब्र काढला तर, बरे नाही लिहले तर आमच्याशी गाठ आहे. ही वक्तव्य तेली गल्ली मासिकाला नवीन नाहीत पुण्याला संस्कृतीचे माहेरघर म्हंटले जाते परंतु समाजाचे एक नेतृत्व रात्री शुद्धीवर नसताना फोनवर शिवीराळ भाषा वापरने हे कोणत्या संस्कृतीचे लक्षण आहे. उलट या विकृतीचेे बोळवण करून अंधारलेल्या वाटा उजाळण्याच्या आहेत. हे उजळणे सामान्य माणसाला हवे आहे. एका शहरात २० वर्षी पुर्वी संघटन आसावे यासाठी प्रथम मेळावा झाला तेंव्हा विशेषांक ही आम्ही काढला नंतर ४/५ वर्ष मध्यवर्ती संस्था काम करीत होती. आज या शहरात किमान २०/२५ गट व ७/८ संघटना कार्यरथ आहेत. एका एका संघटनेत किंवा संस्थेत किमान २/३ गट या गटातभांडणे या गटात मार्या मार्या. वाद म्हणजे समाजकार्य, शिव्या म्हणजे समाज कार्य दमदाटी ॅम्हणजे समाज कार्य, पैशाचा बडेजाव पणा म्हणजे समाज कार्य या विचारात सामाजासाठी जे व्हायचे आहे ते शुन्य समाजातील राजकीय अर्थिक बाबत समाजाची शोकांतिका झाली याला जबाबदार कोण ? यासाठी शिवराळ पणाचे केळवण करून बोळवण करा.
आपण आपले म्हणून ज्यांना मत देऊन मिरवतो या पुर्वी जाणता राजा म्हणुन शरद पवारांनी आपले म्हणुन दोन महामेळावे घेतले. त्यांनी बक्षिस काय दिले तर राजकीय कोंडी करून मराठा कुणबी ही नवी जात निर्माण करून आपल्या पायात साखळदंड ठोकले. ह्या बाबत मी या पुर्वी लेखन केले आहे. तेंव्हा अधीक न सांगता एवढेच म्हणेल आपण आपला शत्रु हुडकू शकलो नाही . आपण आपला मित्र शोधु शकलो नाही शात्रुलाच आपण मित्र समजुन कवटाळुन बसलो. परिणाम काय तर मराठा व ब्राह्मणी संस्कृतीने आपली बोळवण केली. आपण या दोघांचे केळवण करून बोळवण करू शकतो हा या विचारपिठाचा आज सवाल आहे. देश पातळीवरील, राज्य पातळीवरील संघटना व संस्था असो ती रजिस्टर असो आगर नसो. पण आपण तेली तुतक मेळावा समाज संघटन वाढवावे. विचाराने उभे आसतो वाटचाल सुरू करतो. या वाटचालीत आपला शत्रु कोण आसतो तर आपलाच समाज बांधव ज्याचे संघटन करू पहातो त्या समाजातच सत्तेसाठी, पदासाठी मी पणा साठी हा माझा परका हा भेद करतो. यातून आपणच आपला शत्रु निर्माण करतो. मग सत्ता मिळवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी समाजातील मस्तवाल मंडळी किंवा समाजा बाहेरील गुंड प्रवत्ती हाताशी धरूनवावरत आसतात. आपला हेका पुर्ण करण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, पद मिळवण्यास आपण समाजातील शत्रु निर्माण करतो. ते करणे म्हणून कधी एक बाजूने कधी दोन्ही बाजूने परस्पर दम बाजी, शिवीगाळ पणा, मारा मारी घडत आसते. या साठी बर्याच वेळी समाज बाह्य शक्ती ही आपल्या झुंझवत आसतात. आपण झुंजत आसतो म्हणजे आपला बांधव हा फक्त आपलाच खरा मित्र आसतो. परंतु आपण त्याला मित्र न मानता खरा शत्रु मानतो विचाराच्या रस्त्याला शत्रुत्वांची झालर लावतो. अशी झालर ज्या ज्या वेळी लावली जाते तेंव्हा आपला बांधव, आपल्या रक्ताचे नाते आपले शत्रु आसते. अशी शत्रुत्वाची लढाई आपण त्वेषाने लढतो परंतु आपला मित्र असलेला ब्राह्मण किंवा मराठा वाद आपणास कधी संपवतो हे कळत नाही. जेंव्हा संपवतो तेंव्हा आपण दोघे ही कुठे तरी भरडलेले आसतो. शक्ती हिन आसतो. याची जाणीव होते आणि दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिण्यात मोठे पण मानतो. आज हेच अनेक गावात अनेक शहरात समाजाचे तारण कर्ते म्हणुन मिरवणार्या संघटना पातळीवर हेच सुरू आहे. इथे आपण समन्वय साधणारे नको म्हणतो इथे आपण मित्रालाच शत्रु ठरविण्यात शक्ती खर्च करतो म्हणुन कधी कॉंग्रेस संस्कृती कधी मराठावाद कधी मोंदीच्या मागे दडलेला ब्राह्मणवाद हाच आपला सखा आसतो या सख्या मानलेल्या मित्राला कवटाळत संत संताजींनी ज्या वाटा उजळल्या ते समजुन न घेता काळतो याचे भान सुटले आसते. म्हणुन आता ज्यांना विरिष्ठ म्हणतो, आपण ज्यांना संघटनेचे चालक म्हणतो त्यांनी समाज अंतर्गत शत्रुचे शत्रुत्वचे केळवळ करून बोळवण करावे.