घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (4)
संघर्षाचे दोन वेगवेगळे भाग आहेत. भूत ही एक कल्पना आहे. या कल्पनेशी संघर्ष करणे तसे सोपे आसते. कारण या संघर्षाला मर्यादा आसतात. त्यामुळे हा संघर्ष लढणे फार सोपे असते. ओबीसी साठी जो संघर्ष चालतो त्या संघर्षात तेली समाज आला तर संघर्षाची लढाई मोठी होईल. कारण १९३१ च्या जणगनने नुसार ओबीसी ५२ टक्के आहेत. यात सर्व जातीचे हिंदूच आहेत. ४४ टक्के या. ४४ मध्ये माळी, तेली, वंजारी, धनगर व वंजारा यांचीच संख्या जास्त आहेत. म्हणून मी हायकमांड मधील जबादार पदाधीकार्यांना फोन केला. आपण आपल्या सह समाजाला ओबीसी संघर्षात आना तेंव्हा ते म्हणाले ओबीसीत दम नाही आता मला सांगा ४४ टक्के मधे तेली १० ते १२ टक्के मग या बहुसंख्य समाजाचे नेते जर संघर्षाच्या रस्त्यावरून पळुन जात असतील समाज पातळीवरील चिंतन शिबीरात संघर्षाची गर्जना देत असतील तर समाजाला या भूताबरोबर किती लढावयास लावणार. हा प्रश्न या ठिकाणाी उभ रहातो. कारण हे हाय कमांड जे बोलते तेच वाक्य जेंव्हा त्यांनी नेमलेले पदाधीकारी आगदी तसेच बोलतात तेंव्हा खर्या संघर्षा पासून समाज किती दूर आहे हे समोर येते. १० टक्के तेली समाजाला मिळत नाही ते आपन मिळवा ही गर्जना केली जाते. अनेक मुलुख मैदानी तोफा धडाडतात या धडाडताच प्रचंड टाळ्यांचा गजर होतो. हा संघर्ष कल्पनेचा आसतो तो त्यांचा आसतेा. कारण १० टक्के समाजाचे जे पळवले ते माळी, सुतार, कुंभार, मातंग, नाभीक, चांभार नवबैद्ध यांनी लाटलेले नसते. पळवले आसते मराठा व ब्राह्मण समाजने. या समाजाकडून हिसकावून घेण्यासाठी खरा संघर्ष करावा लागतो. गर्जना करणार्यांनाही स्पष्ट माहित आसते इथे गाठ मराठा व ब्राह्मणाशी आहे. समाज पातळीवरील गर्जना सोपी आहे पण हा संघर्ष नको रे बाबा मग आ. विनायक मेटे, बबनराव पाचपुते, यांनी समाजाची नालस्ती केली तरी ही मंडळी खर्या संघर्षा पासून दूर जातात उलट ज्या बबनराव पाचपुते यांनी आब्रु वेशीवर टांगली त्यांच्या प्रचाराला हाजेरी लावणारे तेली समाजाचे नेते मुलूख मैदान तोफ असतील तर ...............?