त्यांना समज आली तेंव्हा वडील राहुरीत बैल घाना घेत होते. ताज्या पेंडीचा व ताज्या तेलाचा सुगंध घरभर पसरत होता. त्याच घानवडीत ते उभे रहात चालु लागले शाळेत जावु लागले. जगण्यापुरते व्यवसायापुरते शिक्षण मिळाले या शिक्षणावर ते वडीलांना उद्योगात मदतकरू लागले. काळ बदलू लागला शेंग व करडी पीक कमी होत होते. मुळात पारंपारीक तेल घाण्यापेक्षा यांत्रिक पद्धतीने तेल उत्पादन होऊ लागले. या संकटामुळे घानवडी संपल्या, तेलघाणा घरा बाहेर गेला. बैलाची झापड खुंटीवर तशीच राहीली. डोळ्याला झापड बांधुन पंरपरेे जीवन जगण्या पेक्षा डोळे उघडे ठेऊन जगु ही जिद्द श्री. आसाराम भाऊ यांनी समोर ठेवली. 1965 मध्ये राहुरी शहरात आपल्या मोक्याच्या जागेवर सायकल दुकान सुर केले. आज जशी टु व्हीलर आसणे एक प्रतिष्ठेचे मानले जाते तसे त्या वेळी सायकल आसणे ती चालवता येणे प्रतिष्ठेचे होते. नवी सायकल विकणे, सायकल दुरूस्ती करणे. सायकल भाड्याने देण हा व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करु लागले. याच जोडीला स्टेशनरी दुकान ही सोबतीला ठेवले. बाजारा दिवशी तर भाऊंचे तोंड ही दिसत नसे. इतकी गर्दी तेथे जमा होती. भाऊंच तेली मन संस्कार क्षम वयात ताज्या तेलाचा सुगंध अनुभलेला हा सुगंध त्यांना शांत बसु देत नव्हता त्यांनी त्याच जागेवर तेल विक्री व्यवसाय सुर केला. बॅलरने तेल मागवुन ते किरकोळ मध्ये विक्री करु लागले. या व्यवसायातुन जन संपर्क वाढला या विक्रीतुन घराला घर पण आले. व्यवसायाला स्थिर ठेवायचे आसेल तर व्यवसायाची गणिते जवळ पाहिजेत. जसा काळ बदलतो तसे गिर्हाईक बदलत आहे. या बदलत्या अवस्थेचा जो अचुक अंदाज घेऊ शकतो त्या अदाजाप्रमाणे व्यवसायात बदल कर शकतो जो आपल्यात मुळात बदल करू शकतो तोच आघाडीवर जावू शकतो. तोच आघाडी राखू शकतो. सुट्या तेल विक्री पेक्षा पॅकेजिंग महत्व आले. श्री. आसाराम भाऊनी विचार आज दोन मुले व भावांचा मुलगा सुट्टे तेल किती दिवस विकु शकतील ही फार मोठी उद्याची अडचन आहे. या साठी श्री. पॅकेज एजन्सी नावाने उद्योग उभा केला. कै. दिपक व श्री. अजय यात जम बसवण्यास सुरवात केली परंतु कै. दिपक यांचे अकस्मित निधन झाले. श्री. अजय या चिरंजीवास पुतण्या श्री. अजिंक्य याने सहकार्य दिले यामुळे आज श्री पॅकेजींगचे पाउच व डबे राहुरी तालुक्यात घरो घरी विश्वासाने जात आहेत. आज राहुरी एम.आ.डी.सी परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग उभा आहे. आणि विक्री व्यवस्थाही तशीच कार्यरथ आहे.
20 वर्षा पुर्वीची गोष्ट आहे मासिकाच्या कामासाठी मी राहुरी स्टँडवर उतरलो बाजारपेठत फिरताना नगर पालीके समोर तेल विक्रीचे दुकान दिसले. आत गेलो आणी थोडा दचकलो सुद्धा एक भारदस्त व्यक्तीमत्व समोर आले. मी एक तेली म्हणताच त्यांनी पोटभर स्वागत केले तेंव्हा मी सुखावलो. अगदी कसलीच चौकशी न करता स्वत: सहकार्य तर दिलेच उलट राहुरी शहर व ग्रामिण भागात सहकार्यासाठी विश्वास दिला. भाऊ एक स्पष्ट स्वच्छ व्यक्तीमत्व जे बरोबर आहे त्या बरोबर सह भाऊ असतात जे चुक आहे त्याला जाणीव करन देतील जे चुक आहे. त्याला सुधारावयास संधी देतील नाहीच सुधारला तर तुझा तु सुखी ही विचार धारा. यातुनच राहुरी शहरातील बांधव एक झाले पाहिजे धडपड उरात ठेवुन ते वावरू लागले या संघटनेला ही बाळसे आले. महाराष्ट्राची कुलदैवत भवानी माता दसर्या दिवशी ही भवानी माता पालखीत बसते. ती तुळजापुरात सिमाउल्लंघन करते ती पालखी राहुरीत तयार झालेली इतिहासाच्या पानावरून ती शेकडो वर्ष वाटचाल सुरू आहे. या एैतिहासिक कामात भाऊ सर्वा बरोबर नव्हे तर पुढे असतात हा समाज ठेवा जतन करून समाजाला सोबत ठेवतात. अहमदनगर जिल्हा तेली समाज संघटन होण्यास ते होते. नगर येथे प्रथम जे सामुदाइक विवाह सोहळा व मेळावे झाले. त्यात ते सक्रिय होते. महाराष्ट्र तेली महासभा नगर जिल्हास्तरावर ठेवण्यात ते सर्वा समोर आहेत. यातुन अनेक उपक्रमात त्याग, सेवा व निष्ठा त्यांनी दिली आहे. राहुरी तालुका तेली महासभा जी आज उत्कृष्ट काम करते त्या मध्ये भाऊंची दिशा दर्शक भुमीका महत्वाची आहे. नडल्या आडल्या बांधवास आपले भाऊ वाटतात. समाजाला नडणार्याला भाऊ आपला हिसका ही दाखवतात.
स्वातंत्र मिळाल्यानंतर फक्त मतदानाचा हाक्क मिळाला. सत्तेत सहभाग ही मिळाला नाही. परंतु मंडल आयोगाने तो मिळु लागताच भाऊ नगरपालीका सदस्य झाले. आपल्या संघटन नेतृत्वाने राहुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष ही झाले राहुरीच्या इतिहासात पहिला मान त्यांनी निर्माण केला व नव्या इतिहासाचा रस्ता ही निवडला भाऊंना दिर्घ वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.