कृष्णा नदीकाठावरचे जिहे करापूर एक सधन गाव. गावाला बारा महिने गरजे पुरते पाणी. गाव व गावातील ग्रामस्थ अतीसधन नव्हते पण सुखी होते या गावात 1920 च्या दरम्यान प्लेगची साथ आली. गाव सोडून ग्रामस्थ दर जावू लागले. या गावचे दादोबा भोज यानी आपला घाणा बंद केला जमेल तेवढे साहित्य बरोबर घेतले. मनाला समाधान वाटावे म्हणुन दाराला कुलूप लावून गाव सोडले. मजल दर मजल करित पाटण गाठले. पाटण हे आज्जीचे गाव. गाव तसे प्लेग रोगा पासुन बर्यापैकी सुरक्षीत होते. आज्जीला ही कोण नवहते. कै. दादोबा यांच्या बरोबर त्यांचे बंधु ही होते. आणि आजीच्या सवलीत हे दोघे बंधु लहानाचे मोठे झाले. कै. दादोबा भोज यांना लक्ष्मण, रामचंद्र, नारायण, कृष्णात, रघनाथ ही पाच मुले व मुक्ताबाई तुकाराम चिंचकर सोनाबाई बाबुराव राऊत ह्या मुली काबाड कष्ट करुन घर चालवणे ही जीवन शैली होती.
कै. दादोबा भोज यांचे रामचंद्र भोज हे दोन नंबरचे. पाटणच्या शाळेत ते लिहीता येईल एवढेच शिकले घरात भाकरीची लढाई सुरू होती म्हणुन ते वयाच्या 14/15 व्या वर्षी सुशीला राजे पाटणकर यांच्याकडे कामाला लागले महिना पगार पाच रपये. हाक्कोच मिळणारे पाच रूपये हे घराला घर पण देत होते. या कामात त्यांचे मन रमेना वयाच्या 16 व्या वर्षी मिसरूड फुटू लागले तेंव्हा ते स्वारगेटवर आले. खेडेगावातून या गजबत असलेल्या शहरात गावाकडच्या ओळखी पाळखी काढत ते मिळेल ते काम करू लागले. प्रवास या क्षेत्रात रमु लागले. इथेच ते ड्रायव्हींग ही शिकले. या क्षेत्रातील एक हुशार प्रामाणीक, व्यसना पासुन दूर असणारी मंडळी फार कमी सापडत असतात. या कमा मध्ये भोज होते. हे आबासाहेब गरवारे यांनी आळखले आपल्या गरवारे कंपनीत त्यांना सामील करून घेतले. कै. रामचंद्र भोज यांच्याकडे पुण्यात आल्यानंतर नाही जवळ पैसा, नाही जवळ वाडवडीलांची पुणे येथे परंपरा, नाही जवळ भक्कम कुणाचा आधार होता फक्त उपरे म्हणुन सोबत. परंतु या ही पेक्षा एक गुण गरवारे कंपनीच्या मालकांच्या म्हणजे आबासाहेब गरवारे यांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणुन ते काम करू लागले एक प्रमाणिक माणुस ही साठवण ते गरवारे यांच्या जवळ मिळवु शकले.
एरडंवणा गावठाणातील पाटील चाळ या चाळीतील दहा बाय दहाची खोली. खोलीत भोज यांनी संसार उभा केला. येथे जगण्याची साधन तुटपंजी भाऊ गावाकडे धडपडत होते यातील कृष्णा व रघुनाथ या बंधुना पुण्यात आणले. सुरवातीला सर्व त्या खोलीत रहात. इथेच मग या बंधुना उभे केले. त्यांना नोकरी काम धंदा लावून दिलाच सोबत आपले भाऊ सुस्थीर व्हावेत यासाठी त्यांची कर्ज ही भागवले. कै. राचंद्र भोज यांचा जन्म 1925 चा वयाच्या सोळाव्या वर्षी ते पुण्यात आले स्वत: उभे राहिले. गरिबी कशी आसते याचा अनुभव रक्तात भिनलेला कष्टाचे चार पैसे बाजुला ठेवत एरंडणा परिसरात जागा खरेदी केली. कुटूंबाला रहाण्या पुरती ती प्रथम बांधली. स्वत:चे घर पुण्यात असावे ही इच्छा पुर्ण झाली. उद्योग, व्यवसाय प्रयत्न व चिकाटी हे अंगभूत गुण असल्याने त्यांनी प्रथम सायकल दुकान व एक पिठाची चक्की सुर केली. कंपनीतुन आल्या नंतर स्वत: किंवा हाताशी आलेली मुले ती चालवू लागली कै. रामचंद्र भोज यांना, नंदकुमार, राजेंद्र, विजय ही तिन मुले. या पैकी नंदकुमार व राजेंद्र यांना गरवारे कंपनीत नोकरी लावली. श्री. विजय यांनी वडीलांच्या मार्गदर्शना खाली व्यवसायात लक्ष दिले. व्यवसाय कोणता आहे या पेक्षा तो कसा करतो. यावरती त्या व्यवसायातील यश आसते यावरच आर्थिक प्रगती आसते. 1985 मध्ये एरंडवण परिसरात पल्लवी फ्लोअर मिल सुरू केली. त्यापुर्वी असलेले सायकल दुरूस्ती बंद केली हा परिसर सुशिक्षित नागरीकांचा. त्यांना पैशा पेक्षा विश्वास मोठा हा विश्वास येथे मिळू लागला. त्या मधये श्री. विजय हे होतकरू व धडपडे असल्यामुळे त्यांनी पल्लवी फलोअर मिलला एक प्रतिष्ठा निर्माण करता आली. त्यामुळे ते आर्थिक बाबत सक्षम झाले. श्री. विजय भोज यांना श्रीधर व श्रीकांत ही दोन मुले. मोठे श्रीधर हे उच्च शिक्षीत भरपुर पगाराची नोकरी मिळू शकली आसती परंत लहान पणा पासुन व्यवसायात नजर होती. 1985 मध्ये पल्लवी फ्लोअर मिल सरू होती या उद्योगात आज बरेच सुलभी करण झालेले बदलत्या युगात वेळ कुणाला आहे धानये विकत आणा ती स्वच्छ करा दळण दळा. त्यापेक्षा तयार पीठ ही गरज निर्माण झाली श्री. श्रीधर यांनी ही गरज ओळखली आपल्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक नविन ब्राँड त्यांनी बाजारात आणला या साठी अधुनिक मशीनचा वापर नव तंत्रज्ञानाचा अवलंब केला. उत्पादन व विक्री व्यवस्था उभी केली. शुद्ध व पोषणाने परिपुर्ण धान्य घेऊन त्यापासून पीठ निर्मीती करून आकर्षक वेष्टनात विक्री सुर केली. आज एरंडवणा, कर्वे नगर, कोथरूड या परिसरात दुकानांना पॅकींग पुरवतात. निवडक धान्या पासन वेग वेगळी 32 पिठांची निर्मीती करून विक्री सुरू आहे. श्री. विजय भोज यांचे दुसरे चिरंजीव श्रीकांत हे एम.बी.ए. पुर्ण करित आहेत.
क्षणभर मागे पहिले तर जवळ काहीच नवहते कै. रामचंद्र भोज हे बरोबर विश्वास व धडपड घेऊन आले. आणी स्वकष्टावर भोज कुटूंबानी गरूड भरारी घेतली श्री. विजय भोज हे सामाजीक जाणीव असलेले बांधव पुर्वी 82 भवानी पेठ या समाज संसथेशी उपनगरे संलग्न नव्हती. आशा वेळी स्थानीक प्रश्न सोडविण्यासाठी कोथरूड येथे संताजी प्रतिष्ठान उभे राहू लागले श्री. भोज यात सामील झाले. वधुवर मेळावा स्नेहमेळावे संस्थेचे विविध उपक्रम यशस्वी करण्यात सहभाग. आज या संस्थेचे एक जबाबदार घटक म्हणून कार्यरथ आहेत पाटणहुन या मातीत उभे राहुन झेप घेणार्या भोज कुटूंबीयांना हार्दिक शुभेच्छा.