दिवाळी मे मिहना. शाळेला मोठी सुट्टी असली की हर तारा बिड जिल्ह्यातील शिरूर येथिल माम निवृल्ली रामभाऊ रणखांब यांच्या जवळअसे शिरूर तसे बाजाराचे गाव या गावा सह आजुबाजुच्या गावातुन, खेड्या पाड्यातुन हा शाळकरी मुलगा फिरायचा. डोक्यावर पाटी, पाटीत मिठाई त्या शेजारी तेलाची बरणी आणी इतर काही बाही हाळी पाटी सारखी ही पाटी रोज दहा बारा मैलाचा फटका मारीत आसे.
या तार्यांचे मुळ गाव नगर जिल्ह्यात जिल्ह्यात शेवटच्या टोकाला असलेले बालम टाकळी. घरात रोज रोजी - रोटीचा प्रश्न आणार या साठी कधी कधी ही काळी पाटी उपयोगी पडत आसे. शाळेत तर जावे लागे. कारण एक हुशार मुलगा म्हणुन गुरूतींची नजर आसे. या हुशार तार्यला इमारतीच्या कामावर बांधंधार्यावर - मोरी- पुल अशा ठिकाणी मजुर असत. या मजुराकडे जावे लागे. पाटीतील गोळ्या - बिस्कीटे आणी बिडी काडीचे हे फिरते दुकान चालवावे लागत होते. याच वाटचालीत आलम टाकळीलीत शिक्षण संपले म्हणुन हायस्कुल साठी बोधेगांव पर्यंत पायपीट करावी लागे. त्या काळी पाथर्डी हेच परिक्षा केंद्र होते जचवळ जवळ 40 किलोमिटर पायीच करावा लागला. प्रवास करून एस.एस.सी. परिक्षेत चांगलेच मार्क पडले. आपणही शिक्षक होऊ ही जबरदस्त हौस म्हणुन शिक्षक प्रशिक्षणाचा फॉर्म ीरला. सोबत घ्यावे लागत होतो दोनशे पंधरा रूपये. ते जवळ नव्हते. प्राचार्य मार्क पाहुन म्हणाले प्रवेश घे व पंधरा दिवसात पैसे दे. पण पंधरा दिवसात एवढे पैसे आननार कोठुन हा प्रश्न तसाच राहिला. आयुष्यभर न सोडवता. परंतु या प्रसंगाने जीवनालाच वेगळी कलाटणी मिळाली.
नुकतेच मिसूड फुटलेले गावात हाळी पाटीवर घरातले प्रश्न सुटत नव्हते. गावात मिळुन मिळणर किती हा प्रश्न भेडसावत असतानाच एक ओळखीचा ट्रक दिसला ट्रक पुण्याला निघाला होता. आपण पुण्यात जावे हे तान्यानां वाटले. इथे तारा ही होता येत नव्हतें आणी चंद्र ही. पुण्यात आपण तारचंद्र होऊ. ट्रक वाल्याने पुढे न बसवता मागे बसवले. मागे तर मागे पैसे घेत नाही हीच मोठी बाब हेत. हा दिवस होता 21 जुन 1966 चा बालम टाकळी गावातुन पुण्याच्या भवानी पेठेत येण्याचा. भवानी पेठ तेंंव्हा मुख्य बाजार पेठ होती या पेठेत गावातील कै. लखीचंद नहार भेटले. याच पुण्यात सतिषकाका रणखांब व ंकरराव व्यवहारे भेटलेव विश्चनाथ तुषकर ही होते. याच ओळखीतुन धनराजजी मुथा यांच्या दुकानात नोकरी मिळाली. पेठेतील हे घााउक विक्रीचे मोठे दुकान. याच दुकानात आडत व्यवसायाची ओळख झाली. यास ओळखीत बारकावे तपासता आले. त्याची साठवण करता आली. किती मिळे तर 80 रूपये हे ंशी रूपये ही फार मोठे होते. या पुण्यात काम मिळाले पण रहाणार कोठे हा प्रश्न उभा राहिला गावात मि नव्हते पण रहावयास घर होते. इथे काम आहे पण मुक्काम कुठे करणार ? याच नाना पेठेत गंजीच्या मारूती सापडला . या ठिकाणी एक वळकटी घेतली रात्र पडली की नऊच्या दरम्यान ताराचंद्र देवराय मंदिराच्या अडोशाला झोपत सकाळी पुजारी येण्या पुर्वी वळकटी आडबाजुला ठेवून कामाला लागत.या वाटचालीत 4/5 वर्ष गेली.
देशात व परदेशात दुरद्रिष्टी, ओचित्य व लोकांचा संग्रह या बळावर भरभराटीस आलेला प्रविण मसाला हा उद्योग समुह. यांच्या नजरेत हा ताराचंद्र पडला. कुशाग्र बुद्धी, लिनता, व्यवहाराची ठेवण त्यांनी ओळखली आणी ताराचंद्र देवराय त्यांच्या उद्योगाचे एक अविभाज्य अंग बनले. या त्यांच्या एकरूपतेला 50 वर्ष होत आलीत. मे. धनकुमार आणी कंपनी या आडत दुकानात ते दिवाणजी म्हणुन काम करीत आहेत. ताराचंद देवराय एक दिवाणजी बनले. मुळ स्वभाव जगा वेगळा. जगा वेगळा या साठी की बारकावे समजुन घेणे. शासनाला ज्या पद्धतीने हिशोब असावेत वाटते तसे ठेवणे. यातुन कंपनीचा उत्कर्ष करणे ही प्रणाली. भवानी पेठेतील ठोक व्यपार गुलटेकडी येथे स्थालांतरीत झाल्या. नंतर अनेक दिवणजी सहकार्यांची ओळख झाली. कामातील अडचणी, वेतन, निवारा याबाबत चर्चा सुरू झाली. माझ्या सारख्याच या बांधवांच्या कमी जास्त आडचणी आहेत. तेंव्हा आपली एक संघटना असावी या संघटनेच्या बळावर आपले प्रश्न सोडवु ही भुमीका त्यांनी मांडली. या भुमीकेला सर्व दिवाणजीं मंडळींनी होकार दिला. यातुनच गुलटेकडी मार्केट परिसरात पहिली दिवणजी मंडळींची संघटना स्थापन केली. या संघटनेची जी पहिली मिटींग झाली. याच मिटींग मध्ये श्री ताराचंद देवराय हे पहिले अध्यक्ष झाले. प्रशासकीय कामात येणार्या अडचनी त्यांनी सामोपचाराने सोडवून अर्थीक प्रश्न सोडविले आपल्या सोबत्यांना कायम निवारा असावा या साठी दिवानजी सहकारी गृह रचना संस्था सन 1983 मध्ये स्थापन केली. यासाठी माणिक शेठ दुगड यांच्या कडून 4 एकर जागा खरेदी केली या साठी 150 दिवानजी सभासद तयर केले. आर्थिक विवंचनेत अडकल्याने बांधकाम होत नव्हते. आशा वेळी सन 2000 मध्ये 2 एकर जागा जय गणेश ग्रुपला देऊन त्या मोबदल्यात 150 फ्लॉट बांधुन दिले ते ही फक्त दिड लाखात.
बालम टाकळी वरून ताराचंद ट्रकच्या केबीनमध्ये नव्हे तर मागे बसुन पुण्यात आले गंजीच्या मारूतीच्या देवळात 4/5 वर्ष मुक्कामाला होते. याच वेळी सन 1969 मध्ये जालना येथे लग्न झाले. कु. शशीकाला या सौ. शशीकला झाल्या. ताराचंद यांनी आपली मंदिरातील वळकटी 383 गणेश पेठ येथे 7 बाय 7 च्या खोलीत हलवली एक शुन्य दोघा समोर होते. आशा वेळी सौ. शशीकला यानी समजुन घेतले या पुण्यात काही करावयाचे असेल तर हे दोन हात आहेत. त्या दोन हातांना आपले दोन हात कामात गुंतवले तर काही तरी घडेल. या साठी मीठ पिशवी भरणे, सुपारी पुड्या भरणे, सांडगे तोडणे हा घरचा उद्योग घरी सुरू केला. या मुळे पैशाला पैसा जोडला जावु लागला. याच मुळे पुणे सातारा रोडवर शाहु सोसायटीत हरि - हंस ही स्वत:ची टुमदर इमारत उभी केली. गंजा मारती मधील वळकटी ते स्वत:चे घर हा प्रवास करिताना सुरेश, गणेश ही मुले व दिपाश्री व जयश्री यांना संस्कार दिले. जीवनात स्वत:च्या पायावर उभे रहाता येईल एवढे व्यवसायीक शिक्षण ही दिले. यामुळे आज गणेश व सुरेश गुलटेकडी मार्कट यार्ड मध्ये स्वत:चे मेडीकल दुकान यशस्वीपणे संभाळत आहेत. मुली दिपाश्री व जयश्री या आपल्या घरी सुखी आहेत. जावई श्री. विजयकुमार पिंगळे व श्री. विनोद क्षिरसागर आपल्या क्षेत्रात प्रगती पथावर आहेत.
2-3-1946 साली श्री. ताराचंद देवराय यांचा जन्म झाला. गरिबाला शरण न जावून स्वत:चे नशीब सर्वच घडवू शकतील परंतु दुसर्याचे नशीब घडवीण्यासाठी घडण करणरे मन लागते. हात लागतात ते देवरायांच्याकडे आहेत. पैसे कमी पडतात म्हणुन रात्री दलाल अरचंदजी यांच्याकडे रात्री 2 तास 20 रूपया रोजाने काम केले. नशीब घडावे म्हणुन 12 वर्ष भागीदारीत प्रेस व्यवसाय ही केला. बालम टाकळी येथे आडत दुकान ही चालवले आपल्या मुलांना पुजा मेडकील सुरू करून दिले. नव्हे तर यात लक्ष देऊन ते दुकान मार्केट परिसरात अग्रगण्य केले. हे स्वत:चे नशीब घडविले. परंतु आपल्या नात्यागोत्यातील आपल्या गोत्यातील, आपल्या भावकीतील, आपल्या भागातील जी घरे मोडकळीस आली होती त्यांना देवराय यांनी पुण्यात आणले. या पुण्यात त्यांचा भाकरीचे प्रश्न मिटतील. त्यांचा निवारा कसा होईल हे ही पाहिले. आसे किमान 60 ते 70 जन आहेत. लग्न जमविणे हा छंद व समाधान आज 62 कुटुंबे अशी आहेत की ताराचंदशेठ यांनी त्यांच्या सुखी कुटुंंबाला आकार दिला आहे.
प्रविण मसाले वाल्यांनी त्यांना प्रविण केले हे सत्य ते जीवनभर अभीमानाने मिरवतात. त्या साठी सुरूवातीला रोज 18 तास काम करित होते. स्थिरता आल्या नंतर 1983 मध्ये पुणे तिळवण तेली समाजाने त्यांना बिनविरेध निवडूण दिले याच काळात सामुदाईक विवाह, वधु वर मेळावे सुरवात झाली सर्व विश्वास्ता बरोबर या वधु-वर मेळाव्याचे ते जनक होते. 1985 ते 2000 या काळात ते तिळवण तेली समाजाचे चिटणीस होते. सर्व सामान्यांना सायकल वाटप वह्या वाटप व इतर गरजा भागवत होते. श्री. ताराचंद देवराय धार्मीक वृत्तीचे श्री. संताजी, श्री. विठ्ठल भक्ती हा दिनक्रम पंढरीला वारीला सहकार्य करणे ही वाटचाल. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाने त्यांना सेक्रेटरी म्हणुन होण्यास विनती केली. ते आव्हान स्विकारले. पुर्वीच्या मंडळींनी शुन्यातुन प्रगती केली होती. जनमानसात विश्वास निर्माण केला होता. पालखी सोहळ्यास स्थीरता आली होती. आता प्रगती हवी होती. पंढरपुर येथे पालखी मुक्कामास एक तर जागा मिळत नसे मिळाली तर अपुर्ण. आपली जागा असावी या साठी प्रयत्न सुरू झाले. यात त्यांनी जबाबदारी पार पाडली. पालखी संस्थेच्या जागेवर मठाचे बांधकाम समाजाच्या सहकार्याने सुरू केले. आज तेथे 20 खोल्या उभ्या केला. तेथे आज सदस्य आहेत. सेक्रेटरी नाहीत पण पालखी सोहळयाच्या वाटचालीतील काही अडचनी यांच्याच सल्याने सोडवीतात. श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते जॉ. सेक्रेटरी होते.
बीड मधील शिरूर येथे किंवा बालम टाकळी येथे डोक्यावर गोळ्या विकणारा मुलगा. पैसे नाहीत म्हणुन शिक्षक होऊ शकत नाही. गावात रोजगार नाही. पुण्याला जाण्यास पैसे नाहीत ट्रक मध्ये बसुन पुण्यात येतो काय ? नाना पेठेतील गंजाच्या मारूती मंदिरात रहातो काय ? आणी स्वत:चे नशीब घडवुन अनेकांचे नशिब घडवीणारे श्री. ताराचंद देवराय खरेच धडपडीचे व्यवहाराचे मानवतेचे वेगळे रसायन आहे.