उत्सव अध्यक्ष श्री. सुरेश मारूती जगनाडे यांचे मनोगत
श्री. संताजी महाराज श्रीसंत तुकाराम महाराजांचे स्नेही, टाळकरी म्हणा किंवा त्या समकाळातील सहवास लाभलेले तेली समाजाचे संपुर्ण महाराष्ट्रातील समाजाचे दैवत तुकाराम गाथाचे खर्या अर्थाने साक्षिदार नव्हे शिल्पकार आणि श्री. क्षेत्र सुदूंबरे समाधी स्थळ होय.
संत एकमेकांच्या सहवासातील वाढतात नित्यक्रम करतात एकमेकांचे साक्षिदार होता. एकमेकांच्या वाचनासाठी स्वर्गातुन भुलोकात यावे व समाधी मुक्तीसाठी तीन मुठी माती देणे ही काही साधी गोष्ट नाही. ही फार मोठी भक्ती मधील शक्तीची ताकदच म्हणावी लागेले. तेच हे संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे (वास्तव्य) लाभलेले श्री. संताजी महाराजांचे जिंवत स्थळ तुम्हा आम्हा सर्वाचे प्रेरणा स्थान होय.
मार्गशिर्ष शु. १३ हा महाराजांचा समाधी सोहळा या आपल्या दैवताचा समाधी सोहळा प्रत्येक गावात, शहरात दिमाखात साजरा करतात या गोष्टीचा एक समाज बांधव म्हणुन अभिमान वाटतो आणि त्याच सोहळ्याचे औचित्य साधत मार्गशिर्ष शु. १३ शके १९३६ दि. २० डिसें २०१४ च्या सोहळ्याचे अध्यक्षपद मिळाले त्या दिवसाची महाराजांची महापुजेचा मान मला सपत्नीक मिळाला हे खरोखरच आमचं भाग्यच वाटतं, नक्कीच माझ्या आई - वडिलांची पुण्याई, पत्नी मुलगा सुन व माझे चिंबळी गावातील समाज बांधव यांच्यासाठी आनंद वाटावा असा योग आहे.| प्रत्यक्ष संजिवन समाध स्थळास नव्हे प्रत्यक्ष महाराजांच्या जवळ जाण्याची संधी नाहीतर योग जुळून आला त्या बद्दल समाज बांधव व पदाधिकारी यांचा मी आभारी आहे.
संपुर्ण महाराष्ट्रातील तेली समाजाचे दैवत संताजी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात वेगवेगळ्या पद्धातीने साजरी करताना आणि ती केलीच पाहिजे परंतु पांडुरंगाचे मंदिर प्रत्येक गावागावात आहे म्हणजे साक्षात तिर्थक्षेत्र पंढरपुरचे महत्व कमी होत नाही किंवा होणार नाही कारण आपला वारकरी संप्रदाय त्यासाठी साक्षात विठ्ठलाच्या रूपात आपल्या समोर आल्याशिवाय राहत त्यामुळे दिवसेंदिवस पंढरपुरची आषाढी वारी स्वरूप वाढतच चाललय. त्यामुळेच आपल्या समाजासाठी प्रती पंढरपुर म्हणुन सुदूंबरे म्हणाले तरी योग्यच वाटेल जेव्हा मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई सर्व स्तरातील समाज बांधवांना विनंती आपण एकदा तरी सहकुटूंब या समाधी स्थळास भेट देवुन महाराजांचे आशिर्वाद घ्यावेत.
खरेतर माझे कुटुंब शेतकरी चिंबळी गांव म्हणजे वाडी- वस्ती शेतीतुन हलाखीच्या परस्थितीत छोटासा किराणा व्यवसाय सुरू केला. त्याला पत्नी - सुनंदा हिने अर्धांगीनी म्हणुन मोलाची साथ दिली. तिचे माहेर दौंड तालुक्यातील पाटस येथील देशमाने असुन लग्न झाल्यापासुन आज पर्यंत बरोबरीने साथ दिली.
चार भाऊ एक बहिण अशा कुटुंबात सर्वात लहान धाकटा मी श्री. सुरेश मारूती जगनाडे मला शेती ही बेताचीच परंतु पत्नी सुनंदा व नंतर मुलगा श्री. सुजित याने बि.कॉम. पर्यंत शिक्षण पुर्ण करून व्यवसायात मदत करत असताना समाज कार्य व गावपातळीवर सार्वजनिक कार्यात मोलाचे सहकार्य केले. ११ जाने २०१४ झालेल्या सर्वसाधारण सभेत माझी एकमताने डिसें. २०१४ साली उत्सव अध्यक्ष म्हणुन निवड झाली त्यावेळी समाज कार्यासाठी ५ लाख (पाच लाख) देण्याचे मोठ्या धाडसाने कबुल केले व ते भक्ती - निवास बांधकाम पुर्ण करण्यासाठी वापरल्यामुळे ते काम पुर्णत्वाकडे आले याचा मला अभिमान वाटतो. माझ्या उत्सव अध्यक्षा पदाच्या कालावधीत ते पुर्ण करण्याचे सामर्थ्य व बळ महाराष्ट्रातील व तमाम समाज बांधवांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे.
तरी तमाम समाज बांधवांना विनंती व अवाहन करीतो की सर्व कुटूंबासह पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थितीत राहुन समाजाची एकता व अखंडतेसाठी समाजाची एकत्रित संघटीत ताकद उभी करावी हीच महाराजांची इच्छा असावी म्हणुन तर काय समाज बांधव इतर कुठल्याही समाजापेक्षा जास्त एकसंघ व मजबुतीने कार्य पाडत असतात.
पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाने सुंदूंबरे तिर्थाच्या विकास कामास सढळ हातानी मदत करावी ही विनंती.
दिनांक 18-12-2014 01:40:11