Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे यांच्या मातोश्री कै. सौ. जयश्री बबन उबाळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. संताजी सेना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामने आयोजित कलेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ४०० गरजूंनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी १५० गरजूंनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ४ व्यक्तींची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी नाममात्र दरात चष्मे देण्यात आले.
हडपसर - श्री संताजी तेली समाज संघटना व श्री संताजी सेना हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हडपसर येथे महिलांसाठी संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, टिकली लावणे स्पर्धा घेण्यात आल्या.
यात सुमारे १०० महिलांनी यात सहभाग घेतला. निशा करपे व रूपाली केदारी यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. अलका रायजादे, सोनाली शेलार व छाया बारमुख यांनी मानाची माहेरची साठी पुरस्कार पडकाविला. जनसेवा बँकेच्या फुरसंगीचे शाखाधिकारी सुरेश अत्रे व त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित महिलांना बँकेच्या विविध बचत योजनाची माहिती दिली.