Sant Santaji Maharaj Jagnade
Nadiad Teli Samaj vadhu var melava 2016
( matrimonial from )
नेवासा :- तैलिक समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण नेहमी तत्पर राहू त्यासाठी तैलिक समाज बाधवानी साथ द्यावी समाज उत्कर्षासाठी आपण काम करू अशी ग्वाही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे यांनी केले.
नेवासाफाटा येथे शुक्रवारी द. 12 ऑगष्ट रोजी आयोजित तैलिक समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कारभारी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे, सौ. नगारे, निरीक्षक सुधाकर कवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम सर्जे भानसहिवरो सरपंच देविदास साळूंके, पोलीस अधिकारी प्रकाश लोखंडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी समाज्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन दि.6/8/2016 रोजी दुपारी 2.00 वा.तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या बाजूस जनरल हॉस्पिटलच्या कम्पोउड मधील रिक्रीऐशन हॉल मध्ये करण्यात आले होते.
मावळ तालुका तसा पाऊसचा प्रदेश म्हणून ओळखला जातो,त्यातच वरूनराज्याची आती वृष्टी असून देखील डोंगराळ भागातील,तसेच शहरी भागातील समाज्यावर असलेले प्रेम वेक्त करण्यासाठी, पालक व माताभगिनी आपल्या पाल्याना घेऊन आवर्जून उपस्तीत होते.
कार्यक्रमा मध्ये शैक्षिणीक क्षेत्रातील यश संमपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य व जेष्ठ नागरिकांचा (समाज़ा मध्ये सामाजिक काम केलेले)मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन उचित सन्मान समाज बांधवांच्या उपस्तीत करण्यात आला,तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप करण्यात आले.
दापोली - व्यासपिठावर समाजाचे समाज भुषण व तेली समाज सेवकचे संपादक श्री वसंतराव कर्डीले, महाराष्ट्र प्रांतीक महासचिव श्री. डॉ. भुषण कर्डीले, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. सतीश वैरागी, श्री. गणेश धोत्रे (कार्याध्यक्ष). श्री. गजानन शेलार, पनवेलश्री गणेश कटके व स्नेहसंमेलन अध्यक्ष, श्री. रमाकांत रहाटे उपस्थित होते.
स्नेहसंमेलन विद्यार्थी यांना क्रिडा, परीक्षेत क्षेत्रांत यश मिळविणार्यांना बक्षीस देण्यात आले. प्रथम श्री. संदीप महाडीक यांनी प्रस्तावना समाजाबाबत केलेले कार्याबाबत सांगितले.
जीवनाच्या जडघडणीत आपल्याला प्रसंगारूप अनेक व्यक्ती भेटतात. काही व्यक्ती आपला आयुष्यात ठसा उमटून ठेवतात. ललाटी सैज्यन्याचा आणि विनम्रचा आलेख घेऊनच अशी माणसं जन्म घेतात. अंगात कतु्रत्व असते, मनात दातृत्व असते, काळजात प्रचंड समाजाबाबत माया घेवून जगणारी अशी माणसं ही भेटतात. अशा व्यक्तींपैकी एक थोर विभुती म्हणजे सर्वांचे आवडते समाजभुषण कै. हरिश्चंद्र कृष्णाजी वैरागी हे होय !