Sant Santaji Maharaj Jagnade
मुंबई : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा (मुंबई विभाग) आणि आम्ही तेली प्रतिष्ठान (भांडूप) यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजासाठी एक अनोखा आणि समावेशक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भांडूप (पश्चिम) येथील सह्याद्री विद्या मंदिर (शहीद जयवंत हनुमंत पाटील मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, जंगल मंगल रोड, मुंबई - ४०००७८) येथे महाराष्ट्र स्तरीय भव्य निःशुल्क वधू-वर पालक परिचय मेळावा पार पडणार आहे.
जळगाव : अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि समाजात समानता निर्माण करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने रविवारी (१४ डिसेंबर) शांताराम नारायण चौधरी नगर (खान्देश सेंट्रल) येथे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
शिर्डी (जि. अहिल्यानगर) : शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू–वर पालक परिचय मेळावा २०२५ अत्यंत उत्साहात आणि हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा पाचव्या वर्षीही यशस्वी ठरला असून, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून वधू–वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर - तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाळा, रामटेक व नागपूर) आणि श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण
नांदेड - तेली समाज शैक्षणिक संस्था, नांदेडच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण वामनराव पावडे मंगल कार्यालय, पुर्णा रोड, नांदेड असणार आहे. मुख्य प्रवर्तक मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे.