मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर: संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी दिनांक १८ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव दिला.
दाबली धांदरणे: येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळेच्या वतीने विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.
धुळे : कालदर्शन फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने राज्यस्तरीय तेली समाज फ्रेश वधू-वर परिचय सुची पुस्तिका 2025 साठी धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील इच्छुक वधू-वर पालकांनी फॉर्म भरून पाठवावे. फॉर्म भरण्यासाठी संपर्क क्रमांक : 9960093502.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड आयोजित तेली समाज वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न
पुणे, दि. १४ – श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत आहे. समाजहिताचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.