सातारा येथे महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने तेली समाजाचा भव्य मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव, रोख बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
नागपूर, मे २०२५: तेली समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने येत्या जून २०२५ मध्ये देवळी, वर्धा येथे भव्य राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून,
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग-परळ विभागात गुढी पाडव्याच्या स्वागतार्थ भव्य शोभायात्रेचे आयोजन मोठ्या जल्लोषात पार पडले. या शोभायात्रेस समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.