दाबली धांदरणे: येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळेच्या वतीने विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.
छत्रपती संभाजीनगर तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२५ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि.०९ मार्च २०२५ फॉर्म भरुन मो. 9130401599 या नंबरवर पाठवा मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी कार्यक्रम यानिमित्ताने श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे सकाळी १०:०० वाजता पुण्यतिथी निमित्ताने अभिषेक पूजा करण्यात आली यानंतर हभप उदय महाराज घोडके यांचे सुमधुर प्रवचन संपन्न झाले
कन्नड : शहरातील लिंगेश्वर महादेव मंदिर येथे प. पू जगनाडे महाराज शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था व तिळवण तेली समाज बांधव कन्नड यांच्यावतीने श्री संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.