जालना ( प्रतिनिधी ) तेली समाज हा ओबीसी समाजातील एक महत्त्वाचा घटक असून हा समाज कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखल्या जातो महाराष्ट्रामध्ये हा समाज सर्वदूर विखुरलेला आहे आणि जालना शहर व ग्रामीण भागात हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
श्री. क्षेत्र सुदुंबरे मिती ज्येष्ठ ॥7॥ बुधवार दि. 18/06/2025 ते श्रीक्षेत्र पंढरपुर आषाढ शु. ॥15॥ गुरूवार दि. 10/07/2025
श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने शेगाव येथे नुकतेच तेली समाजाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कॅट संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तसेच चेलीपुरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कचरू वेळंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करून त्याची जनसंपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संताजी चौक, चौधरी गल्ली, शिरपूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.