पिंपरी चिंचवड : देहू येथे श्री संत संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे पोलीस पाटील काशिनाथ दादा काटेकर, श्री ज्ञानेशप्रसाद, जय संताजी अर्बन बँकेचे श्री बालाजी काजळे पुसद, पीएसआय हिंगे साहेब, सूर्यकांत चतुर बुलढाणा, अंबादासजी क्षीरसागर
अहिल्यानगर - वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज बनली आहे. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे मुलांचे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी या मेळाव्यातून साध्य होत आहे.
शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.८ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती वर्ष ४०० वे पूर्ण झाले यानिमित्ताने शिर्डी शहरात विविध ठिकाणी महाआरती व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
तेली समाज सभागृह फुलंब्री येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ, युवा नेते आनंदा भाऊ ढोके, शहराध्यक्ष योगेश भाऊ मिसाळ,तैलिक महासभेचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासभेचे युवक तालुका अध्यक्ष
श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त जय संताजी चौक, कैलासनगर, छत्रपती संभाजीनगर येथे जय संताजी नाम फलकाचे उद्घाटन अनिल भैय्या मकरीये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाचे अशोक लोखंडे, कचरू वेळजकर, संतोष सुरुले भरत दळवे, सुनील क्षिरसागर, गणेश पवार अनिल क्षीरसागर रामचंद्र जाधव, सुभाष वाळके