संत तुकारामाचे अभंग सन्तु तेली / संताजीचे तोंडपाठ होते. ते संताजी लिहून काढी. यामुळेच आज आपल्याला तुकारामाची महान गाथा पाहाव्यास मिळत आहे. हे महान कार्य करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळक-यांपैकी एक होते दुसरे टाळकरी गवारशेठ वाणी व संताजी यांची समाधी सुदुंबरेला आहे.
संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तिळवण तेली समाज बांधवांच्या पुढाकारातून बुधवारी राशीन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर रामराजे भोसले महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त डाबकी रोड येथील ज्ञानेश्वर मंदिरात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
दिंद्रुड दि.८ माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यातील सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोदत होते
फुलंब्री येथे आज श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेली गल्ली येथे असलेला संताजी चौक येथे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.