संतांचे कार्य हे जनकल्याणसाठी व धर्मासाठी समर्पित असते. संतांची पूजा करणे म्हणजे ईश्वराचीच पूजा करणे होय. संतांना जातीपातीच्या बंधनामध्ये बांधणे योग्य नाही.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राजे छत्रपती सांस्कृतिक व्यासपीठ मुकुंदवाडी येथे ह.भ.प. संगिताताई काजळे यांच्या पुढाकारातून ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ यांच्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 09/01/2024 रोजी मंगळवारी फुलंब्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.सजवलेल्या भव्य रथातून श्रींची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी समोर भजनी मंडळ व दादाराव तुपे यांच्या बँडने सुंदर अशी भजने सादर केली .त्या भजनावर जमलेल्या महिला मंडळ
दि.९ रोजी कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त तिळवण तेली समाज यांच्या वतीने देवगाव रंगारी येथील राम मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेची भव्य महाआरती, व्याख्यानातून संताजीचा परिचय, अभिवादन व महाप्रसाद वाटप
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते. तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.