राहुरी - सालाबाद प्रमाणे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी राजूर ते शनिशिंगणापूर तेल कावड यात्रेचे राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेली समाजाच्यावतीने आणि राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांच्या हस्ते कावड यात्रेस तेल अर्पण करण्यात आले. या वेळी नामदेव महाराज शेजूळ, सदाशिव पवार,
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व तेली समाजाचे जेष्ठ नेते श्री बद्रीनाथ मामा लोखंडे यांची अखिल भारतीय तेली महासभा या तेली समाजाचे राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबूलालजी राठोड साहेब यांच्या शिफारशी नुसार निवड करण्यात आली.
मालेगाव डाबली येथिल प्राणघातक हल्ला केल्याबद्दल कारवाईसाठी डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री दादाभाऊ भुसे यांना निवेदन देण्यात आली. रितेश भाऊसाहेब निकम याने व त्याच्या साथीदारांनी रविद्र शंकर चौधरी यावर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला. तलावावरील मुरुम कुठे वाहत आहे असे विचारले असता रितेश व त्याच्या साथीदारांनी रविद्रवर हल्ला चढवला.
धुळे - धुळे जिल्हा महिला आघाडी तर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळा व भव्य महिला मेळावाचे शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता धुळ्यातील चंद्रशेखर आझाद नगर भागातील दाता सरकार मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असून यावेळी महापौर
सोनई: संगमनेर येथील उद्योजक व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रदीप करपे यांना उंबरे येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारवितरण रविवारी (ता. ९) सायंकाळी ४ वाजता उंबरे येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात होणार आहे.