सांगली: तेली समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली आणि सांगली शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा येत्या रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी येथे होणार आहे.
सातारा येथे महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने तेली समाजाचा भव्य मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव, रोख बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
श्री. क्षेत्र सुदुंबरे मिती ज्येष्ठ ॥7॥ बुधवार दि. 18/06/2025 ते श्रीक्षेत्र पंढरपुर आषाढ शु. ॥15॥ गुरूवार दि. 10/07/2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील तेली समाज बांधवांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि आपला उत्साह व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्या वतीने सातारा शहरात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मिरज : मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी हा सुवर्णसंधी असलेला कार्यक्रम रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत