श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला आयोजित तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा रविवार दि ०५ जानेवारी २०२५ सकाळी १० ते ४ पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला.
लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १७ वा राज्यस्तरीय वधू - वर पालक परिचय मेळावा २०२४, स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, स.नं. ३५, आंबेगांव बु. डी. मार्ट समोर, कात्रज बायपास, कात्रज पुणे - ४११०४६. मेळावा रविवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत.
छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते.
वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पुणे प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ मेळाव्याचे ठिकाण अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पुणे. रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत