छ. संभाजीनगर संपर्क कार्यालयः शॉप नं. ३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.9922234621
लातूर : वीरशैव तेली समाज लातूरच्यावतीने आज श्री महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
नवीन हिंदू वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वीरशैव तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती. वीरशैव तेली समाज संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
राष्ट्रीय तेली समाज महासंघाने ऑल इंडिया तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशभरात राबविली जात आहे.
मिरज : मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी हा सुवर्णसंधी असलेला कार्यक्रम रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत