दिंद्रुड दि.८ माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यातील सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोदत होते
फुलंब्री येथे आज श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेली गल्ली येथे असलेला संताजी चौक येथे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जालना येथील सकल तेली समाजातर्फे काद्राबाद भागात सामाजिक सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भोकरदन नाका परिसरात संताजी चौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भाजपाचे मा. गटनेते अशोक पांगारकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आलेल्या
संतांचे कार्य हे जनकल्याणसाठी व धर्मासाठी समर्पित असते. संतांची पूजा करणे म्हणजे ईश्वराचीच पूजा करणे होय. संतांना जातीपातीच्या बंधनामध्ये बांधणे योग्य नाही.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राजे छत्रपती सांस्कृतिक व्यासपीठ मुकुंदवाडी येथे ह.भ.प. संगिताताई काजळे यांच्या पुढाकारातून ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ यांच्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ व संताजी महिला मंडळ, यवतमाळ व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संताजी महाराज पुण्यतिथी व जयंती महोत्सव दि.९, १०, ११ जानेवारी २०२४ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.